पाथरूड या आपल्या गावाचा तुम्हाला अभिमान वाटतो ना? तुम्हाला पाथरुडचा इतिहास माहीत आहे? मग गावचा इतिहास जाणून घेण्यासाठी खलील संपूर्ण लेख शेवट पर्यंत वाचा पाथरूड भूम तालुक्यातील महत्वाचे गाव आहे.महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणात पेढा निर्मिती आणि व्यवसाय करणारे गाव.पेढ्याच्या व्यवसायामुळे महाराष्ट्र , मध्य भारत आणि दक्षिण भारतात व्यावसायिक संबंध असलेले बहुधा देशातील एकमेव गाव.सोलापूर - शिर्डी महामार्गावर वसलेले पाथरूड हे गाव स्वयंपूर्ण खेडे आहे , या गावाच्या प्राचीन काळाची साक्ष देणारे येथील हेमाडपंथी महादेव मंदिर , अष्टविनायका प्रमाणे मोठ्या आकाराच्या गणपतीचे मंदिर अनेक आख्यायिका असलेले जागृत हनुमान मंदिर , अलीकडच्या काळात विकसित झालेले वैद्यनाथ म्हणजे वैजुबा मंदिर व तेथील नाथपंथीय स्थान . तेरा खेडे व चौदावे पाथरूड आठवडी बाजाराचे स्वयंपूर्ण गाव म्हणजे पाथरूड .पूर्वीच्या काळी ब्रिटिश आणि हैद्राबाद संस्थानच्या सीमेवरील महत्वाचे गाव. पाथरुडच्या शिवे शेजारी ईट रोडवरील कालावंतिणीचा महाल नावाची प्राचीन वास्तू ऐतिहासिक गूढ आहे आणि त्याचा नक्कीच पाथरूडच्य...
वैभवशाली राजवाडा - माझा मराठवाडा