मुख्य सामग्रीवर वगळा

पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण ही महाराष्ट्राची विभागवार रचना कशाच्या आधारावर करण्यात आली आहे. या विभागांच्या नावामागे काय युक्तिवाद आहे?

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आल्यामुळे , सध्या २०१७ साली राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे. हे जिल्हे पुढे दर्शविलेल्या सहा प्रशासकीय विभागांमध्ये गटबद्ध आहेत.

प्रदेशः

भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राच्या पाच मुख्य क्षेत्रांमध्ये विभाजणी झालेली आहे.

  1. विदर्भ ( नागपूर व अमरावती विभाग)
  2. मराठवाडा (औरंगाबाद विभाग)
  3. कोंकण ( कोकण विभाग)
  4. पश्चिम महाराष्ट्र (पुणे विभाग)
  5. खान्देश (नाशिक विभाग)
  • मराठवाडा - स्वातंत्र्यापूर्वी निझामाच्या हैदराबाद संस्थानाचा मराठी बोलणारा भाग १९५६ साली महाराष्ट्रात (तत्कालीन बॉम्बे राज्य) आला. त्याला निझामाने दिलेले मराठवाडा हे नाव पडले. १९५६ मध्ये पाच जिल्हे असणाऱ्या मराठवाड्यात आता ८ जिल्हे आहेत. मराठवाड्याची रचना ही मुख्यतः ऐतिहासिक आधारावर झालेली आहे.
  • विदर्भ - भारत इंग्रजांच्या ताब्यात असताना ‘मध्य प्रांत आणि बेरार’ राज्यात जे मराठीभाषिक जिल्हे होते, ते आजच्या विदर्भात येतात. त्यात अमरावती विभाग म्हणजे इंग्रज ज्याला बेरार उपविभाग (वऱ्हाड) म्हणत होते तो आहे, तर नागपूर विभागातील जिल्हे हे मध्य प्रांत उपविभागात येत. तरी इतिहासात वऱ्हाड प्रांत म्हणजे आजचा संपूर्ण विदर्भ + मध्य प्रदेशातील काही भाग + मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा. विदर्भ विभाग भौगोलिकदृष्ट्या तसेच प्रशासकीयदृष्ट्या रचण्यात आलेला आहे.
  • उत्तर महाराष्ट्र - तत्कालीन मुंबई (बॉम्बे) प्रांतातले पश्चिम आणि पूर्व खानदेश जिल्हे म्हणजे आजचे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हे. तसेच प्रशासकीय सोयीसाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्हे जोडून उत्तर महाराष्ट्र विभाग तयार झाला. या विभागाची रचना मुख्यतः प्रशासकीयआणि थोडीफार भौगोलिक आहे.
  • कोकण/कोंकण - समुद्र आणि सह्याद्री पर्वतरांगा या दोघांमधील क्षेत्र म्हणजे कोंकण. हा विभाग भौगोलिक असून त्यात कर्नाटकाचा उत्तर कन्नड जिल्हा आणि गोवा राज्य येतात. मात्र प्रशासकीय दृष्ट्या महाराष्ट्रातले सात जिल्हे कोंकणात आहेत. ही रचना मुख्यतः भौगोलिक आहे.
  • पश्चिम महाराष्ट्र - मराठा साम्राज्याचे केंद्रस्थान असलेले जिल्हे जे आधी तत्कालीन मुंबई प्रांतात किंवा त्याचा जवळ पडत होते त्यांना प्रशासकीयदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रविभागात एकत्र करण्यात आलं. पश्चिम महाराष्ट्र विभागाची रचना ही प्रशासकीय तसेच ऐतिहासिक आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...