उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले तेर ही कधी काळातली सातवाहन कालीन पुरातन व्यापारी पेठ. आज मुंबईपासून साधारणपणे साडेचारशे किलोमीटरवर असलेले एकेकाळचे हे प्राचीन नगर चिनी प्रवासी ह्युएन सांग यांच्या लेखनातही आढळते. ही नगरी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ते इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत पूर्व सातवाहन, सातवाहन, उत्तर सातवाहन ते वाकाटकांच्या कालखंडापर्यंत वसली होती.
उस्मानाबाद पासून २२ कि.मी. अंतरावर असलेल्या तेर या गावी प्राचीन संस्कृतीच्या पाउलखुणा आजही स्पष्ट जाणवतात. प्राचीन काळात प्रदेशासी व्यापार संबंध असलेले तेर हे गाव प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबाकाका कुंभार यांच्यामुळे महाराष्ट्रला ज्ञात आहे. या गावात जुने राहते घर असून तेरणा नदीच्या काठावर त्यांची समाधी असलेले मंदिर आहे. तर येथील कांही मंदिरे स्थापत्यशास्त्राच्या बांधकामामुळे प्रसिद्ध आहेत. गावाच्या आग्नेय दिशेला श्री नृसिंहाचे एक जुने मंदिर आहे. तर गावच्या मध्यभागी त्रिविक्रमाच्या भव्य अशा मूर्ती समोर विष्णूची मूर्ती आहे.
तेरणा नदीच्या तीरावर वसलेल्या तेर ऊर्फ तगर येथे इसवी सनपूर्व चौथ्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडतात. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात सातवाहन काळात तेर हे महाराष्ट्रातील व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयाला आले. येथून भडोच या बंदरामाग्रे रोमन साम्राज्याशी व्यापार चालत असे. या प्रदेशात पिकणाऱ्या कापसापासून बनवलेले सुती तलम कापड, लाकूड, शंखाच्या बांगडय़ा, इत्यादी वस्तूंना रोमन साम्राज्यात मोठय़ा प्रमाणात मागणी होती. या व्यापारामुळे तगर नगराची भरभराट झाली. परदेशी प्रवासी टॉलेमी आणि ग्रीक खलाशाने लिहिलेल्या ‘पेरिप्लस ऑफ दि एरिथ्रियन सी’ या प्रवासवर्णनात तगर नगराचा उल्लेख सापडतो. त्याच कालावधीत बौद्ध धर्मीयांनी तगर येथे धार्मिक केंद्र उभारले. सातवाहनांनंतच्या यादवांपर्यंत सर्व राजवटींनी या नगरात अनेक मंदिरे बांधली. मध्ययुगीन कालखंडात इतर व्यापारी केंद्रे उदयास आल्याने तगर विस्मृतीत गेले. इसवी सन १९०१ मध्ये हेन्री कझिन यांनी तेर येथे सविस्तर पाहणी करून वृत्तांत प्रसिद्ध केला. त्यानंतर तेर येथे वेगवेगळ्या कालखंडांत पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात आले.
प्राचीन तेर
पर्यटनासाठी घराबाहेर पडायचे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मुंबई, पुण्याजवळची नेहमीचीच ठिकाणे येतात.
पर्यटन म्हणजे केवळ छान छान निसर्गरम्यस्थळांची भटकंती नसते. तर पुरातन काळाच्या खुणा जपणारी काही ठिकाणं आडवाटेवर वसलेली असतात. नेहमीच्या भटकण्याच्या पलीकडे पाहायला लावणारे आणि प्राचीन अस्तित्वाच्या खुणा जपणारे तेर आवर्जून पाहायला हवे.
पर्यटनासाठी घराबाहेर पडायचे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मुंबई, पुण्याजवळची नेहमीचीच ठिकाणे येतात. पर्यटनासाठी उस्मानाबाद, लातूर, नांदेड वगरे जिल्ह्यंत जायचे म्हटल्यावर अनेकांच्या कपाळावर आठय़ा येतात. डोक्याला फार ताण दिला तर उस्मानाबाद जिल्ह्यतील तुळजापूर आणि नळदुर्ग ही ठिकाणे आठवतात. पण उस्मानाबाद, तुळजापूरजवळ असलेले तेर गाव मात्र आठवत नाही. जगभरातील पुरातत्त्वीय अभ्यासक, इतिहासकार, कला अभ्यासक यांना तेर पूर्वीपासूनच सुपरिचित आहे ते तेर येथील रामिलगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालयामुळे. याशिवाय तेरणा नदीकाठी असलेले संत गोरा कुंभार (गोरोबाकाका) यांचे मंदिर, त्याच्या बाजूलाच असलेले चालुक्यकालीन शिव मंदिर, पूर्णपणे विटांनी बांधलेले महाराष्ट्रातील एकमेव उत्तरेश्वर मंदिर व एखाद्या चत्याप्रमाणे रचना असलेले महाराष्ट्रातील एकमेव त्रिविक्रम मंदिर, नृसिंह मंदिर ही ठिकाणे पर्यटनाचा आनंद द्विगुणित करतात.
तेरणा नदीच्या तीरावर वसलेल्या तेर ऊर्फ तगर येथे इसवी सनपूर्व चौथ्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडतात. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात सातवाहन काळात तेर हे महाराष्ट्रातील व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयाला आले. येथून भडोच या बंदरामाग्रे रोमन साम्राज्याशी व्यापार चालत असे. या प्रदेशात पिकणाऱ्या कापसापासून बनवलेले सुती तलम कापड, लाकूड, शंखाच्या बांगडय़ा, इत्यादी वस्तूंना रोमन साम्राज्यात मोठय़ा प्रमाणात मागणी होती. या व्यापारामुळे तगर नगराची भरभराट झाली. परदेशी प्रवासी टॉलेमी आणि ग्रीक खलाशाने लिहिलेल्या ‘पेरिप्लस ऑफ दि एरिथ्रियन सी’ या प्रवासवर्णनात तगर नगराचा उल्लेख सापडतो. त्याच कालावधीत बौद्ध धर्मीयांनी तगर येथे धार्मिक केंद्र उभारले. सातवाहनांनंतच्या यादवांपर्यंत सर्व राजवटींनी या नगरात अनेक मंदिरे बांधली. मध्ययुगीन कालखंडात इतर व्यापारी केंद्रे उदयास आल्याने तगर विस्मृतीत गेले. इसवी सन १९०१ मध्ये हेन्री कझिन यांनी तेर येथे सविस्तर पाहणी करून वृत्तांत प्रसिद्ध केला. त्यानंतर तेर येथे वेगवेगळ्या कालखंडांत पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात आले.
तेर गावात शिरल्यावर प्रथम लागते ते रामिलगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालय. आपल्या गावात परदेशी प्रवासी येतात आणि इथल्या जुन्या वस्तू घेऊन जातात हे पाहून लहान रामिलगप्पाचे कुतूहल जागे झाले. त्याने याबद्दल मुख्याध्यापकांना विचारल्यावर त्यांनी तेर गावच्या इतिहासाबद्दल आणि इथे मिळणाऱ्या वस्तूंच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल रामिलगप्पाला माहिती सांगितली. त्यानंतर रामिलगप्पांनी अशा वस्तू जमवायला सुरुवात केली. हळूहळू गावकऱ्यांनीही आपल्याला सापडलेल्या वस्तू त्यांना आणून द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे रामिलगप्पांचा संग्रह वाढत गेला. आयुष्यभर जमवलेला संग्रह त्यांनी १९७२ मध्ये शासनाच्या हवाली केला. तोच २२,८९२ वस्तूंचा संग्रह आपल्याला रामिलगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालयात पाहायला मिळतो. यामध्ये सातवाहन, चालुक्यकालीन नाणी, मातीची भांडी, दगडात, मातीत बनलेल्या मूर्ती, प्राणिप्रतिमा, पदक, दगडात कोरलेले शिलालेख, गद्धेगाळ, नक्षीकाम, शंखाच्या बांगडय़ा, वस्तू, हस्तीदंती वस्तू, पाण्यावर तरंगणारी वीट इत्यादी अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या संग्रहालयातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहाव्या-सातव्या शतकातील उत्तरेश्वर मंदिराची लाकडी चौकट. मंदिराच्या गर्भगृहाची ही चौकट चिखलात पडून राहिल्याने इतक्या वर्षांनंतरही तशीच्या तशी होती. पुरातत्त्व खात्याने त्यावर काम करून ती संग्रहालयात ठेवलेली आहे. त्यावरील मूर्ती, नक्षीकाम, कोरीव काम पाहण्यासारखे आहे.
वस्तुसंग्रहालय पाहून त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपण गोरोबाकाकांच्या मंदिराजवळ पोहोचतो. या ठिकाणी वारकरी आणि भक्तांचा मोठय़ा प्रमाणात वावर असतो. बाजूला चालुक्य काळातले काळेश्वर मंदिर आहे. या मंदिरात दोन सुंदर वीरगळ पाहायला मिळतात. मंदिराचा कळस आणि गर्भगृह ढासळलेले आहे. त्याची पुनर्बाधणी करण्याची आवश्यकता आहे. मंदिर परिसरात अनेक िपडी, सतीशिळा आणि समाधी पाहायला मिळतात.तेरणा नदी ओलांडून गेल्यावर आपण दाट वस्तीत असलेल्या उत्तरेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. ६-७ व्या शतकात कलचुरी राजवटीत संपूर्णपणे विटांमध्ये बांधलेले हे एकमेव मंदिर आज महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. मंदिराच्या बांधकामात शोभा आणण्यासाठी विविध प्रकारचे नक्षीकाम, मकरशिल्प असलेल्या विटा खास बनवून वापरलेल्या आहेत. मंदिराबाहेर काही वीरगळ पाहायला मिळतात. उत्तरेश्वर मंदिरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर चत्यगृहासारखे गजपृष्ठाकार रचना असलेले त्रिविक्रमाचे मंदिर पाहायला मिळते. हे मंदिरही पूर्ण विटांनी बांधलेले असून मंदिरात श्रीविष्णूची त्रिविक्रम मूर्ती आहे. मंदिरासमोर असलेल्या मंडपात गरुडाची मूर्ती आहे.
एकीकडे राज्य व केंद्र शासन महापुरुषांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या स्मारकांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना, दुसरीकडे महाराष्ट्राचा व भारताचाही एक अनमोल ऐतिहासिक वारसा असलेल्या प्राचीन स्थळाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले तेर ही कधी काळातली सातवाहन कालीन पुरातन व्यापारी पेठ. आज मुंबईपासून साधारणपणे साडेचारशे किलोमीटरवर असलेले एकेकाळचे हे प्राचीन नगर चिनी प्रवासी ह्युएन सांग यांच्या लेखनातही आढळते. ही नगरी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ते इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत पूर्व सातवाहन, सातवाहन, उत्तर सातवाहन ते वाकाटकांच्या कालखंडापर्यंत वसली होती.
सातवाहनांच्या काळात तर तगर उन्नतीच्या अत्युच्च शिखरावर होते. पण नंतरच्या काळात बदललेले हवामान शुष्क वातावरण व दुष्काळ यांच्यामुळे ही संस्कृती हळूहळू लयाला गेली. सातवाहनांच्या काळात तगरचा संबंध हा थेट रोमन साम्राज्याशी होता. भारताला रोम सोबत जोडणार्या व्यापारी मार्गावर तगर एक महत्त्वाचं स्थान होतं. आजही तिथे असलेलं पाचव्या शतकातील त्रिविक्रम मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं असं विटांचं बांधकाम असलेलं मंदिर आहे.
सर्वधर्म समभाव हा जरी आज परवलीचा शब्द असला तरी प्राचीन काळात सातवाहनांनी तो कृतीत उतरून दाखवला होता. स्वतः वैदिक हिंदू असून सुद्धा सातवाहनांनी बौद्ध धर्माला मदत केली होती. आजही तेरला हिंदू, बौद्ध, जैन, इस्लामी अशा सर्व प्रकारचे धार्मिक स्थळ सापडतात.
अलीकडच्या काळात झालेल्या उत्खननामध्ये तेरला अत्यंत बहुमूल्य अशा गोष्टी सापडल्या. आज घरोघरी खाल्ली जाणारी खिचडी ही तेरला 2200 वर्षापूर्वी बनवली जात होती हे ऐकून अनेकांना धक्का बसला. तसेच तेरला सापडलेल्या एका हस्तीदंताच्या बाहुलीसारखी दुसरी एक बाहुली इटलीमधल्या पोंपे येथे आहे.
तेरला प्राचीन काळात लाकडाची तटबंदी होती असेही लक्षात आले आहे. तेरच्या प्रत्येक कोपऱ्यात अशा इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत. कधी कुणाच्या अंगणात एखादी प्राचीन वस्तू सापडते तर कधी शेतात. 2000 च्या आसपास एका शेतकऱ्याला तर आपल्या जमिनीत एक कुंड सापडला!
या प्राचीन वारशाची अवस्था अक्षरश: ‘नाही चिरा नाही पणती’ म्हणावी अशी आहे. तेरला दहा टेकड्या होत्या, ज्यांच्या खाली उत्खनन केल्यावर बरेच पुरातत्वीय अवशेष सापडले असते. दुर्देवाने यातल्या तीन टेकड्या या उध्वस्त झाल्या आहेत. कारण, अनेक मंडळींनी ही माती काढून त्याची बांधकाम व वीटभट्टी यांसाठी विक्री केली किंवा त्याचा खत म्हणून वापर केला. तेरमध्ये उत्खनन केलेल्या एका पुरातत्त्व शास्त्रज्ञाच्या मते ह्यामुळे अनेक अनमोल असे ऐवज, उदाहरणार्थ भांडी, दागिने, खेळणी व बाहुल्या एक तर नष्ट झाले असतील किंवा त्यांची विक्री झाली असेल. समाज या महत्त्वाच्या ऐवजला कदाचित कायमस्वरूपी मुकला असेल हे वेगळे सांगायला नको…
आज तेरला एकूण सात टेकड्या शिल्लक आहेत. म्हणजे, कोट, बैराग, कैकाडी, मुलानी, महार, रेणुका आणि चहुत्रे. या पैकी फक्त रेणुका, कोट व बैराग येथे उत्खनन झाले आहे, अन्य ठिकाणी नाही. हे उत्खनन मोरेश्वर दीक्षित, शा. बा. देव व माया पाटील यांच्यासारख्या तज्ञांनी केले आहे.
“या टेकड्यांची अवस्था आज फार भयंकर आहे. यांचे संरक्षण करणे व मातीचे उत्खनन रोखण्यासाठी रखवालदार नेमणे फार गरजेचे आहे. आम्ही तिथे अनेकदा जायचो. त्यावेळेला लोकांनी तेथे संडास केलेली असल्याचे लक्षात यायचे. पूर्वी तिथे एक रखवालदार होता. पण, तो आता सेवानिवृत्त झालेला आहे. अर्थात एक रखवालदार काय सात टेकड्यांवर पसरलेल्या विस्तीर्ण प्रदेशावर एकटाच रखवालदारी करू शकत नाही. स्थानिक लोकांना या वारशाचे महत्त्व पटवून सांगितले पाहिजे. या वारशाची जपणूक करण्यात त्यांचे भले आहे, हे जर दाखवून द्यायचे असेल तर त्यासाठी पर्यटन प्रकल्प हाती घ्यायला हवा. यामध्ये स्थानिकांचाही सहभाग असेल. पंचक्रोशीत स्वच्छता मोहीम राबवली तर तिथे उघड्यावर संडासला जाण्याचे प्रकार थांबतील,” असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
तेर गावाला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचान वारसा लाभला आहे. यापूर्वी झालेल्या खोदकामात अनेक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत. वस्तुसंग्रहालयाच्या नव्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम सुरू असताना प्राचीन विहीर किंवा आडाच्या आकाराचे अवशेष सापडले.
तेर (जि. उस्मानाबाद) - येथील पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन विहिरीचे अवशेष आढळले. साधारणतः सातवाहन काळातील ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच विहिरीत काही हाडे (अस्थी) आढळल्या. ती प्राण्यांची असल्याचे स्पष्ट झाले असून ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे.
तेर गावाला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचान वारसा लाभला आहे. यापूर्वी झालेल्या खोदकामात अनेक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत. वस्तुसंग्रहालयाच्या नव्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम सुरू असताना प्राचीन विहीर किंवा आडाच्या आकाराचे अवशेष सापडले. ते तत्कालीन विटांनी बांधण्यात आल्याचे दिसून येते. संशोधन, अभ्यासानंतरच हे अवशेष नेमके कसले, हे स्पष्ट होणार आहे. तीन मीटरपर्यंत खोदकाम केल्यानंतर अनेक हाडे आढळली.
उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. प्रकाश घुले, डॉ. सत्यवान अगीवले यांनी नुकतीच त्यांची पाहणी केली. सापडलेल्या वरच्या थरातील हाडे गाय, बैल, अश्व, तर खालच्या थरात मांजर, कुत्रा आदी प्रवर्गाच्या प्राण्यांच्या असल्याचे सांगण्यात आले. ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासले जाणार आहे. बहुतांश ठिसूळ झाली असून वीस टक्के हाडे सुस्थितीत आहेत. पाया खोदकामादरम्यान खापर, जात्याचे अवशेष, शंखाचे मणी आदी वस्तू सापडल्या. त्या सातवाहन काळातील असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
गावाला असा वारसा... मौर्यपूर्व काळापासून ते सातवाहन, राष्ट्रकूट व शिलाहार यांच्या काळापर्यंतचा वारसा तेरला लाभला आहे. सातवाहन काळात येथून देश-विदेशात व्यापार चाले. महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता हे गाव प्रसिद्ध आहे. तेरच्या पोटात अनेक गुपिते आहेत, हे वेळोवेळी झालेल्या उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. सातवाहनकालीन विटांनी बांधलेली घरे, सांडपाण्याची व्यवस्था, सातवाहन राजांची नाणी, मृत्तिकामूर्ती, मणी, रोमन मृत्पात्रे, पुतळ्या, पक्वमृदा, उत्कृष्ट बनावटीच्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा, रंगीबेरंगी दगडांचे आणि काचेचे मणी, उत्कृष्ट कोरीव काम असलेले स्तुपांच्या कठड्यांचे खांब आदी वस्तु व अवशेष यापूर्वीच्या उत्खननात आढळल्या आहेत. यापैकी हजारो वस्तू येथील रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाच्या खोदकामावेळी विहिरीचे अवशेष आढळले असून हे बांधकाम साधारणतः सातवाहन काळातील असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. तेरमध्ये यापूर्वीच्या उत्खन्ननात आढळलेल्या प्राचीन विटांपेक्षा या विहिरीच्या विटांचा आकार मोठा आहे. विहिरीत सापडलेल्या हाडांवर (अस्थी) संशोधन करून अहवाल आल्यानंतरच ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे स्पष्ट होणार आहे. सध्याही खोदकाम सुरू आहे. - अमोल गोटे, सहायक अभिरक्षक, रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय, तेर.
महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता प्रसिद्ध असलेले एक ऐतिहासिक शहर. हे उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबादच्या ईशान्येस ३२ किमी.वर तेरणा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे. त्याचे प्राचीन नाव तगर, तगरपूर वा तगरनगर असून तगरचे पुरावशेष नदीच्या दोन्ही तीरांवर एकूण नऊ पांढरीच्या टेकाडांवर सांप्रत आढळतात. रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे यांना येथे सापडलेल्या प्राचीन कलात्मक वस्तूंच्या संग्रहामुळेच महाराष्ट्र शासनाने येथे संग्रहालय उभारले आहे.
प्राचीन स्त्रीमूर्ती, तेर.
पेरिप्लस ऑफ द एरिथ्रीअन सी(इ. स. ५० – १०३) या ग्रंथात तेरचा उल्लेख आहे. त्या वेळी तगरनगरातून विविध प्रकारचे उत्कृष्ट कापड बॅरगेझ (भरूकच्छ = भडोच, गुजरात राज्य) येथे निर्यात केले जाई. त्याचप्रमाणे तगरमध्ये किनारपट्टीवरून विविध वस्तू आयात केल्या जात, असे पेरिप्लसचा ग्रंथकर्ता म्हणतो. पेरिप्लसव्यतिरिक्त प्राचीन तगरनगर हे इ. स. पहिल्या शतकातील एक व्यापारी पेठ असल्याचा उल्लेख अलेक्झांड्रियाचा भूगोलतज्ज्ञ टॉलेमी (इ. स. सु. ९०–१६९) याच्या प्रवासवर्णनात येतो. बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट आणि विशेषतः शिलाहार या राजवंशांच्या कोरीव लेखांत तगरनगरीचा उल्लेख येतो. सुमारे सतराव्या शतकात या प्राचीन नगरीचे महत्त्व लोप पावले. पेरिप्लसच्या माहितीनुसार तगर हे पैठणच्या पूर्वेस दहा दिवसांच्या प्रवासाइतके दूर आहे, असे लिहिले आहे, तर टॉलेमी याने लिहिलेल्या पुस्तकात तगर हे पैठणच्या ईशान्येस असल्याचा उल्लेख केलेला आहे. या मतमतांतरांमुळे तगर हे स्थळ कोणते व कोठे असावे, याबद्दल अनेक विद्वानांत मतैक्य नाही. वस्तुत: तेर, पैठणच्या आग्नेयेस, पण काहीसे पूर्वेस, १५४ किमी. अंतरावर वसले आहे. पुराणांत याचा उल्लेख सत्यपुरी या नावाने येतो. मात्र प्राचीन काळी तेर हे पैठण, नेवासे, जुन्नर इ. नागरी केंद्रांशी व्यापारी मार्गांनी जोडलेले होते, यात शंका नाही.
इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांनी तेरपरिसरात सापडलेल्या विविध पुराभिलेखांच्या आधारे असे अनुमान काढले आहे की, हे नगर इ. स. सातवे शतक ते इ. स. अकराव्या शतकापर्यंत ‘तगर’ या नावाने परिचित होते, तर सोळाव्या शतकातील अभिलेखात तसेच फार्सी ताम्रपटानुसार (इ. स. १६५९) ही नगरी ‘तेर’ म्हणून ओळखली जात होती, असे सिद्ध होते. त्याचप्रमाणे तेर माहात्म्यासह इतर विविध पुरावे इसवी सनाच्या आरंभापासून येथे सलग वसाहत झाली असल्याची साक्ष देतात.
१९०१ पासून येथील पुरावशेष तसेच प्राचीन वास्तू-मंदिरे संशोधकांना तसेच प्राचीन वस्तुसंग्राहकांना सतत आकर्षित करीत राहिल्याचे दिसून येते. हेन्री कझिन्स यांनी तेरणा नदीच्या दोन्ही तीरांवर आढळणाऱ्या विपुल पुरावशेषांची नोंद घेतली (१९०२-०३). त्यांनी येथील त्रिविक्रममंदिरासह इतर प्राचीन वास्तूंच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. हैदराबाद संस्थानच्या पुरातत्त्व खात्याने तेर येथील पुरावशेष जतन करण्याच्या दृष्टीने पाहणी केली होती (१९२९-३०), तर डग्लस बॅरेट (१९६०) यांनी तेर येथे सापडलेल्या काही महत्त्वपूर्ण कलात्मक वस्तू व मंदिरांचे वर्णन एका पुस्तिकेद्वारे प्रकाशित केले. या कलात्मक वस्तूंतून इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळातील तेरचे वैभव प्रतीत होते. यातील हस्तिदंताची १२ सेमी. उंच मनमोहक कोरीव स्त्रीमूर्ती विशेष लक्ष वेधून घेते. अशाच तऱ्हेच्या हस्तिदंती स्त्रीमूर्ती इटलीतील ज्वालामुखीत (इ. स. ७९) नष्ट झालेल्या पाँपेई या प्राचीन शहराच्या उत्खननात मिळालेल्या आहेत (१९३८). यावरून तेर हे एक कलाकेंद्र होते व त्याचा रोमन नगराशी व्यापारी संपर्क होता, हे सिद्ध झाले आहे.
तेर येथील पांढरीच्या टेकाडाचे उत्खनन प्रथम पुणे येथील डेक्कन कॉलेजचे बी. एन. चापेकर आणि के. डी. बॅनर्जी यांनी पी. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केले (१९५८). त्यानंतर अनेक वेळा (१९६६-६७, १९६७-६८, १९६८-६९, १९७४-७५, १९८७-८८, १९८८-८९ आणि २०१५) येथे निरनिराळ्या संस्थांनी, विद्यापीठांनी महाराष्ट्र शासनातर्फे उत्खनने केली. या उत्खननांमुळे तेरचा सांस्कृतिक इतिहास, मौर्यपूर्व कालखंडापासून ते मध्ययुगीन कालखंडापर्यंत, एकूण पांच खंडांमध्ये विभागता आला; मात्र तेरचा सुसंगत इतिहास मांडणे फारसे शक्य झाले नाही. चापेकर व बॅनर्जी यांनी केलेल्या उत्खननात सातवाहनकालीन वस्तीचा पुरावा उपलब्ध झाला. विटांनी बांधलेली घरे, सांडपाण्याची शोषणकुंडे, सातवाहन राजांची नाणी, पक्वमृदा आणि केओलिनच्या उत्कृष्ट बनावटीच्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा, रंगीबेरंगी दगडांचे आणि काचेचे मणी येथे सापडल्याने सातवाहनकालीन तेरच्या लोकजीवनाची कल्पना करता आली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे मोरेश्वर दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘महार’ नामक पांढरीच्या टेकाडावरील उत्खननात (१९६६-६७) तेरच्या पहिल्या वस्तीचा कालखंड इ. स. पू. सु. ४०० ते २०० म्हणजे मौर्यपूर्व ते मौर्यकाल असा ठरविता आला. हे उत्खनन स्तरनिबद्ध वस्तीचा शोध घेण्यासाठी केले गेले. याच विभागाने पुन्हा दोन वेळा उत्खनन केले (१९६७-६८; १९६८-६९). यांत घरांचे अवशेष सखोलपणे अभ्यासता आले. त्याचप्रमाणे येथील सांस्कृतिक क्रमही पुनश्च सिद्ध झाले. याव्यतिरिक्त प्राचीन बौद्ध स्तूपांचे अवशेष सापडले. या स्तूपांचा व्यास २६ मी. होता. त्यामुळे सातवाहन काळात तेर हे बौद्धधर्माचे मोठे केंद्र होते, असे सिद्ध झाले. उत्कृष्ट कोरीव काम असलेले स्तूपांच्या कठड्यांचे खांब व इतर शिल्पे तेथील वस्तुसंग्रहालयात ठेवलेली आहेत. याशिवाय सातवाहन काळातील नाणी, मृत्तिकामूर्ती, मृत्पात्रे, मणी आणि विशेषतः रोमन मृत्पात्रे व पुतळ्या उपलब्ध झाल्या आहेत.
डेक्कन कॉलेज, पुणे येथील शां. भा. देव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे टी. व्ही. पथी यांनी ‘लामतुरे टेकाड’ (टेकाड क्र.१) येथे प्रामुख्याने सातवाहनपूर्व काळातील सांस्कृतिक अवशेषांची सखोल माहिती प्राप्त करण्याच्या उद्देशाने उत्खनन केले (१९७४-७५). या उत्खननामध्ये मृण्मूर्तींप्रमाणेच सातवाहन राजांची नाणी, मणी तसेच तेरभोवती केलेल्या लाकडी तटबंदीचे अवशेष निदर्शनास आले. सातवाहनांच्या राज्यात तीस तटबंदीयुक्त नगरे होती, असा प्लिनी या रोमन लेखकाने (इ. स. पहिले शतक) केलेला उल्लेख या संदर्भात महत्त्वाचा ठरतो, असे उत्खनकांचे निरीक्षण आहे. त्याचप्रमाणे उत्खननातील संपूर्ण पुराव्यांवरून सातवाहनांच्या प्रारंभीच्या काळात तेर तटबंदीयुक्त नगर होते; तर उत्तरकाळात या नगरात सुखसमृद्धी नांदत होती, तसेच पाश्चात्त्य देशांशी व्यापारविषयक संबंध होते, असे दिसून येते.
तेर येथे विटांचे बांधकाम असलेल्या कुंडांचे अवशेष अनपेक्षित रीत्या उजेडात आले (१९८७). या कुंडांचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अरविंद जामखेडकर व के. डी. कावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनने केली (१९८७-८८, १९८८-१९८९). ही कुंडे सातवाहन काळातील (इ. स. पहिले शतक) असल्याचा निष्कर्ष उत्खनकांनी काढला आहे. या कुंडसंकुलात चापाकृती बांधकामाचे अवशेष, अग्निकुंडसदृश जागेचे अवशेष इ. निदर्शनास आले. या उत्खननात सातवाहनकालीन मृद्भांडी व इतर अवशेष तसेच कुंडांशी निगडित वस्तू तेरणा नदीच्या उत्तर किनाऱ्यापासून २५० मी. अंतरावर सापडल्या. तसेच एक अभिलेख असलेला स्तंभ व बांधकामांचे अवशेष हाती लागले. याशिवाय ३४ सेंमी उंची असलेले पुरुषाचे शिल्प तसेच कमळाचे नक्षीकाम असलेला स्तंभही सापडला. शिल्प व स्तंभ चुनखडीच्या दगडांवर कोरलेले आहेत.
महाराष्ट्र शासनातर्फे येथे जे उत्खनन करण्यात आले (२०१५). त्यात सातवाहन काळातील विविध वस्तू व वास्तूंव्यतिरिक्त प्राचीन तगर नगरीभोवती असणाऱ्या लाकडी तटबंदीचे अवशेष पुनश्च मिळाले.
तेर येथे उपलब्ध झालेल्या असंख्य वस्तू-वास्तूंतून इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळातील तेरचे वैभव आणि कलाप्रियता प्रतीत होते. सातवाहनांच्या नंतर तेरला थोडीशी अवकळा आली; तथापि राष्ट्रकूट-शिलाहार काळांतही हे शहर अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात. त्यातील त्रिविक्रम मंदिराची बांधणी चैत्यासारखी आहे. त्याचा काळ इ. स. दुसरे ते पाचवे शतक या दरम्यानचा आहे. ही वास्तू महाराष्ट्रातील सर्वांत प्राचीन वास्तूंपैकी एक असल्याचे मानले जाते. याशिवाय उत्तरेश्वर आणि काळेश्वर ही राष्ट्रकूट काळातील मंदिरे महत्त्वपूर्ण आहेत. यातील उत्तरेश्वराच्या गर्भगृहाच्या दरवाजाची लाकडी चौकट उत्कृष्ट कोरीव कामाबद्दल व नक्षीदार विटांबद्दल प्रख्यात आहे. वेलबुट्ट्या, विविध प्राणी व मानवी आकृत्या यांनी ती अलंकृत केली आहे.
याशिवाय येथे ज्ञानेश्वरकालीन संत गोरा कुंभार यांचे समाधिस्थळ आहे. तसेच गावात हेमाडपंती बांधणीची सिद्धेश्वर, काळेश्वर, गोरा कुंभार अशी मंदिरे आहेत.
संदर्भ :
Barrett, Douglas Ter, Bombay, 1960.
Chapekar, B. N. Report on the Excavation at Ter, Pune, 1958.
Deotare, B. C.; Joshi, P. S. & Parchure C. N. Glimpses of Ancient Maharashtra Through Archaeological Excavations, Pune, 2013.
Fleet, J. F. ‘Tagar-Terʼ, The Journal of the Royal Asiatic Society of Britain and Ireland, pp. 537-552, July, 1902.
दीक्षित, मो. ग. ‘तेर वस्तुसंग्रहालयातील पुरातन वस्तूंचा परिचयʼ, भारतीय इतिहास आणि संस्कृती, वर्ष ९ वे, पृ. ८०–९४ व १५–३८, मुंबई, एप्रिल व जुलै, १९७२.
देव, शां. भा. तेर, मुंबई, १९८७.
देव, शां. भा. ‘तेर म्हणजेच मराठवाड्यातील तेरʼ, दै. केसरी, १९८३.
खरे, ग. ह. ‘तेर येथील चार शिलालेखʼ, भारत इतिहास संशोधन मंडळ, वर्ष-१४, अंक ४, पृष्ठ ७४-८४, पुणे, १९३४.
कुळकर्णी, ज. बा. ‘सत्यपुरी अथवा तेर माहात्म्यʼ, भारतीय इतिहास आणि संस्कृती, वर्ष ११वे, पृ. १२–३२, जानेवारी, १९७५.
पाठक, अरुणचंद्र, महाराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि पारंपरिक जलव्यवस्थापन, पुणे, २०१७.
भूकंप अन् दुष्काळामुळे झाला होता प्राचीन तगर शहराचा नाश !
उस्मानाबाद जिल्ह्यातील सध्याचे तेर हे गाव प्राचीन काळी म्हणजेच सातवाहन काळात तगर या नावाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून ओळखले जायचे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: September 6, 2018 07:08 PM | Updated: September 6, 2018 07:12 PM
PM
भूकंप अन् दुष्काळामुळे झाला होता प्राचीन तगर शहराचा नाश !
ठळक मुद्देतेर हे गाव प्राचीन काळी म्हणजेच सातवाहन काळात तगर या नावाने ओळखले जायचे.भूकंप आणि दुष्काळामुळे या शहराचा नाश झाल्याचा निष्कर्ष पुरातत्व विभागाने काढला आहे़
- सुमेध वाघमारे
तेर ( उस्मानाबाद) : उस्मानाबाद जिल्ह्यातील सध्याचे तेर हे गाव प्राचीन काळी म्हणजेच सातवाहन काळात तगर या नावाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून ओळखले जायचे. भूकंप आणि दुष्काळामुळे या शहराचा नाश झाल्याचा निष्कर्ष पुरातत्व विभागाने काढला आहे़ त्यामुळे तेरच्या समृद्ध इतिहासाला उजाळा मिळाला आहे.
साधारणत: १९७६ मध्ये पहिल्यांदा तेरचा इतिहास अभ्यासला गेला़ त्यातून ही नगरी सातवाहन काळातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यानंतर २०१५ मध्ये पुरातत्व विभागाच्या उपसंचालक डॉ. माया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेर येथील सर्वात उंच कोट टेकडी, बैरागी टेकडी व कैकाडी टेकडी येथे जवळपास दोन महिने उत्खनन केले. या उत्खननादरम्यान सातवाहन काळातील घराचे अवशेष, तांब्याची नाणी, शंखापासून तयार केलेले वेगवेगळे दागिने, अलंकार मणी, हस्ती दंताची फणी, तांदूळ, गहू, मूग दाळ, तूर दाळ, खापरी भांडे अशा अनेक वस्तू आढळून आल्या होत्या. पुरातत्व विभागाचे १२ अधिकारी दोन महिने येथे तळ ठोकून होते. उत्खननानंतर सदरील वस्तू अभ्यासासाठी मुंबई येथे नेण्यात आल्या. या वस्तूंवर जवळपास तीन वर्षे अभ्यास केल्यानंतर काही निष्कर्षापर्यंत अभ्यासक पोहोचले आहेत़ हे निष्कर्ष नागरिकांचे कुतुहल वाढविणारे ठरत आहेत़
सुती काप व्हायचे निर्यात सातवाहन काळात तेरमध्ये (तत्कालीन तगर) हस्ती दंतावर कलाकुसर करून वेगवेगळ्या वस्तू तयार करणारे कामगार होते. येथे वस्तू तयार करून ते परदेशात व्यापार करीत असत. हे काम करणाऱ्यांची या ठिकाणी मोठी वसाहतच होती. या ठिकाणी सुती कपडा तयार करणारी वसाहत होती. हा कपडा विदेशात निर्यात केला जात होता.
खीर, भात, खिचडीचा आहार सातवाहन काळात तांदूळ, गहू, मूगदाळ, तूरदाळ, बाजरी आदी धान्य उपलब्ध होत. परंतु, त्या काळात धान्य दळण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे तांदळापासून भात, खिचडी तयार केले जात असे. गहू रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खीर तयार करण्यात येत असे.
सांचीच्या स्तुपासाठी तेरमधून मदत या काळात बौद्ध धर्माचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. बौद्ध धर्माच्या त्रिरत्नासारखी धार्मिक चिन्हे असलेले मणी या उत्खननात सापडले होते. सातवाहन राजा हा बौद्ध धर्माचा उपासक होता. त्यामुळे अनेक प्रकारच्या बौद्ध स्तुपांची निर्मिती या ठिकाणी केली गेली. याच काळात सांची येथील स्तूपाच्या बांधकामासाठी तेर येथून सातवाहन राजांनी मदत केली होती.
अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत तेर येथे सन २०१५ मध्ये केलेल्या उत्खननात सापडलेल्या वस्तुंचा अभ्यास केल्यानंतर अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. हा अहवाल राज्यशासनाच्या पुरातत्व विभागाकडे सादर केला आहे. - डॉ. माया पाटील, माजी उपसंचालिका, पुरातत्व विभाग व सोलापूर विद्यापीठाच्या प्रमुख
भारताचा प्राचीन इतिहास अतिशय समृद्ध आहे. प्राचीन काळात भारतात अनेक प्रगत औद्योगिक शहरे होती. विदेशातील शहरांसोबत त्यांचा व्यापारही चालत असे. काळाच्या ओघात ही शहरे लोप पावली. हदप्पासारख्या काही संस्कृती तर जमिनीच्या आत गडप झाल्या.
प्राचीन काळातील महाराष्ट्रातील असेच एक शहर जमिनीच्या आत गाडले गेले. हे ऐतिहासिक प्राचीन औद्योगिक शहर म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘तेर’ होय. संत परंपरा लाभलेले हे स्थळ भारतातील प्राचीन प्रगत शहरांपैकी एक होते. उस्मानाबादपासून केवळ ३२ कि.मी. अंतरावर असलेले ‘तेर’ हे सातवाहन काळात ‘तगरनगरी’ म्हणून प्रसिद्ध होते.
इ.स. पूर्व २०० ते ४०० वर्षांंतले हे शहर असून तेव्हा रोममधून भारतात सोने आणि मद्य आयात केले जात होते. तर भारतातून मसाल्याचे पदार्थ निर्यात होत असत. त्याकाळी तगर नगरी हे भारतातील प्रमुख औद्योगिक केंद्र होते.
१९५८ मध्ये येथे पहिले उत्खनन झाले. त्यानंतर १९६७-६८ मध्ये पुन्हा उत्खनन करण्यात आले. त्यानंतर १९७५ मध्ये उत्खनन झाले. आता पुन्हा उत्खनन सुरु झाले आहे. यामधआये सातवाहन काळातील बांधकाम, तांब्याची नाणी, उथळ भांडी, हस्तीदंतापासून तयार केलेली केस विंचरण्याची फणी, शंखापासून बनवलेले दागिन्यातले मणी, खापराची भांडी अशा अनेक वस्तू सापडल्या आहेत.
उत्खनन करताना येथे भुरकट लाल माती, त्यानंतर पांढरी माती आणि सर्वात खाली काळी माती आढळून आली. मातीच्या या प्रत्येक थरात संस्कृतीतील बदल दिसून येतो. ही काळी माती त्याकाळी जवळूनच वाहणार्या तेरणा नदीला आलेल्या प्रचंड पुरातून जमा झाली असावी आणि या प्रचंड पुरामुळेच तगर शहराचा नाश झाला असावा असाही अंदाज व्यक्त करण्यात येतो.
उत्खननाद्वारे हे शहर बाहेर काढण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य पुरातत्त्व विभागाने हाती घेतला आहे. राज्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून यात राज्यातील संपूर्ण पुरातत्त्व विभाग मिळून काम करणार आहे. यासाठी आॅर्कियोलॉजी सर्व्हे आॅफ इंडिया यांची मदत घेतली जाणार आहे.
सातवाहनकालीन तगर नगरीतील वसाहतीचा होत गेलेला विकास, विस्तार आणि इतर विविध पैलूंवर उत्खननाद्वारे प्रकाश पडेल. हडप्पासारखे प्रगत वसाहतीचे अवशेष या ठिकाणी आढळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तेर येथे उत्खनन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे प्रसिध्द संत गोरा कुंभार यांचे जन्मस्थळ आहे. याच ठिकाणी संत गोरा कुंभारांची समाधीही आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते.
तेरणा नदीच्या काठावर वसलेल्या या गावात पुरातन जैन मंदिर आहे. या मंदिरावरील कोरीव काम अतिशय सुबक आहे.
उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...
नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला ‘ मराठवाडी ’ असं म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता. सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत. मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र , अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू , समाध्या , मंदीरे , मस्जिद , ख्रिश्चन स्मशानभूमी , सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...
केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन शिवमंदिर आहे. याचे स्थापत्य चालुक्य शैलीत केले आहे. आरंभ मराठवाडा परिसर प्राचीन शिल्प स्थापत्य अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत. सातवाहनांपासून यादव काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी ही त्यांची राजधानी होती. वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष वाकाटकांनी राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा