मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकशे चौदा बुरूजांचा नळदुर्गचा भुईकोट किल्ला

एकशे चौदा बुरूजांचा नळदुर्गचा भुईकोट किल्ला नळदुर्गचा भुईकोट किल्ला एक सुंदर आणि सर्वात मोठा दुर्ग आहे. नळदुर्ग नावाचे गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात पुणे-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर आहे. तेथेच बोरी नदीच्या काठी तो भुईकोट किल्ला आहे. किल्ला अभेद्य व भक्कम असा आहे. किल्ला एका दिवसात पाहून होतो. किल्ल्याचा बाह्यभाग हैदराबाद हमरस्त्याने प्रवास करताना दुरूनही दिसू शकतो. किल्ल्यास तीन किलोमीटर लांबीची तटबंदी, तब्बल एकशेचौदा बुरुज, भव्य परिसर, दुर्गाच्या भोवतालचा खंदक- त्याच्या आत दुहेरी तटबंदी, खंदकात वळवून सोडलेले नदीचे पाणी इत्यादी गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. तेथे पावसाळ्यात उंचावरून कोसळणारे नर व मादी धबधबे पर्यटकांचे आकर्षण असतात. किल्ल्यात तीन भव्य प्रवेशद्वारे ओलांडून जावे लागते. उंच व दगडी बुरुजांमधील प्रवेशद्वारे अवाढव्य आहेत. बुरुजांवरही कलाकुसर आहे. पर्यटक किल्ल्यात प्रवेश केल्या केल्या पहारेकर्‍यांच्या देवड्यांसमोर येतो. त्याला आत आल्यानंतर जाणवतो तो किल्ल्याचा भारदस्तपणा. प्रवेशद्वार, हत्ती दरवाजा, बुरुज, तटबंदी, पहारेकर्‍यांच्या देवड्या इत्यादीवर भारदस्तपणा...

भुईंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे

भुईंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे By   सदाशिव शिवदे   सिंदखेडकर लुकजी (लखोजी) जाधव यांच्या घराण्याचे वंशज  पुणे – सातारा  महामार्गावर कृष्णाकाठी वसलेल्या भुईंज या गावी राहतात. लुकजीराजे निजामशहाकडे पाच हजारी मनसबदार होते. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर पुढे त्यांना दहा हजारी मनसबदारी, अठ्ठावीस महाल व बावन्न चावड्यांचे वतन मिळाले. त्यामुळे त्यांना निजामशाहीत मोठे महत्त्व प्राप्त झाले. अकबराने निजामशाहीवर आक्रमणे केली (१५९४ ते १६००), त्यावेळी चाँदबीबीने त्यास यशस्वी तोंड दिले, ते जाधवरावांच्या सहकार्यामुळेच. चाँदबीबीचा खून झाल्यावर, निजामशाही अस्तंगत होत असताना, ती वाचवण्यासाठी, मुर्तजा नावाच्या वारसास परिंडा येथे तख्तावर बसवण्याचा जो प्रयत्न झाला, त्यात जाधवरावांचा हात होता. निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न करणा-या जाधवरावांची पुढे मुला-नातवांसह निजामशहाकडूनच हत्या झाली! त्यानंतर जाधव कुटुंबातील काहीजण स्थलांतरित झाले. त्यांतील खंडोजीराव हे पुत्र भुईंज येथे वास्तव्यास आले. जाधवांचे ते घराणे भुईंज येथे नांदत आहे. जाधव घराण्‍याचे दोन वाडे भुईंज गावात होते. त्‍यापैकी एक वाडा पडल...

मराठवाड्यातील दगडाबार्इंची शौर्यगाथा

मराठवाड्यातील दगडाबार्इंची शौर्यगाथा (Dagadabai, an ordinary village woman fought for national cause!) By   संतोष खेडलेकर  - महाराष्ट्रातील मराठवाडा हा भाग स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत येत होता. देशात इतरत्र लोक परकीयांविरूद्ध लढत असताना मराठवाड्यातील जनतेला स्वकीयांच्या अत्याचाराला तोंड द्यावे लागत होते. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ या स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाड्यातील जनतेत त्या विरूद्ध जागृती निर्माण केली. त्या लढ्यात ग्रामीण भागातील एक अतिशय धाडसी महिला सहभागी झाली होती. तिचे नाव होते दगडाबाई देवराव शेळके. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्‍यातील कोलते टाकळी हे छोटेसे खेडे म्हणजे दगडाबार्इ यांचे मूळ गाव ! त्यांचे सासर जालना शहरापासून पंधरा-सोळा मैलांवर असलेल्या बदनापूरजवळील धोपटेश्वर येथे होते. दगडाबाई या मुळातच धाडसी स्वभावाच्या होत्या. त्यात त्यांना स्वातंत्र्य लढ्याची जाणीव झाली. त्यांनी तशी जागृती महिलांमध्ये केली. त्यांनी निजामाची सत्ता ही देशविरोधी आहे, त्यामुळे त्यांच्याविरूद्ध लढणे म्हणजे स्वातंत्र्यसंग्रामच आहे ही गोष्ट महिलांना...

जरीआई – मरीआई

जरीआई – मरीआई :  उग्र प्रकृतीची एक भारतीय क्षुद्रदेवता. ‘जरी’ म्हणजे तापाची साथ. ‘मरी’ म्हणजे पटकी, देवी यांसारख्या रोगांची साथ. प्राणघातक साथींच्या रोगांची एक देवी कल्पून ती ‘जरी-मरी’ वा ‘जरीआई-मरीआई’ ह्या नावाने महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात पूजिली जाते.  मरीआईचेच ‘मरीअम्म’, ‘मारी’, ‘मरीमाय’, ‘मरीभवानी’ अशी नामांतरे प्रदेशपरत्वे आढळतात. जरी-मरीचे स्थान गावात एका कोपऱ्याला किंवा गावाबाहेर एखाद्या झाडाखाली असते. देवळातच तिची प्रतिष्ठापना करावी, असा नियम नाही. कोठे तिच्यावर केवळ आच्छादन असते, तर कोठे नैसर्गिक स्थितीतच स्थानापन्न झालेली दिसते. तिच्या उत्पत्तीबाबत विविधकथा रुढ आहेत. एका चांभाराने आपण ब्राह्मण असल्याचे भासवून एका ब्राह्मणकन्येशी विवाह केल्याची मरीआई ही मूळची आंध्र प्रदेशातील देवता असावी, असे प्र. कृ. प्रभुदेसाई यांचे मत आहे. तिचा पुजारी प्राय: शूद्र वर्णातील असून त्याला पोतुराजा वा पोतराज म्हणतात. ते मरीआईचा देव्हारा डोक्यावर घेऊन गावोगाव फिरत असते.  आंध्र प्रदेशात अनेक गावी तिची पूजा होते. कर्नाटकात कारवार जिल्ह्यातही शिर...
महाराष्ट्राची लोकधारा काही दिवसांपूर्वी धाकट्या बहिणीच्या पिल्लांना घेवून गणेश कला क्रिडा मंचावर भरलेल्या बालजत्रेला जायचा योग आला. लहान मुलांना भुलावून घेतील, मोहवतील अशा अनेक गोष्ट होती. आमच्या सौ., बहिण, तिची पिल्लं मस्त रमली तिथे. पण माझ्या मनात भरलं एक छोटंसं शिल्पकलेचं प्रदर्शन. बहुदा शाडु किंवा प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या काही मोजक्याच सुबक मुर्ती. पण केवळ शिल्पकला एवढीच त्या प्रदर्शनाची ओळख नव्हती. त्याचं वैशिष्ठ्य होतं त्यातल्या महाराष्ट्राच्या लोकधारेतील काही महत्त्वाच्या आणि आजकाल अस्तंगत होत चाललेल्या घटकांचं, परंपरांचं चित्रण ! मुर्ती काही फार सुबक वगैरे नव्हत्या पण जे काही होतं ते विलक्षण सुखावणारं, त्याहीपेक्षा आपल्या संस्कृतीची, तिच्या काही घटकांची ओळख करुन देणारं होतं. श्री. विनोद येलारपुरकर यांच्या 'व्यक्तीशृंखला' नावाच्या या प्रदर्शनाची एक झलक मायबोलीकरांसाठी.... वासुदेव : आजही खेड्यापाड्यातून सकाळच्या प्रहरी मोराची टोपी घातलेला एक माणुस येतो . हरिनाम बोला हो वासुदेव बोला म्हणत लोकांमध्ये धर्मभावना जागृत करण्याचं, दिवसाची सुंदर , पवित्र सुरुवात करुन देण्...

पोतराज

पोतराज ‘मरिआई’ या ग्रामदेवतेचा उपासक.  पोतराज हा शब्द म्हणजे ‘पोत्तुराजू’ या तमिळ शब्दाचे रूपांतर होय.  शब्दाप्रमाणेच पोतराजाचे आचरण, पूजापद्धती, नृत्य इत्यादींवरही द्रविड संस्कृतीचा प्रभाव दिसतो.  दक्षिणेत ‘सात बहिणी’ या नावाच्या ग्रामदेवी प्रसिद्ध आहेत. त्यांचा भाऊ असलेल्या एका ग्रामदेवाला ‘पोत्तुराजू’ म्हणतात.  मरिआईला लक्ष्मीआई असेही म्हणतात. त्यामुळेच पोतराजाला ‘मरिआईवाला’ व ‘लक्ष्मीआईवाला’ अशीही नावे आहेत.  पोतराज व त्याचा परिवार गावात येतात, तेव्हा ‘कडकलक्ष्मी’ आली असे म्हटले जाते. मरिआई ही कडक देवी असल्यामुळे तिला कडकलक्ष्मी म्हणतात.  पोतराजाच्या हातातील कोरडय़ाला ‘कडक’ असे नाव असल्यामुळे तिला ‘कडकलक्ष्मी’ हे नाव मिळाले, असे सरोजिनी बाबर यांचे मत आहे.  लक्ष्मी हा शब्द येथे विष्णुपत्नी या अर्थाने आलेला नसून, अंबाबाई या अर्थाने आला आहे. पोतराज पुरुष असूनही तो बहुतांशी स्त्रीवेषात असतो. त्याच्या कंबरेभोवती असलेला हिरव्या खणांचा घागरा हा लिंबाचा पाला नेसण्याच्या प्रथेचा अवशेष असण्याची शक्यता आहे. त्याच्या कंबरेच्या वरचा भाग उघडा असतो, दाढी राखलेली न...

Panpoi at Shirwal

Panpoi at Shirwal  Research & Documentation | Heritage Conservation | Restoration Location  – Mumbai – Bengaluru Highway Road, Shirwal, Satara   The Panpoi at Shirwal is one of its kind in terms of it form, layout and design. As the name suggests, it houses through two water storage elements and a structure to provide shade. Such systems were familiar on trade routes in Western Deccan region of Maharashtra. The social and cultural value that it resonates through the idea of a service for others is the main asset of the built form. It is built in basalt stone ranging over a height of 300-600mm. The structure is very simple and the crux of it completely lies in the interlocking of stones.   By initiatives of local heritage enthusiasts namely Mr. Chandrashekhar Shelke under the guidance of Ar. Rahul Chemburkar of Vaastu Vidhaan, Mumbai, Dr. Sachin Joshi of Deccan College, Pune, the activity of proper cleaning of the site, documentation and onsite numbering of the st...