वाकाटक वाकाटक हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य आणि समृद्ध साम्राज्य होते. हे वंशाने चंद्रवंंशी यादव होते. इ.स. २५० ते सुमारे ५०० या काळात त्यांनी विदर्भ आणि त्या लगतच्या परिसरावर राज्य केले [१] . या काळात त्यांची सत्ता साधारणपणे, दक्षिणोत्तर नर्मदानदीपासून तुंगभद्रानदीपर्यंत आणि पूर्व-पश्चिम, अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत होती. या राजवंशच्या कार्यकाळात त्यांतील राजांनी संस्कृत आणि प्राकृत कवींना उदार आश्रय दिलेला दिसतो. होणाऱ्या वाङ्मयनिर्मितीत वैदर्भी आणि वच्छोमी पद्धतींना प्राध्यान्य दिलेले आढळते. या राजांच्या मांडलिकांनी आणि अमात्यांनी शिल्पकलेच्या निर्मितीलाही उत्तेजन दिल्याचे आढळते. याची साक्ष अजिंठा व गुलवाडा येथील टेकड्यांवरील लेणी देतात [२] . या लेणांतील शिल्पांची गणना प्राचीनकाळातील उत्कृष्ट कलाकृतींमध्ये केली जाते. त्यामुळेच, ′इसवीसनाच्या तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत दक्षिणेत जे राजवंश झाले त्यांमध्ये वाकाटक राजवंश हा श्रेष्ठ असून त्याच्या कामगिरीने अखिल दक्षिण भारताच्या संस्कृतीवर फार मोठा परिणाम झाला आहे.’ असे एका फ्रेंच इतिहासकाराचे उद्गार आहेत ...
वैभवशाली राजवाडा - माझा मराठवाडा