मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास

बीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास आधुनिक बीड जिल्हयाचा इतिहास मात्र इसवी सनाच्या चौथ्या शतकापासूनच उपलब्ध आहे. सातवाहन, चालुक्य, कलचूरी, वाकाटक, कदंब इत्यादी घराण्यांचे बीडवर राज्य होते. उपरोक्त परिसर पुढे यादवांच्या अंमलाखाली होता. अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो (१२९६-१३१६). हा भाग मुहम्मद बिन तुघलकाने जिंकून घेतला. (१३२५-५१). बहामनी साम्राज्याच्या उदयानंतर या प्रदेशावर बहामनी सत्ता प्रस्थापित झाली. त्या राजवटीच्या विघटनानंतर हा प्रदेश निजामशाहीचा एक भाग बनला. पेशवाईच्या कालखंडात निजाम व मराठे यांच्यामध्ये राक्षसभुवन व खर्डा येथे झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. मराठ्यांनी निजामाकडून हा प्रदेश जिंकून घेतला होता. तथापि, मराठेशाहीच्या अस्तानंतर या प्रदेशावर पुन्हा निजामाची राजवट प्रस्थापित झाली, ती थेट १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता देईपर्यत. बहामनी व निजामशाही राजवटीखालीदेखील काही काळ हा जिल्हा होता. त्यानंतर १९५६ पर्यंत हैद्राबादचा भाग होता. १ नोव्हेंबर १९५६ राजी राज्य पुनर्रचनेदरम्यान बीड जिल...

पालखेडची लढाई

पालखेडची लढाई पालखेडची लढाई दिनांक फेब्रुवारी २८ ,   इ.स. १७२८ स्थान पालखेड , [औरंगाबाद जिल्हा],   महाराष्ट्र ,   भारत परिणती मराठ्यांचा विजय युद्धमान पक्ष मराठा साम्राज्य हैदराबादचा निजाम सेनापती बाजीराव पहिला निझाम-उल-मुल्क पालखेडची लढाई   फेब्रुवारी २८ ,   इ.स. १७२८   रोजी महाराष्ट्रातील   औरंगाबाद   शहराजवळ असलेल्या   पालखेड येथील लढाई होती. पहिल्या बाजीरावाच्या   नेतृत्त्वाखाली   मराठा साम्राज्य   व हैदराबादचा   निझाम   यांच्यातील या लढाईत मराठ्यांचा जय झाला. या लढाईत दोन्ही सैन्यांची फारशी खराबी झाली नाही. बाजीरावाने निझामाला खेळवत स्वतःला अनुकूल अशा ठिकाणी खेचून आणले व तेथे कोंडीत पकडून हतबल केले. हे बाजीरावाच्या व्यूहरचनेचे व युद्धतंत्राचे उत्तम उदाहरण समजले जाते. पालखेडच्या लढाईला अनेक युद्धशास्त्र अभ्यासकांनी गनिमी काव्याचे अत्युत्तम उदाहरण मानलेले आहे. [१] [२] [३] पार्श्वभूमी  इ.स. १७१३मध्ये   छत्रपती शाहूने   बाळाजी विश्वनाथला पेशवाईची वस्त्रे दिल्यापासून दहा-बारा वर्षांत बाळाजीने मोडकळीस आल...

जालना

जालना जालना जिल्‍हा  स्‍वतंत्र  भारताच्‍या महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. तसेच मराठवाडयाच्‍या उत्‍तर दीशेस स्‍थीत आहे. जालना जिल्‍हा हा पुर्वी निझाम राज्‍याचा भाग होता. नंतर मराठवाडा मुक्‍ती संग्रामानंतर औरंगाबाद जिल्‍हयामधील एक जालना तालुका झाला. जालना हा औरंगाबादचा पुर्वेकडील तालुका 1 मे 1981 रोजी जिल्‍हा म्‍हणून स्‍थापीत झाला, व औरंगाबाद जिल्‍हयातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड तालुका व परभणी जिल्‍हयातील परतूर असे पाच तालुके जिल्‍हयामध्‍ये समावेश करण्‍यात आले. जालना जिल्‍हयाच्‍या पुर्वेस परभणी व बुलढाणा जिल्‍हा स्थित आहे, औरंगाबाद पश्‍चीम दीशेला आहे, तसेच जळगाव उत्‍तरेकडे असून दक्षीणेस बीड जिल्‍हा आहे. जालना जिल्‍हा 7612 चौ.कि.मी. क्षेत्राने व्‍यापलेला आहे, जे राज्‍याच्‍या एकूण क्षेत्राच्‍या तुलनेत 2.47 % एवढा आहे. जालना जिल्‍हयाचे मुख्‍यालय जालना असून राज्‍याच्‍या व देशाच्‍या राजधाणींशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे. तसेच राज्‍यातील मुख्‍य शहरे देखील राज्‍य महामार्गाने जोडलेले आहेत. जिल्‍हा हा हायब्रीड सीडस् साठी प्रसिध्‍द असून स्‍टील रिरोलींग मि...