मुख्य सामग्रीवर वगळा

धाराशिव लेणी

धाराशिव लेणी

मराठवाड्यातील धाराशिव गावाजवळचा प्राचीन लेणीसमूह

'धाराशिव लेणी हा मराठवाड्यातील धाराशिव (उस्मानाबाद) गावाजवळचा प्राचीन लेणीसमूह आहे. धाराशिव पासून ५ कि.मी. अंतरावर शैव लेणी आहेत. त्यांना 'चांभार लेणी' असेही म्हणतात.संदर्भ हवा ]

मुख्य सभागृह

इतिहास 

ही लेणी धाराशिव शहराजवळ ६ व्या शतकात बालाघाट डोंगररांगेत कोरलेली आहेत. बौद्ध, हिंदू, जैन अशी ११ लेणी येथे आढळतात. बऱ्याच ठिकाणी हिंदू किंवा सनातन धर्मीय लोकांनी आपल्या देव दैवतांची मूर्तीरूपे कोरून ठेवलेली आजही पाहायला मिळतात.मुख्यत्वे शिव, विष्णू ह्या बहुप्रिय देवांची पाषाणात कोरलेली लेणी पहावयास मिळतात.[१]

बौद्धलेणी 

येथे सात लेणी असून पहिल्या लेण्यात सामग्री आढळते. दुसरे लेणे मुख्यतः वाकाटक शैलीतील आहे. मुख्य दालन ८० चौरस फूट लांब असून तेथे बौद्ध भिख्खूंसाठी १४ निवारा गृहे आहेत. गाभाऱ्यात पद्मासन अवस्थेतील बुद्ध मूर्ती आहे. तिसरे लेणे पहिल्या लेण्याप्रमाणेच आहे. बाकी लेणी जैन सदृश्य आहेत. [२][३]

जैन लेणी 

धाराशिवच्या ईशान्येस २० कि.मी अंतरावर प्रसिद्ध अशी सात जैन लेणी आहेत. दुसऱ्या लेण्यात आठ स्तंभ आणि पाच प्रवेशद्वारे आहेत.दोन्ही बाजूस २२ खोल्या असून गर्भगृहात भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर यांची भव्य प्रतिमा आहे. करकंडचरिऊ नामक जैन ग्रंथात या लेण्यांचे वर्णन आढळते.

सद्यस्थिती 

धाराशिव लेणीवर बौद्ध व जैन दावा करतात. परंतु जेम्स बर्गस यांच्या महाराष्ट्रातील १२०० लेण्यावरील संशोधनानुसार धाराशिव लेणी इ.स.५ व्या शतकात बौद्ध लेणी होती. नंतर १२ व्या शतकात त्यातील काही लेणी जैन लेण्यांमध्ये परावर्तित केली गेली आहेत. [४] [५]

अन्य माहिती 

पेशवाईच्या काळात या लेण्यांमध्ये हरी नारायण नामक एका सत्पुरुष तपश्चर्या करीत होते, असे समजते. या संप्रदायाचा एक मठही धाराशिवमध्ये आहे.[६]

संदर्भ आणि नोंदी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...