उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...
संभाजीनगरः औरंगाबादचं आजवर कितीवेळा नाव बदललं गेलंय? ओंकार करंबेळकर बीबीसी मराठी 3 जानेवारी 2021 अपडेटेड 16 जुलै 2022 फोटो स्रोत, GETTY IMAGES "इस ने कितनी तबाहियाँ देखी, इस के जख्मों का कुछ हिसाब नही, बावजूद इस के जमानें में हैदराबाद का जवाब नही!" राघवेंद्रराव आलमपुरी यांच्या या ओळींमध्ये घुसखोरी करुन हैदराबादच्या जागी औरंगाबाद केलं तरी चालू शकेल इतकं हैदराबाद आणि औरंगाबादमध्ये साम्य आहे. ही दोन्ही शहरं त्यांच्या बहुरंगी बहुपेडी संस्कृतीमुळे सतत चर्चेत असतात. एकेकाळी संपूर्ण दख्खनवर लक्ष ठेवू शकेल इतकी ताकद औरंगाबादला प्राप्त झाली होती. याच प्रदेशात अनेक राजवटींनी आपापली राजधानी स्थापन केली होती. 1724 ला निजामाने (आसफजाही) राजवट स्थापन केली तेव्हाही औरंगाबादला महत्त्व होतंच. संस्थानाची राजधानी हैदराबादला गेली तरी औरंगाबादला उपराजधानीसारखा दर्जा होताच. संस्थानाच्या टोकावरचं मोठं आणि महत्त्वाचं शहर म्हणून त्याला विशेष स्थान होतं. आता मात्र या दोन्ही शहरांच्या नामांतराने पुन्हा उचल खाल्ली आहे. तिकडे हैदराबादचं भाग्यनगर आणि औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं अशी मागणी होत आहे. शिवजयंती...