मूलतः उत्तर दिले: खडर्याची लढाईविषयी माहिती आहे काय? मराठ्यांच्या इतिहासात ज्या प्रसिद्ध लढाया झाल्या, त्यात खर्ड्याची लढाई ही प्रसिद्ध आहे . हि लढाई मार्च १७९५ मध्ये खर्डा ता . जामखेड जि . अहमदनगर येथे मराठे व निजाम यांच्यामध्ये झाली. खर्ड्याच्या लढाईची थोडक्यात पार्श्वभूमी अशी , मराठेशाहीतील मातब्बर सरदार महादजी शिंदे ,हरीपंत फडके इ सरदार हे कालवश झालेले होते . त्यातच माधवराव नारायण पेशवे हे अल्पवयीन असून , नाना फडणवीस हे कारभार पाहत होते. हैदराबादचा निजामाचा दिवाण मुशृलमूलुख ऊर्फ मैनातदौला याने निजामास पेशवा लहान असुन स्वारी केली तर पेशव्याचे राज्य हाती येइल किंवा मोठी खंडणी वसुल करता येइल असा सल्ला दिला , त्यावरून निजाम तयार होवून लाखभर फौज जमा करून तो निघाला. पेशव्यांचा वकील गोविंदराव काळे यांच्यामार्फत पुण्यास आम्हांस खंडणी द्यावी अन्यथा लढाईस तयार राहावे, असा निरोप दिला . त्यानुसार पेशव्यांनी देखील समरांगणी दोन हात होतील मगच खंडणी द्यावयाची असल्यास देवु , असा जवाब पाठवून शिंदे , होळकर, भोसले ,परशुरामभाऊ यांची फौज व पानसे यांचा तोफखाना घेऊन पेशवे पुण्यावरुन कोरेगाव , काष्टी त...
वैभवशाली राजवाडा - माझा मराठवाडा