महाराष्ट्र • भारत | ||||
| — विभाग — | ||||
![]() | ||||
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) | |||
| क्षेत्रफळ | ६४,८११ चौ. किमी | |||
| जिल्हे | औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली | |||
| १,५५,८९,२२३ (2001) • २४१/किमी२ ६८.९५ %लोकसंख्या घनता साक्षरता इतिहास. मराठवाडा हा मूलक देश म्हणून ओळखला जात असे. वैभवशाली आणि महान यादव मराठी साम्राज्याची स्थापना याच मराठवाड्यात झाली. विदर्भातील शिन्दखेडचे सरदार लखोजी जाधव हे याच यादव घराण्याचे वंशज यांची कन्या राजमाता जिजाऊ आणि वेरूळचे पाटील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजीराजे ते याच मातीतील होते. ४०० वर्षे याच मराठवाड्यातील देवगिरीवरून यादवांनी विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, माळवा, तेलंगण, बेळगाव, उत्तर कर्नाटक आणि निम्म्यापेक्षा जास्त भूभाग असलेल्या भारतावर राज्य केले.मराठवाडा निजामाच्या संस्थान चा भाग होता हे खरे असले तरी त्या आधी मुस्लीम राजवट येण्याआधी तेथे हजारो वर्ष मराठा साम्राज्य होते आणि जवळपास ४०० वर्ष देवगिरीच्या यादवांचे मराठी साम्राज्य होते आणि ते निम्म्यापेक्षा जास्त भारताच्या भागावर राज्य करत होते हे क्वचितच आणि तेही एका ओळीत सांगितले जाते. इसवी सन १४०० पूर्वी हजारो वर्षे मराठवाड्यावर सातवाहन, चालुक्य, यादव या सारख्या मातब्बर मराठेशाहीतील मराठी लोकांचे राज्य होते हे पद्धतशीर लपवले जाते आणि नंतर चार शतके मुस्लिम राजवटीखाली मराठवाडा मुस्लिम राजवटीखाली आणि निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत ब्रिटिशांचे माण्डलिक राहून राज्य केले.[२]भारतीय स्वातन्त्र्यलढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तिसंग्राम लढला गेला. स्वामी रामानन्दतिर्थ हे हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू होते. १७ सप्टेम्बर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेम्बर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुम्बई राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्रराज्याचा भाग झाला. स्वातन्त्र्योत्तर काळात कॉंग्रेसचे नेते, शंकरराव चव्हाण यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री झाले व नन्तर त्यांनी भारतीय संघराज्याचे गृहमन्त्री, अर्थमन्त्री ईत्यादी केन्द्रीय मन्त्रिपदेही साम्भाळली. त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता.पैठणचा जायकवाडी जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान आहे. भौगोलिक स्थान मुख्य शहरे
महत्त्वाची ठिकाणेसन्त नामदेव महाराजांचे जन्मस्थान नरसी नामदेव, सन्त ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान आपेगाव, शिर्डीच्यासाईबाबांचे जन्मगाव पाथ्री, सन्त एकनाथांचे पैठण, समर्थ रामदासांचे जन्मगाव जाम्ब, देवीचे शक्तिपीठ माहूर, ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ, औण्ढा-नागनाथ, घृष्णेश्वर मन्दिर, शीख धर्मीयांचा नान्देड येथील सचखण्ड गुरुद्वाराइत्यादी धार्मिक स्थाने या विभागात येतात.
नद्यागोदावरी ही मराठवाड्यातील मुख्य नदी आहे. पूर्णा, पैनगंगा, सीना, शिवणा, मांजरा, दुधना या विभागातील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. गोदावरी : मराठवाड्यातून गोदावरी ही प्रमुख नदी वाहते. काही अन्तरापर्यन्त तिने औरंगाबाद बीड, जालना व परभणी, बीड व जालना अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. बीड जिल्ह्यातील सिन्धफणा, वाण, सरस्वती, या गोदावरीच्या उपनद्या आहेत. मांजरा : पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराळ भागात उगम पावणारी मांजरा नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण - असा प्रवास करून जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समान्तर असा होतो. बर्याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. उगमापासून सुमारे ६१६ किलोमीटर प्रवास करून ही नदी पुढे नान्देड जिल्ह्यात कुण्डलवाडी गावाजवळ गोदावरीस मिळते. सिन्धफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नन्तर पूर्वेकडे व तदनन्तर पुन्हा उत्तरेकडे, किम्बहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी बिन्दुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिन्धफणा नदीस मिळते. कुण्डलिका ही सिन्धफणेची आणखी एक उपनदी जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिन्धफणा नदीस मिळते. सीना : जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून सीना नदी वाहते. काही अन्तरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे. [३] कयाधु नदी हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व सीमेवरून वाहताना वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा बनते. प्रशासन महसूलमराठवाड्यातील पुढील आठही जिल्ह्यांचा मिळून औरंगाबाद महसुली विभाग तयार झाला आहे. विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे. विभागीय आयुक्त हा या महसुली विभागाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो.
न्यायदानसर्व जिल्ह्यांत जिल्हा न्यायालये आणि इतर न्यायालये आहेत. मुम्बई उच्च न्यायालयाचे खण्डपीठ औरंगाबाद येथे आहे. मराठवाड्यातील आठही जिल्हे आणि लगतच्या अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यांमधून उच्च न्यायालयात आलेल्या खटल्यांचे कामकाज येथे चालते. अर्थव्यवस्था शेती हाच मराठवाड्यातल्या लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. तान्दुळ, डाळी, तेलबिया आणि कापूस यावर आधारित प्रक्रिया उद्योग मराठवाड्यात विखुरलेले आहेत. औरंगाबाद, लातूर, जालना आणि नान्देड शहरांच्या परिसरात उद्योगीकरण झाले आहे. धातू, प्लॅस्टिक, वाहने आणि पेये या क्षेत्रांतील अनेक कारखाने इ. स. १९८० नन्तर मराठवाड्यात वाढले. जालना हा जिल्हा बियाण केन्द्र म्हणून प्रसिद्ध आहे. समाजरचना आणि लोकजीवनशिक्षणसंपादन कराऔरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठआणि नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ही दोन शासननियंत्रित आणि विद्यापीठ अनुदान आयोग(यूजीसी) मान्यताप्राप्त सर्वसाधारण शिक्षणाची विद्यापीठे मराठवाड्यात आहेत. त्याशिवाय परभणी येथे मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. औरंगाबादचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेडचे श्री गुरुगोविंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पीपल्स कॉलेज प्रसिद्ध आहे. इतर अनेक स्वायत्त शिक्षणसंस्था मराठवाड्यात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठसंपादन कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे नागसेन वन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्यामिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते २३ ऑगस्ट १९५८ रोजी झाले.[४] सुरुवातीला मराठवाडा विद्यापीठ एवढेच नाव असलेल्या या विद्यापीठाचा नामविस्तार पुढे महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठअसा केला. या प्रदेशातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. उस्मानाबाद येथे या विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. देशातील विद्यापीठांमध्ये पहिला नाट्यशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आम्बेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू झाला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठसंपादन करानांदेड येथे मुख्यालय असलेल्या या विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेम्बर १९९४ रोजी झाली. निजामाच्या राजवटीतून विभाग मुक्त करण्यासाठी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यन्त चाललेल्या लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे.[५] प्रदेशातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यांतली महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. लातूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठसंपादन करा१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी परभणीत मराठवाडा विभागातील कृषी क्षेत्राच्या विशेष गरजा व लोकभावना लक्षात घेऊन मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील कृषी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल १ जुलै २०१३ रोजी विद्यापीठाचा नामविस्तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असा करण्यात आला. शिक्षण – १९५६ साली परभणी येथे कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेने सुरुवात होऊन आज विद्यापीठांतर्गत १२ घटक व ४३ संलग्न महाविद्यालये आहेत. तसेच ९ घटक व २० कृषि तन्त्र विद्यालये, ३३ संलग्न कृषितंत्र निकेतने आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना कृषिविषयक शिक्षण मिळते. विद्यापीठामध्ये कृषी, उद्यानविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, अन्नतंत्रज्ञान यात दोन वर्षाचा पदव्युत्तर, तर आचार्य पदवी कार्यक्रम हा कृषी शाखेच्या नऊ विषयांत, अन्नतंत्रज्ञान शाखेतील पाच विषयांत, कृषी अभियांत्रिकी शाखेतील चार विषयांत व गृह विज्ञान शाखेत एका विषयात राबविण्यात येतो. संशोधन – विद्यापीठात राज्य शासन अनुदानित ३४ संशोधन योजना व २४ अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प कार्यरत असून आजपर्यंत सव्वाशेपेक्षा जास्त विविध पिकांचे वाण, पंचवीसपेक्षा जास्त कृषी औजारे व यन्त्रे विकसित करून शेतकऱ्यांसाठी सहाशेपेक्षा जास्त तंत्रज्ञान शिफारसी प्रस्तुत केल्या आहेत. विस्तार शिक्षण - विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे कार्य विस्तार शिक्षण गट (१), कृषी तन्त्रज्ञान माहिती केंद्र (१), विभागीय कृषी विस्तार केंद्र (४) तसेच ३ घटक व ८ अशासकीय कृषी विज्ञान केंद्राद्वारे केले जाते. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्यासाठी विद्यापीठ विविध नाविन्यपूर्ण विस्तार शिक्षण उपक्रम नियमित राबवीत असते. दरवर्षी १८ मे रोजी खरीप पीक मेळावा (विद्यापीठ वर्धापनदिन) व १७ सप्टेम्बर या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी रबी पीक मेळावा घेण्यात येतो. शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामाबाबत मार्गदर्शन करून विद्यापीठाने तयार केलेल्या बियाणाचे वाटप केले जाते. सावित्रीबाई फुलेयांच्या जयंती निमित्त ३ जानेवारी रोजी दरवर्षी महिला शेतकरी मेळावा आयोजित होतो. याचा लाभ राज्यातील लाखो शेतकरी बांधव घेतात. विद्यापीठाद्वारे दरवर्षी कृषि दैनंदिनी, कृषी दिनदर्शिका, विविध विषयांवरील पुस्तिका, घडीपत्रिका, शेतीभाती मासिक यांचे प्रकाशन होते. नामांकित शिक्षण संस्थासंपादन करा
साहित्य आणि साहित्यिकसंपादन करा
पुस्तकेसंपादन करा
मराठवाड्यात छापली जाणारी वृत्तपत्रेसंपादन करा
दै.चंपावतीपत्र दै. कार्यारंभ संकीर्णसंपादन करामराठवाड्यातील नामांकित व्यक्तिसंपादन कराराजकारणसंपादन करा
मराठवाडा शिक्षक मतदार संघसंपादन करा१९७४ साली मराठवाड्याला स्वतन्त्र शिक्षक मतदार संघ मिळाला.आज पर्यंत या मतदारसंघातून खालील शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे.
समाजकारण आणि ग्रामीण विकाससंपादन करा
व्यावसायिकसंपादन करा
मराठवाड्यातील साहित्यिकसंपादन करा
मराठवाड्यातील कलावन्तसंपादन करा
मराठवाडा ही साधुसन्तांची भूमी आहे. धार्मिक संस्कृतिपालकसंपादन करासन्त भगवानबाबा सन्त वामनभाऊ महन्त विठठ्ल महाराज शास्त्री (गहिनीनाथ गड) महन्त अजिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड) महन्त काशिनाथ महाराज शास्त्री (नागतळा) ह भ प महादेव भाऊ शेकडे (मसोबाची वाडी)
खेळाडूसंपादन करा
पत्रकारसंपादन कराअनन्त भालेराव प्रशान्त दीक्षित स.मा. गर्गे पर्यटनसंपादन करासिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे औरंगाबाद येथील उद्यान आहे, जे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. हेसुद्धा पाहासंपादन करा
संदर्भसंपादन कराबाह्य दुवेसंपादन करा
| ||||
मराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. औरंगाबाद शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.[१] कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. तीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नान्देड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केन्द्रे आहेत. पैठणचे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. मराठवाड्यास सन्तांची भूमी म्हटले जाते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा