मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

औरंगाबादचं आजवर कितीवेळा नाव बदललं गेलंय?

संभाजीनगरः औरंगाबादचं आजवर कितीवेळा नाव बदललं गेलंय? ओंकार करंबेळकर बीबीसी मराठी 3 जानेवारी 2021 अपडेटेड 16 जुलै 2022 फोटो स्रोत, GETTY IMAGES "इस ने कितनी तबाहियाँ देखी, इस के जख्मों का कुछ हिसाब नही, बावजूद इस के जमानें में हैदराबाद का जवाब नही!" राघवेंद्रराव आलमपुरी यांच्या या ओळींमध्ये घुसखोरी करुन हैदराबादच्या जागी औरंगाबाद केलं तरी चालू शकेल इतकं हैदराबाद आणि औरंगाबादमध्ये साम्य आहे. ही दोन्ही शहरं त्यांच्या बहुरंगी बहुपेडी संस्कृतीमुळे सतत चर्चेत असतात. एकेकाळी संपूर्ण दख्खनवर लक्ष ठेवू शकेल इतकी ताकद औरंगाबादला प्राप्त झाली होती. याच प्रदेशात अनेक राजवटींनी आपापली राजधानी स्थापन केली होती. 1724 ला निजामाने (आसफजाही) राजवट स्थापन केली तेव्हाही औरंगाबादला महत्त्व होतंच. संस्थानाची राजधानी हैदराबादला गेली तरी औरंगाबादला उपराजधानीसारखा दर्जा होताच. संस्थानाच्या टोकावरचं मोठं आणि महत्त्वाचं शहर म्हणून त्याला विशेष स्थान होतं. आता मात्र या दोन्ही शहरांच्या नामांतराने पुन्हा उचल खाल्ली आहे. तिकडे हैदराबादचं भाग्यनगर आणि औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं अशी मागणी होत आहे. शिवजयंती...

धाराशिव लेणी

धाराशिव लेणी मराठवाड्यातील धाराशिव गावाजवळचा प्राचीन लेणीसमूह ' धाराशिव लेणी  हा मराठवाड्यातील धाराशिव ( उस्मानाबाद ) गावाजवळचा प्राचीन लेणीसमूह आहे. धाराशिव पासून ५ कि.मी. अंतरावर शैव लेणी आहेत. त्यांना 'चांभार लेणी' असेही म्हणतात. [  संदर्भ हवा  ] मुख्य सभागृह इतिहास  ही लेणी धाराशिव शहराजवळ ६ व्या शतकात बालाघाट डोंगररांगेत कोरलेली आहेत. बौद्ध, हिंदू, जैन अशी ११ लेणी येथे आढळतात. बऱ्याच ठिकाणी हिंदू किंवा सनातन धर्मीय लोकांनी आपल्या देव दैवतांची मूर्तीरूपे कोरून ठेवलेली आजही पाहायला मिळतात.मुख्यत्वे शिव, विष्णू ह्या बहुप्रिय देवांची पाषाणात कोरलेली लेणी पहावयास मिळतात. [१] बौद्धलेणी  येथे सात लेणी असून पहिल्या लेण्यात सामग्री आढळते. दुसरे लेणे मुख्यतः वाकाटक शैलीतील आहे. मुख्य दालन ८० चौरस फूट लांब असून तेथे बौद्ध भिख्खूंसाठी १४ निवारा गृहे आहेत. गाभाऱ्यात पद्मासन अवस्थेतील बुद्ध मूर्ती आहे. तिसरे लेणे पहिल्या लेण्याप्रमाणेच आहे. बाकी लेणी जैन सदृश्य आहेत.  [२] [३] जैन लेणी  धाराशिवच्या ईशान्येस २० कि.मी अंतरावर प्रसिद्ध अशी सात  जैन लेणी  ...

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा' (Subah) ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रमुख 'सुभेदार' म्हणून ओळखला जात असे. सोळाव्या शतकात मुघल शासकांनी प्रशासनाच्या सोयीसाठी आणि प्रभावी नियंत्रणासाठी सुभ्यांची विभागणी प्रशासकीय विभागात केली होती. उदा. सरकार (District- जिल्हा), परगणा (Pargana- लहान विभाग) आणि कसबा (Qasba/Mauza- छोटे खेडे). मुघल बादशहाचा प्रतिनिधी म्हणून निजामाने दख्खनमध्ये देखील ह्याच पद्धतीचे/आकृतीबंधाचे पालन केले. हैदराबाद राज्याचा कितीतरी भाग मराठ्यांच्या किंवा इंग्रजांच्या ताब्यात गेला. तरी १८६४ पर्यंत कागदोपत्री पूर्वीचे सुभे म्हणजे प्रांत आणि सरकार म्हणजे जिल्हे यांचा उल्लेख केला जात असे. त्याकाळी मराठवाड्याचा भाग दोन ते तीन सुभ्यात तसेच जुन्नर आणि कोकण हे भाग औरंगाबाद सुभ्यात मोडत, हे वाचून आपल्याला आश्चर्य वाटेल! निजाम-उल-मुल्क हा दख्खनचा व्हाईसरॉय असतानाच्या काळात दख्खनमधील सुभ्यांची एकूण संख्या सहा होती. हे सहा सुभे खालीलप्रमाणे होते.- १. औरंगाबाद (Khusjistabunyad) २. खानदेश (Khandesh) ३. वऱ्हाड (Berar) ४...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...