मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठवाड्यातील सात किल्ल्यांचे लवकरच पालटणार रूप

मराठवाड्यातील सात किल्ल्यांचे लवकरच पालटणार रूप 5 वर्षांपूर्वी औरंगाबाद - गडकिल्ल्यांच्या देशा, महाराष्ट्र देशा, असे म्हटले जात असले तरी मराठवाड्यातील किल्ल्यांच्या नशिबी कायमच सापत्न वागणूक आली आहे. मात्र, शासनाने स्थापन केलेल्या गड संवर्धन समितीच्या प्रयत्नांमुळे मराठवाड्यातील किल्ल्यांचे रूप पालटणार असून सहा किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. यावर्षी यात आणखी एका किल्ल्याची भर पडली आहे. गेल्या दोन वर्षांत संवर्धनाच्या कार्यक्रमात समाविष्ट केलेल्या राज्यातील ३० किल्ल्यांपैकी मराठवाड्यातील आहेत, हे विशेष. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गडकिल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली. तावडे समितीचे अध्यक्ष असून ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे प्रमुख मार्गदर्शक आहेत. महिन्यातून एकदा सर्व सदस्यांची बैठक होते. बैठकीतील निर्णयांवर तीन महिन्यांनी शिक्कामोर्तब केले जाते. दोन वर्षांत समितीने राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याची योजना आखली आहे. यात मराठवाड्याला झुकते माप मिळाले आहे. ३०पैकी किल्ले मराठवाड्यातील : दुर्गसंवर्धन समितीने गेल्या दोन वर्षां...
APR 20 दिवस १ला – सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील भटकंती अकलूज किल्ला आणि शिवसृष्टी, टेंभूर्णी ची गढी, माढा किल्ला, परंडा किल्ला अकलूज किल्ला  -  अकलूज किल्ल्यावरील शिवसृष्टी हे इथले प्रमुख आकर्षण .  तटबंदी बांधताना वापरलेल्या विशाल विरगळ , किल्ल्याला वळसा देत जाणारी निरा नदी आणि किल्ल्याच्या मधोमध असलेल्या टेहळणी बुरुजावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहताना मन भूतकाळात जाऊन पोहचतं .  नदीकाठची तटबंदी ,  घाट , किल्ल्याचे उत्तुंग बुरुज ,  घाटावरील पिळदार मिशीवाल्या मारुतीरायाचे मंदिर आणि किल्ल्याच्या मधोमध उभा ठाकलेला टेहळणी बुरुज हि अकलूज किल्ल्याची काही वैशिष्ट्ये . अक्लाई देवी हे अकलूज चे ग्रामदैवत या देवीच्या नावावरून या शहराला अकलूज नाव पडले.. हा किल्ला यादवकालीन आहे असे इतिहासकार सांगतात.. १३ व्या शतकात यादवकालीन राजा सिंघन याने याची निर्मिती केली.. पुढे मुघल आणि मग इंग्रज यांनी या किल्ल्यावर राज्य केले.. औरंगजेबाचा दख्खनचा सुभेदार बहाद्दूरखान याच्या कडे हा किल्ला होता.. दौंड जवळील बहाद्दूरगड देखील त्याच्या अखत्यारीत होता.. पुढे रणमस्तखान इथला ...

मराठवाड्यातील दुर्लक्षित किल्ले

मराठवाड्यातील दुर्लक्षित किल्ले मराठवाडा ..  बहामनी  ( मुघलशाही ,  बेदरशाही ,  आदिलशाही , निजामशाही )  सत्तेच्या वरवंट्याखाली रगडलेला मराठवाडा .  यवनी पाशवी अत्याचाराचा मूक साक्षीदार म्हणजे मराठवाडा .  सत्तांतराची साक्ष देणारा मराठवाडा ..  तसेच नामांतराची चळवळ छातीवर झेलणारा मराठवाडा .  या मराठवाड्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो , उस्मानाबाद - बीड - लातूर - परभणी - नांदेड - हिंगोली - जालना - औरंगाबाद . साधारणतः उजाड माळरान भूभाग म्हणजेच पठारी प्रदेश ,  निसर्गाने आखडून घेतलेला हात आणि राजकारण्यांनी दिलेलं आश्वासनांचे डोईजड गाठोडे .  साठ वर्षांच्या स्वतंत्र भारतातील एक दुर्लक्षित भूप्रदेश म्हणजे मराठवाडा .  मराठवाड्याने महाराष्ट्राला तब्बल तिन मुख्यमंत्री दिले ..   विरोधी पक्षातील आघाडीचे नेतेदेखिल याच भागातले ..  पण मराठवाडा मात्र आहे तसाच राहिला ..  उपेक्षित .  पण मित्रहो मराठवाडा हि संतांची भूमी देखिल आहे ..!  मराठवाड्याचा इतिहास तसा मोठा आहे ..  पार यादवकालापासून ,  तसेच त्रेतायुगातील घटनांचे...

किल्ले अंतुर

किल्ले अंतुर - १ Primary tabs बघा (active tab) What links here सुहास..   in   भटकंती 31 Jan 2012 - 4:01 pm  अनुक्रमणिका  माझा मराठवाडा : किल्ले अंतुर - २ › गोविंदग्रजांच्या महाराष्ट्र गीतातील " कणखर देशा, राकट देशा, दगंडाच्या देशा " या ओळींची प्रचिती मला सदैव येत असते. मध्यंतरी औरंगाबादला काम निघाले होते, काम इतके अर्जेन्ट होते की मी ट्र्व्हल्स ने दीड तासाच्या पुणे-दर्शनाचा अलभ्य लाभ न घेता, डोक्यावर शिरस्त्राण धारण करुन सरळ बाईक ला किक मारली, दर दीड तासाच्या अंतरावर ब्रेक घेत-घेत औ.बाद ला पोचलो.काम संपले दुसर्‍या दिवशी, पण पुण्याकडे काही काम नव्हते. तिथुन कन्नड (हे माझे आजोळ) आणि तसच पुढे किल्ले अंतुर ला जायचे ही ठरले. कन्नड ते नागापुरच्या रस्त्यावर एकदा सावरगांव सोडल की एक फाटा लागतो, त्या फाट्यावरुन आम्ही चौघै जण भिल्लांच्या वस्ती पाशी थबकलो. निर्जन रस्ता, शेजारी वन्य-प्राण्यांसाठी राखीव असलेले जंगल असल्यामुळे (येताना गौताळा अभयारण्यात, वरून दिसणार्‍या खोल दरीत रानडुकरांचा कळप पाहुन आलो होतो) मी उत्सुकतेपोटी विचारले. (लगे भाषा बदलत रहाती बरं का मयी , लगे औ.बाद ला ...