मुख्य सामग्रीवर वगळा

बाजीरावांच्या काळात जवळपास सर्व भारत मराठा साम्राज्याकडे असताना शेजारचा मराठी प्रभाग (मराठवाडा) निजामाकडे कसा राहिला?

ज्याला इंग्लिशमध्ये 'किलर इन्स्टिंक्ट' म्हणतात, ती मराठ्यांमध्ये नव्हती आणि आजही नाही. महाभारतात 'कणिक नीती'मध्ये असे म्हटले आहे की, 'राजा, शत्रूवर एकदा शस्त्र उचलले म्हणजे त्याचा पूर्ण निःपात करावा. अर्धवट सोडू नये. शरण आलेल्या शत्रुलाही मारून टाकावे.' (संदर्भ : महाभारताचा उपसंहार : चिं. वि. वैद्य : पृष्ठ २५०)

परंतु मराठे मूळात शांतिप्रिय आणि अल्पसंतुष्ट होते. इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी लिहिले आहे की, "मराठ्यांनी मुख्यतः धर्माच्या आणि देशाच्या रक्षणासाठी शस्त्र हाती घेतले होते. (संदर्भ : पानिपत १७६१ : पृष्ठ २५७) अफगाण आणि रोहिल्याप्रमाणे रक्त सांडत हिंडण्यात त्यांना आनंद नसे. आपल्या शेतावर आणि मुलाबाळांतच त्यांना आनंद वाटे. पोटापूरते पैसे मिळाले की नंतर शत्रूचा पूर्ण नायनाट किंवा कायमचा बंदोबस्त करण्याची त्यांना घृणा वाटे. ते घरी परतण्यासाठी उत्सुक असत. शरण आलेल्या शत्रूंशी करार करून ते मोकळे होत. शत्रूपक्ष नंतर करारातील कलमांची पूर्तता करण्यातसुद्धा टाळाटाळ करीत.

निजाम हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मराठयानी निजामाला भोपाळ, सिंदखेड, उदगीर, राक्षसभुवन, खर्डी अशा अनेक ठिकाणी पाणी पाजले. पण निजाम लवचिक होता. शरणागती पत्करून, मुलुख तोडून देऊन तो वेळ मारून नेत असे. तहाच्या अटी अंमलात आणण्याची वेळ आली की, तो टाळाटाळ करून आणि कारस्थाने रचून तो मराठयांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करीत असे. शेवटी तर त्याने मराठयांपासून वाचण्यासाठी इंग्रजांचेही मांडलिकत्व पत्करले.

शत्रूला समूळ नष्ट न करता त्याच्याशी करार करून सोडून देण्याच्या मराठयांचा पद्धतीमुळे निजाम, सिद्दी आणि पोर्तुगीज मराठयांकडून अनेक वेळा पराभूत होऊनसुद्धा मराठेशाहीच्या अंतापर्यंत आणि त्यानंतरही सत्तेवर कायम राहिले.



 मराठवाडा आज जरी मागास दिसत असला तरी पूर्वी तसे नव्हते. कमी परंतू भरवशाचे पर्जन्यमान आणि गोदावरी, पूर्णा, मांजरा, सिंदफणा इ. नद्यांच्या खोर्‍यातील सुपीक जमीन यामुळे मराठवाडा हा पूर्वीपासून ज्वारी सारखी धान्ये आणि कापसाचे कोठार म्हणून ओळखला जायचा. याउलट, पश्चिम महाराष्ट्राचा सह्याद्रीचा भाग हा जास्त पावसामुळे तर पूर्वेकडचा भाग हा पर्जन्यछायेच्या प्रभावात असल्याने बहूतांश भाग हा शेतीसाठी उपयुक्त नव्हता. यामुळेच पूर्वीपासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा तुलनेने अधिक संपन्न होता. इथे राज्यकरणारे सहाजीकच मग संपन्न होेते. अर्थातच शेकडो वर्षे इथे अनेक राज्ये होउन गेली. पुढील गोष्टी इथे लक्षात घेण्यासारख्या आहेत.

१. दोन मोठी संपन्न मराठी साम्राज्ये सातवाहन आणि सेऊन-यादव यांच्या राजधान्या आजच्या मराठवाड्यात अनुक्रमे प्रतिष्ठान (पैठण) आणि देवगिरी इथे होत्या.

२. सातवाहन, वाकाटक काळात मुख्य व्यापरी मार्ग हा मराठवाड्यातून जात असे. भोकरदन (जालना जि.), तेर (उस्मानाबाद जि.) हि व्यापाराची मोठी केंद्रे होती.

३. राष्ट्रकूट, चालूक्य या काळात राजधानी जरी मराठवाड्यात नसली तरी मराठवाड्याचे महत्व अजीबात कमी झाले नाही.

४. शिवाजी महाराजांची देवगिरीवर भगवा फडकविण्याची इच्छा होती (कदाचित राजधानी बनविण्याची इच्छा असावी). दुर्दैवाने त्यांच्या हयातीत ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

५. मराठवाड्यावर मुघलांचा कब्जा होण्याआधी निजामाने (मूळ भारतीय) त्यांच्याशी तीव्र संघर्ष करणे तसेच मुघलोत्तर निजामाने (मूळ तुर्की) लवचिक धोरण अवलंबने.

या सगळ्या गोष्टी मराठवाड्याचे महत्व सांगतात.

मराठवाडा स्वराज्यात घेण्याची संधी चालून आली ती छ. शाहू-बाजीराव पे. यांच्या काळात. परंतू विजय आपटे यांनी याच प्रश्नाला उत्तर देतांना सांगितल्या प्रमाणे अल्पसंतुष्ट असल्याने मराठे युद्धात जिंकत पण तहात हारत. मराठवाड्यासारखा संपन्न प्रदेश निजाम इतक्या सहजासहजी सोडेल याची शक्यता मुळीच कमी होती. यातूनच मग १७४३ मध्ये झालेल्या पालखेडच्या तहात निजामाने मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी देण्याचे मान्य केले. अर्थातच निजाम हा कर स्वत:च्या खिशातून देणार नव्हता. हा भार पडला तो थेट सामान्य जनतेवर. इथे बाजीरावांनी मराठी भाषिक प्रदेश स्वराज्यात घेण्या ऐवजी तिथून मिळणार्‍या कराला महत्व दिले. मराठा साम्राज्याच्या भारतभर झालेल्या विस्तारात या कराची मोठी मदत झाली असणार. मग मराठवाडा स्वराज्यात आहे काय किंवा नाही काय, पेशव्यांनी त्याचा विचार केला नाही.

माझ्यामते मराठवाडा स्वराज्यात न घेणे ही पेशव्यांची केवळ चूक नव्हती, तर आपल्याच जनतेवर केलेला मोठा अन्याय होता. याचे मराठवाड्यावर दूरगामी परीणाम झाले. मराठवाड्याची आर्थिक स्थिती खराब होण्याला इथुनच सुरूवात झाली. दीर्घकाळापर्यंत इथे चांगले वैचारिक नेतृत्व येऊ शकले नाही. प. महा. आणि मराठवाड्यात आज एक मोठी वैचारीक, सामाजिक, आर्थिक दरी दिसून येते. मराठवाड्याच्या आजच्या वाईट स्थितीचे मूळ असे एका चूकीच्या तहात दडले आहे. मराठवाड्याने ई.स. पू. २०० ते ई.स.१५०० असे जवळपास १७०० वर्षे महाराष्ट्राचे भाषिक व सांस्कृतिक (तसेच बराच काळ राजकीय देखील) नेतृत्व केले पण त्याच मराठवाड्याला आज सावत्र वागणूक देण्यात येते. जर मराठवाडा स्वराज्यात असले असते तर कुणास ठाऊक, आज देवगिरी अखंड महाराष्ट्राची सांस्कृतिक व राजकीय राजधानी असली असती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...