मुख्य सामग्रीवर वगळा

वाकाटक


वाकाटक

वाकाटक हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य आणि समृद्ध साम्राज्य होते. हे वंशाने चंद्रवंंशी यादव होते. इ.स. २५० ते सुमारे ५०० या काळात त्यांनी विदर्भ आणि त्या लगतच्या परिसरावर राज्य केले[१]. या काळात त्यांची सत्ता साधारणपणे, दक्षिणोत्तर नर्मदानदीपासून तुंगभद्रानदीपर्यंत आणि पूर्व-पश्चिम, अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत होती. या राजवंशच्या कार्यकाळात त्यांतील राजांनी संस्कृत आणि प्राकृत कवींना उदार आश्रय दिलेला दिसतो. होणाऱ्या वाङ्मयनिर्मितीत वैदर्भी आणि वच्छोमी पद्धतींना प्राध्यान्य दिलेले आढळते. या राजांच्या मांडलिकांनी आणि अमात्यांनी शिल्पकलेच्या निर्मितीलाही उत्तेजन दिल्याचे आढळते. याची साक्ष अजिंठा व गुलवाडा येथील टेकड्यांवरील लेणी देतात[२]. या लेणांतील शिल्पांची गणना प्राचीनकाळातील उत्कृष्ट कलाकृतींमध्ये केली जाते. त्यामुळेच, ′इसवीसनाच्या तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत दक्षिणेत जे राजवंश झाले त्यांमध्ये वाकाटक राजवंश हा श्रेष्ठ असून त्याच्या कामगिरीने अखिल दक्षिण भारताच्या संस्कृतीवर फार मोठा परिणाम झाला आहे.’ असे एका फ्रेंच इतिहासकाराचे उद्गार आहेत [३].

वाकाटक राजवंशाविषयीच्या संशोधनाची सुरुवात 

सदर राजवंशाचे नावही एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत कोणास ज्ञात नव्हते. इ.स.१८३६ मध्ये सापडलेल्या द्वितीय प्रवरसेनाच्या सिवनी ताम्रपटाने ते पहिल्यांदा उजेडात झाले. पुराणात या राजवंशातील विंध्यशक्ती या राजाचे नाव आढऴते. मात्र अशुद्ध पाठ आणि त्यांचा चुकीचा अन्वयार्थ यामुळे तो यवन वा ग्रीक वंशांतील होता असे समजले जात असे, अशी माहिती महामहोपाध्याय वा.वि. मिराशी आपल्या वाकाटक नृपतीवरच्या ग्रंथात नोंदवितात. वाकाटक घराण्याची वंशावळ अजंठा लेणींतील सोळाव्या क्रमांकाच्या लेणींत असणाऱ्या कोरीव लेखात दिलेली आढळते. ही वंशावळ अगदी सुरवातीपासून म्हणजे विंध्यशक्तीपासून शेवटच्या हरिषेणापर्यंत दिलेली आहे. मात्र सदर कोरीव लेखाच्या वाचनानतंरही इ.स. १८६२ मध्ये डॉ. भाऊ दाजी लाड यांनी लिहिलेल्या लेखात वाकाटक हे यवन वा ग्रीक वंशांतील असून त्यांनी वैदिक यज्ञांना आणि बौद्ध धर्माला उत्तेजन दिले असे म्हटले आहे[४]. वाकाटकांचे अधिकांश लेख हे पेटिकाशीर्षक लिपीत असल्याचे दिसून येते. त्यांच्या साऱ्याच लेखातील काळाचे उल्लेख संबंधित राज्यांच्या राज्यारंभानुसार दिलेले असल्याने त्याच्या काळाविषयी निश्चित विधान करणे अवघड होते. अशावेळी काळनिश्चितीसाठी अक्षरवाटिकेचा अभ्यास करण्याची रीत असते. त्यानुसार डॉ. बुव्हर यांच्या मते इ. स. पाचवे शतक हा वाकाटकांचा काळ येतो, तर डॉ. फ्लिट आणि डॉ. कीलहॉर्न यांच्या मते तो आठवे शतक असा आहे. इ. स. १९१२ साली पुण्यातील एका तांबटाच्या घरी वाकाटक राणी प्रभावती गुप्ते यांचा ताम्रपट सापडला.

राजवंशाची स्थापना 

अजिंठ्याच्या कोरीव लेखात वाकाटकांचा उल्लेख 'द्विज' असा आलेला आढळतो तसेच त्याचे गोत्र 'विष्णुवृद्ध' असल्याचा उल्लेख पुढे उजेडात आलेल्या ताम्रपटातून आढळतो, अशी नोंदही महामोहोपाध्याय वा.वि. मिराशीयांनीआपल्या वाकाटकांवरील ग्रंथात करतात.


भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह 

भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह ( कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम) या नावाची प्राचीन भारतीय कोरीव लेखांविषयीची एक योजना स्वांतत्र्यपूर्व भारतातील पुराभिलेख विभागाने सुरू केली होती. ह्या योजनेअंतर्गत भारतीय उपखंडात सापडणाऱ्या उत्कीर्ण लेखांचे त्या त्या राजवंशांनुसार एकत्रीकरण करून त्या उत्कीर्ण लेखांचा ठसा, त्यांचे लिप्यंतर आणि इंग्रजी अनुवाद अशा आकृतीबंधात प्रसिद्ध करायचे होते. त्यानुसार भारतातील विविध पुराभिलेख विद्वानांकडे राजवंशानुसार त्याचे दायित्व देण्यात आले. यातील वाकाटक राजवंशाच्या कोरीव लेखांचे काम महामहोपाध्याय वा.वि. मिराशी यांनी आपल्याकडे घेतले. ह्या प्रकल्पाद्वारे प्रकाशित होणारे साहित्य इंग्रजी भाषेतून असणार होते. महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी मोठ्या परिश्रमपूर्वक हे काम पूर्ण केले. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या संकेतस्थळावरील प्रकाशनांच्या यादीनुसार हा ग्रंथ इ. स. १९६३ साली प्रकाशित झाला. या ग्रंथाचे नाव ‘इन्क्रिप्शन्स ऑफ वाकाटकाज’असे आहे[५]. हे काम पूर्ण झाल्यावर महामहोपाध्याय वा.वि. मिराशी यांनी आपला झालेला हा अभ्यास, ५ ते ९ मार्च १९५६ या काळात नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित झालेल्या महादेव हरि वाठोडेकर व्याख्यानमालेत चार पुष्पांच्या रूपांत मांडला. पुढे ही व्याख्याने नागपूर विश्वविद्यालयाच्या रजिस्टारने पुस्तकरूपात प्रसिद्ध केली. त्या पुस्तकाचे नाव ‘वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ’ असे आहे[६].

संदर्भ आणि नोंदी 

  1. ^ मिराशी, वा. वि. "वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ": १.
  2. ^ मिराशी, वा. वि. "वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ": १.
  3. ^ मिराशी, वा. वि. "वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ": २.
  4. ^ मिराशी, वा. वि. "वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ": २.
  5. ^ "प्राईज लिस्ट ऑफ पब्लिकेशन्स"आर्किऑलाॅजिकल सर्व्हे ऑफ इंडिया.
  6. ^ मिराशी, वा. वि. "वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ": ३.



🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀



वाकाटक घराणे 

महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली,त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २०० च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.

अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा; पण सन २५० च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.

प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.

पहिल्या प्रवरसेनाने साठ वर्षे (कार. २७० ते ३३०) राज्य केले. त्याला चार पुत्र होते. ते चारही राजे झाले, असे पुराणात म्हटले आहे. तेव्हा प्रवरसेनानंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याचे चार भाग झालेले दिसतात. ज्येष्ठ पातीची राजधानी प्रारंभी नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ नंदीवर्धन येथे आणि नंतर वर्धा जिल्ह्यातील प्रवरपुर (सध्याचे पवनार) येथे होती. हिच्या अंमलाखाली उत्तर विदर्भ होता.

दुसरी शाखा वत्सगुल्म (अकोला जिल्ह्यातील वाशिम) येथे राज्य करीत होती. तिचा अंमल दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरला होता. दुसऱ्या दोन शाखांपैकी एक छत्तीसगढात आणि दुसरी दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात) राज्य करीत असावी. या शाखा १००-१२५ वर्षांत तेथे दुसऱ्या वंशांचे राज्य झाल्यामुळे नष्ट झाल्या असाव्यात. त्यांचे लेख अद्यापि सापडले नाहीत.

नंदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्या शाखेतील पहिला पृथिवीषेण हा गुप्तनृपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता. माळवा-काठेवाड या देशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्ताने त्याचे साहाय्य घेतले असावे. पुढे हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती-गुप्ता वाकाटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिली.

विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला. तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकरसेन नामक मुलाच्या नावाने प्रभावती-गुप्ता राज्यकारभार पाहू लागले. तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यामध्ये कविकुलगुरू कालीदास होता. तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटरवर असलेल्या रामगिरीवर (सध्याच्या रामटेकवर) अनेक वेळा गेला असावा. तेथे त्याला आपल्या नितांतसुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्याने ते काव्य विदर्भातच पुरे केले असे दिसते. दिवाकरसेनानंतर गादीवर आलेल्या दामोदरसेन ऊर्फ प्रवरसेन यांस सेतुबंध नामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासाने मदत केली, अशी प्राचीन आख्यायिका आहे.

द्वितीय प्रवरसेनाचा पुत्र नरेंद्रसेन (कार. ४५० ते ४७०) याच्या काळी वाकाटकांनी आपली सत्ता उत्तरेस माळव्यावर पसरविली. त्याच्या काळात बस्तर जिल्ह्यात राज्य करणाऱ्या नलनृपती भवदत्तवर्म्याने विदर्भावर आक्रमण करून नागपूरपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यावेळी वाकाटकांनी आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली.

नरेंद्रसेनाचा पुत्र द्वितीय पृथिवीषेण याने नलांना विदर्भातून पिटाळून लावले आणि आपली सत्ता मध्य भारतात पूर्वीच्या नागोद संस्थानापर्यंत पसरवली. तेथे त्याच्या मांडलिकाचे दोन लेख सापडले आहेत. द्वितीय पृथिवीषेणाच्या सु. इ.स. ४९० मध्ये झालेल्या निधनानंतर या ज्येष्ठ पातीचे राज्य वत्सगुल्म शाखेच्या राज्यात समाविष्ट झाले.

वत्सगुल्म शाखेचा मूळ पुरुष सर्वसेन हा पहिल्या प्रवरसेनाचा पुत्र होता. त्याने हरिविजय नामक काव्य आणि काही सुभाषिते प्राकृतात रचली. या शाखेचा शेवटचा राजा हरिषेण (कार. ४७५-५००) हा अत्यंत बलाढ्य होता. त्याने आपला अंमल उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतल देशापर्यंत आणि पश्चिमेस कोकणापासून पूर्वेस आंध्र देशापर्यंत बसविला. याच्यानंतर याचा मुलगा नादान निघाल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी विदर्भावर स्वारी केली. त्या लढाईत विदर्भाच्या मांडलिकांच्या फितुरीमुळे हरिषेणाचा मुलगा मारला गेला असे दिसते. याप्रमाणे इ. स. ५२५ चया सुमारास वाकाटक वंशाचा अस्त झाला.

सांस्कृतिक प्रगती : वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते; पण प्रभावती - गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या रामगिरी (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते.

प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते. त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे. तसाच उल्लेख कालीदासाने तेथे रचलेल्या मेघदूतात आला आहे. दुसऱ्या प्रवरसेनांनी आपल्या नावे प्रवरपुर (पवनार-वर्धा) नावाचे नगर स्थापून तेथे राजधानी नेल्यावर आपल्या रामोपासक प्रभावती-गुप्ता मातेकरिता त्या ठिकाणी भगवान रामचंद्राचे उत्तुंग देवालय बांधले होते. त्याचे अवशेष तेथे सापडले आहे.

वाकाटकांनी अनेक विद्वान ब्राम्हणांना ग्रामदाने दिली होती. त्या संदर्भात एकट्या द्वितीय प्रवरसेनाचेच दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वत्सगुल्मच्या हरिषेण राजाच्या वराहदेवनामक मंत्र्याने अजिंठ्याचे क्रमांक सोळाचे लेणे कोरवून घेऊन त्याला सुंदर चित्रांनी विभूषित केले होते. खानदेशातील त्याच्या एका मांडलिकाने सतरा व एकोणीस क्रमांकांची लेणी कोरविली होती.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


वाकाटक घराणे

वाकाटक घराणे : महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली, त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २००च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा. 

अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा पण सन २५०च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.  

प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.  

पहिल्या प्रवरसेनाने साठ वर्षे (कार. २७० ते ३३०) राज्य केले. त्याला चार पुत्र होते. ते चारही राजे झाले, असे पुराणात म्हटले आहे. तेव्हा प्रवरसेनानंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याचे चार भाग  झालेले दिसतात. ज्येष्ठ पातीची राजधानी प्रारंभी नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ नंदीवर्धन येथे आणि नंतर वर्धा जिल्ह्यातील प्रवरपुर (सध्याचे पवनार) येथे होती. हिच्या अंमलाखाली उत्तर विदर्भ होता. दुसरी शाखा वत्सगुल्म (अकोला जिल्ह्यातील वाशिम) येथे राज्य करीत होती. तिचा अंमल दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरला होता. दुसऱ्या दोन शाखांपैकी एक छत्तीसगढात आणि दुसरी दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात) राज्य करीत असावी. या शाखा १००-१२५ वर्षांत तेथे दुसऱ्या वंशांचे राज्य झाल्यामुळे नष्ट झाल्या असाव्यात. त्यांचे लेख अद्यापि सापडले नाहीत. नंदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्या शाखेतील पहिला पृथिवीषेण हा गुप्तनृपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता. माळवा-काठेवाड या देशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्ताने त्याचे साहाय्य घेतले असावे. पुढे हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती-गुप्ता वाकाटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिली. विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला. तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकरसेन नामक मुलाच्या नावाने प्रभावती-गुप्ता राज्यकारभार पाहू लागले. तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यामध्ये कविकुलगुरू कालीदास होता. तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटरवर असलेल्या रामगिरीवर (सध्याच्या रामटेकवर)  अनेक वेळा गेला असावा. तेथे त्याला आपल्या नितांतसुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्याने ते काव्य विदर्भातच पुरे केले असे दिसते. दिवाकरसेनानंतर गादीवर आलेल्या दामोदरसेन ऊर्फ प्रवरसेन यांस सेतुबंधनामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासाने मदत केली, अशी प्राचीन आख्यायिका आहे.  

द्वितीय प्रवरसेनाचा पुत्र नरेंद्रसेन (कार. ४५० ते ४७०) याच्या काळी वाकाटकांनी आपली सत्ता उत्तरेस माळव्यावर पसरविली. त्याच्या काळात बस्तर जिल्ह्यात राज्य करणाऱ्या नलनृपती भवदत्तवर्म्याने विदर्भावर आक्रमण करून नागपूरपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यावेळी वाकाटकांनी आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली. नरेंद्रसेनाचा पुत्र द्वितीय पृथिवीषेण याने नलांना विदर्भातून पिटाळून लावलेआणि आपली सत्ता मध्यभारतात पूर्वीच्या नागोद संस्थानापर्यंत पसरवली. तेथे त्याच्या मांडलिकाचे दोन लेख सापडले आहेत. द्वितीय पृथिवीषेणाच्या सु. इ.स. ४९० मध्ये झालेल्या निधनानंतर या ज्येष्ठ पातीचे राज्य वत्सगुल्म शाखेच्या राज्यात समाविष्ट झाले.  

वत्सगुल्म शाखेचा मूळ पुरुष सर्वसेन हा पहिल्या प्रवरसेनाचा पुत्र होता. त्याने हरिविजयनामक काव्य आणि काही सुभाषिते प्राकृतात रचली. या शाखेचा शेवटचा राजा हरिषेण (कार. ४७५-५००) हा अत्यंत बलाढ्य होता. त्याने आपला अंमल उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतल देशापर्यंत आणि पश्चिमेस कोकणापासून पूर्वेस आंध्र देशापर्यंत बसविला. याच्यानंतर याचा मुलगा नादान निघाल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी विदर्भावर स्वारी केली. त्या लढाईत विदर्भाच्या मांडलिकांच्या फितुरीमुळे हरिषेणाचा मुलगा मारला गेला असे दिसते. याप्रमाणे इ. स. ५२५ च्या सुमारास वाकाटक वंशाचा अस्त झाला. 

सांस्कृतिक प्रगती : वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते पण प्रभावती – गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या रामगिरी (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते. प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते. त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे. तसाच उल्लेख कालीदासाने तेथे रचलेल्या मेदूतात आला आहे. दुसऱ्या प्रवरसेनांनी आपल्या नावे प्रवरपुर (पवनार-वर्धा) नावाचे नगर स्थापून तेथे राजधानी नेल्यावर आपल्या रामोपासक प्रभावती-गुप्ता मातेकरिता त्याठिकाणी भगवान रामचंद्राचे उत्तुंग देवालय बांधले होते. त्याचे अवशेष तेथे सापडले आहे. वाकाटकांनी अनेक विद्वान ब्राम्हणांना ग्रामदाने दिली होती. त्या संदर्भात एकट्या द्वितीय प्रवरसेनाचेच दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वत्सगुल्मच्या हरिषेण राजाच्या वराहदेवनामक मंत्र्याने अजिंठ्याचे क्रमांक सोळाचे लेणे कोरवून घेऊन त्याला सुंदर चित्रांनी विभूषित केले होते. खानदेशातील त्याच्या एका मांडलिकाने सतरा व एकोणीस क्रमांकांची लेणी कोरविली होती. 

वऱ्हांड्यातील छतावरील दंपती शिल्प, गुन्हा क्र. १६, अजिंठा
वऱ्हांड्यातील छतावरील दंपती शिल्प, गुन्हा क्र. १६, अजिंठा
अजिंठ्याच्या क्रमांक सोळा, सतरा, व एकोणीस या गुहात स्थापत्य, शिल्प व चित्रकला यांचे वैशिष्ट्यपूर्ण नमुने असून गुहा क्रमांकसोळा या लेण्यातील अवशिष्ट लेखात, हे लेणे वाकाटक नृपती हरिषेण याचा मंत्री वराहदेव याने आपल्या मातापित्यांच्या पुण्योपचयाकरिता खोदविले आणि शिल्पचित्रांनी सुशोभित करून ते बौद्ध भिक्षुंना दान केले, असा मजकूर आहे. या लेखात वत्सगुल्मच्या वाकाटकांची पूर्ण वंशावळ आली आहे. या लेण्यातील सर्व भित्तींवर गौतम बुद्धाच्या जन्मातील अनेक प्रसंगांची चित्रे काढली होती. त्यांतील काही कालौघात खराब झाली असली, तरी अनेक सुस्थितीत आहेत.  

या लेण्यातील प्रलंबपाद आसनातील बुद्धाची भव्य मूर्ती, मकरवाहन, गंगेची मूर्ती, गंधर्व-अप्सरांची मिथुन शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण असून गौतम बुद्धाच्या चरित्रातील घटनांना अनुलक्षून क्रमाने ती काढली आहेत. चित्रांतील गौतमाची ज्ञानप्राप्ती, अवकाशगामी अप्सरा,नंदाचा धर्मप्रवेश इ. चित्रे लक्षणीय असून त्यांची स्तुती अनेक कलाकोविदांनी मुक्त कंठाने केली आहे. बुद्धाचा मावसभाऊ नंद याने भिक्षू होण्याचे ठरविल्यावर त्याचा सेवक त्याचा मुकुट घेऊन त्याची पत्नी सुंदरी हिच्याकडे येतो. तेव्हा सुंदरी हताश होऊन मरणोन्मुख होते. या ग्लानी येऊन मूर्च्छित झालेल्या सुंदरीचे चित्र कला इतिहासातील एक अप्रतिम कलाकृती आहे. याशिवाय येथे हस्तिजातकमहाउग्मगजातकादी कथांतील प्रसंग चित्रित केलेले आहेत. स्त्रियांच्या गळ्यांतील अलंकार, बोटांतील अंगठ्या, हातांतील बांगड्या आणि केशरचनेचे विविध प्रकार ह्यांतून तत्कालीन दागिन्यांचे नमुने आणि सौंदर्यप्रसाधनांची साधने दृग्गोचर होतात. 

विविध प्राण्यांचा शिल्पपट्ट, गुहा क्र. १७, अजिंठा.
विविध प्राण्यांचा शिल्पपट्ट, गुहा क्र. १७, अजिंठा.

लेणे क्रमांक सतरा हे ॠषिक राजाने आपल्या भावाच्या स्मरणार्थ खोदले असावे, असे एक मत आहे. हे लेणे प्रामुख्याने बौद्ध भिक्षुंच्या निवासासाठी खोदलेला विहार असून हरिषेणाच्या एका मांडलिकाने ते दान केल्याची माहिती या लेण्यातील लेख सांगतो. या लेण्यात मुख्यत्वे बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या जातककथांतील सुंदर चित्रे आहेत. त्यात मानवी सद्गुणांच्या कथांवर अधिकतर भर दिला असून ओवरीच्या छतांवर पुष्पालंकाररचना चितारलेल्या आहेत. ओवरीच्या मागील बाजूस भिंतीवर विश्वंतर जातकातील कथा चित्रित केली आहे. या ठिकाणी विश्वंतर भिक्षा देत असून ती स्वीकारण्यासाठी अनेक याचकांनी गर्दी केली आहे, असे दाखवून चित्रकाराने त्याचे व त्याच्या पत्नीचे वनवासगमन, आकाशातून उडत येणारा इंद्र व त्याच्या अप्सरा यांची अत्यंत मनोवेधक चित्रे चितारलेली आहेत. पडवीच्या प्रवेशद्वाराजवळ छद्दंत जातककथेतील चित्रे असून त्यांत कोचावरील राणी, तिच्या दास-दासी, जवळचे प्रशांत सरोवर, सहा दातांचा हत्ती, व त्याच्या पाठीवरील लांडगा इ. चित्रे आहेत. या लेण्यात महाकपीहंसविश्वंतरसुत्तसोम इ. जातककथांतील प्रसंग चित्रित केले आहेत. बुद्धाचे महाबोधी प्राप्तीनंतरचे चित्र त्यांतील शांत, तेजस्वी भावांमुळे उठून दिसते, तर बुद्धाचे स्वागत करणारी पत्नीयशोधरा व मुलगा राहुल हे चित्र त्यांतील करूणरसांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.  

गुहा क्रमांक एकोणीस ही येथील चार चैत्यलेण्यांपैकी एक चैत्य असून तेथे प्रामुख्याने कोरीवकाम आढळते. या गंधकुटीतील स्तूपात दोन स्तंभांवरील कमानींत बुद्धाची उभी मूर्ती खोदली आहे. या चैत्यात दोन लहान मंदिरे असून उजव्या गर्भगृहात वर्तुळाकार स्तंभ असेल, तरी त्यांची स्तंभशीर्षे चौकोनी आहेत. मंदिराच्या मागील भिंतीवर प्रलंबपाद आसनातील एक बुद्धाची मूर्ती आहे. चैत्यगवाक्षाच्या दोन्ही बाजूंस यक्षमूर्ती खोदल्या असून भिंतींवर बुद्ध प्रतिमा रंगविल्या आहेत. येथे अनेक मिथुन मूर्तीही आहेत. क्रमांक सतराप्रमाणेच येथे बुद्ध, यशोधरा व राहुल यांची चित्रे आहेत. त्याच्या उजवीकडे भिक्षा मागणारा बुद्ध, नागराज, त्याची राणी इत्यादींच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. स्तूपाचा आकार अर्धअंडाकृती आहे. यातील सर्व कोरीवकाम दगडात आहे. तज्ञांच्या मते हे लेणे भारतातील बौद्ध कलेचा सर्वागपूर्ण असा अत्युत्कृष्ट आविष्कार आहे.

अजिंठ्याच्या पश्‍चिमेस सु. सोळा किमी. वर जंजाल गावाजवळ घटोत्कच या नावाने प्रसिद्ध असलेली तीन विहार-लेणी होती. त्यांपैकी दोन अवशिष्ट आहेत. हरिषेणाचा मंत्री वराहदेव याने ती खोदून घेतली, असे तेथील लेखात म्हटले आहे. मोठ्या लेण्यात व्हरांड्याच्या उत्तरेला एक खंडित लेख आहे. त्याचा खालचा भाग अस्पष्ट झाला असून वरील भागात वराहदेवाची सुरुवातीपासूनची वंशावळ दिली आहे. मोठ्या लेण्याच्या द्वारशाखेवर शिल्पांकन आहे. तीत उभ्या बुद्धमूर्ती, मिथुने कोरलेली असून छावणीच्या उंचीवर दोन्ही बाजूस एक-एक देवता आहे. आतील मंडपात चैत्य मंदिर आहे. अर्धस्तंभांवर बुद्धाची मूर्ती आणि ‘ये धर्मा हेतुप्रभवः’ असा श्लोक आहे. मंडपाच्या मागील भिंतीत सिंहासनाधिष्ठित धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्धाची भव्य मूर्ती असून उजवीकडे वज्रपाणी आणि डावीकडे पद्मपाणी यांच्या चामरधारी मूर्ती आहेत पण त्यांच्या हातात हातात कमळे दिसत नाही.

वरील लेण्यांव्यतिरिक्त वाकाटकांनी काही मंदिरे बांधली. त्यांपैकी रामटेक येथील श्रीरामचंद्राचे, प्रवरसेनाने बांधलेले प्रवरेश्वराचे, अश्वत्थखेटकातील विष्णूचे आणि दुसऱ्या प्रवरसेनाने बांधलेले श्रीरामचंद्राचे उत्तुंग मंदिर ही प्रसिद्ध आहेत. ही बहुतेक सर्व मंदिरे अभिलेखशेष झाली आहेत मात्र त्यांचे भग्न अवशेष आढळतात. या अवशेषांत रामटेक येथील वराह दरवाज्याच्या ईशान्येस एक भग्‍न अवस्थेत मंदिर आहे. तेथे फक्त जीर्ण लहान मंडप असून त्याचे छत सपाट आहे. त्याला सहा स्तंभ असून चारांवर पद्मबंधक खोदलेले आहेत. त्याच्या शेजारी चतुर्भुज त्रिविक्रमाची सुंदर मूर्ती भग्नावस्थेत आहे. तिच्या शिरावर किरीटमुकूट असून सभोवती तेजोवलय दाखविले आहे. कानात कुंडले आणि गळ्यात पदकासहीत मुक्ताहार आहे. वैजयंतीमाला दोन्ही पायांवर लोंबती दाखवली असून अधोवस्त्र रशनेने बांधले आहे. त्रिविक्रमाची उभी राहण्याची ढब आणि त्याच्या मुद्रेवरील निश्चय यांतून या संकल्पनेची व्याप्ती स्पष्ट होते.

 प्रवरपुर (पवनार) येथील भग्नावशेष विनोबाजींच्या आश्रमाच्या आवारात एका झोपडीत (भरतभेट) ठेवले असून त्यांमध्ये रामजन्म, वनवासगमन, भरतभेट, सुग्रीव-वालियुद्ध, वालिवध असे रामायणातील कथाप्रसंग विशद करणारे काही शिल्पपट्ट आहे. यांशिवाय येथे एक अतिशय गतिमान अंधकासुर वध मूर्तीचा शिल्पपट्ट आहे. भरतभेट या शिल्पपट्टात राम-सीता, लक्ष्मण, भरत यांच्या लक्षणीय मूर्ती असून त्यांच्या चेहऱ्यांवरील भाव प्रसंगानुरूप दर्शविले आहेत. रामाची मुद्रा गंभीर असून लक्ष्मणाने मात्र उदासीन होऊन तोंड फिरविले आहे. वालिवध या दुसऱ्या शिल्पपट्टात रामाच्या बाणाने घायाळ झालेला वाली रक्तस्त्रावाने व्याकुळ झाला आहे. राम प्रत्यालीढ आसनात उभा आहे. त्याच्या मुद्रेवर तिरस्कारयुक्त अभिमान दिसतो.

कंकाली देवी मंदिर, तिगावा (जि. जबलपूर).
कंकाली देवी मंदिर, तिगावा (जि. जबलपूर).

यांव्यतिरिक्त वाकाटकांची अन्य मंदिरे वा अवशेष आज अस्तित्वात नाहीत परंतु त्यांच्या मांडलिकांच्या प्रदेशातील एक-दोन मंदिरे अद्यापि विद्यमान आहेत. पहिले कंकाळी देवीचे मंदिर जबलपूर जिल्ह्यात बाहूरिबंदजवळ तिगवा या गावी आहे. हा प्रदेश वाकाटकांचे मांडलिक पांडववंशी राजे यांच्या राज्यात मोडत असावा. हे राजे इ. स. पाचव्या शतकात प्रबळ होते, असे बहमनी ताम्रपटावरून दिसते. पांडववंशी भरतबल आपल्या ताम्रपटात  वाकाटक नृपती नरेंद्रसेनाची प्रच्छन्न स्तुती करताना दिसतो. त्यांवरून वाकाटकांचे स्वामित्व त्यांनी मान्य केले होते, असे अनुमान करता येते. त्यामुळेच हे मंदिर वाकाटककालीन स्थापत्य शैलीचा नमुना समजण्यास हरकत नाही, असे मत वा. वि. मिराशी मांडतात. कंकाली देवीचे मंदिर वाकाटक-गुप्तशैलीप्रमाणे सपाट छपराचे व चौरस असून त्यातील गर्भगृह अडीच मीटर लांबी-रुंदीचे चौरसच आहे. द्वारशाखा पाकळ्यांमध्ये कोरलेल्या सिताफळांच्या आकृत्यांनी सुशोभित केली आहे. गणेशपट्टीच्या दोन्ही बाजू वाढवून तिच्या खाली डावीकडे गंगा व उजवीकडे यमुना या नदीदेवतांचे सुंदर शिल्पपट्ट बसविले आहेत. गंगा-यमुनांच्या मूर्ती हे गुप्तकालीन मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. गंगादेवी एका मकरावर त्रिभंगात उभी आहे. तिच्या डाव्या बाजूस एक स्त्री व उजव्या बाजूस चामरधारी सेवक उभा आहे. मूर्तीच्या वरील भागात सीताफळाच्या झाडाची कमान आहे. गंगा उजव्या हाताने सीताफळ तोडीत आहे. गंगेने बहुविध अलंकार धारण केलेले असून तिच्या केशपाशात मुक्तायुक्त ललाटीका, कानात वर्तुळाकार कुंडले, गळ्यात मुक्ताफलकहार, बाहूंवर केयूर, मणिबंधात वलये, कमरेला रशना व पायात नूपुर आहेत. शिवाय गळ्यातील वैजयंतीमाला गुडघ्यापर्यंत लोंबकळत आहे. तिची त्रिभंग अवस्था आणि मुखावरील प्रसन्नता यांमुळे हे शिल्प लक्षणीय ठरले आहे. यमुनेची मूर्तीही अशाच प्रकारची आहे. यमुना कुर्मावर त्रिभंगात आम्रवृक्षाखाली उभी असून डाव्या हातानी तिने वृक्षाची फांदी धरली आहे.

दुसरे मंदिर विंध्यप्रदेशात नाचना कुठारा या गावी आहे. येथे वाकाटक नृपती दुसरा पृथिवीषेण याचा मांडलिक उच्चकल्पवंशी व्याघ्रदेव याचा शिलालेख मिळाला. त्यावरून तो भाग वाकाटकांच्या आधिपत्याखाली होता, असे अनुमान वा. वि मिराशी काढतात. साहजिकच येथील पार्वतीचे मंदिर वाकाटककालीन असावे. त्याप्रमाणे हेही मंदिर सपाट छपराचे असून गर्भगृहद्वाराच्या चौकटीच्या आतील पट्टीवर नक्षीकाम असून बाहेरील शिल्पपट्टात दंपतिशिल्पे आहेत. द्वाराच्या दोन्ही बाजूंस तिगव्याप्रमाणेच गंगा-यमुनांच्या मूर्ती आहेत. प्रदक्षिणापथाच्या भिंतींवर बाहेरच्या बाजूंस सिंह, अस्वल, हरिणे, मोर,माकडे इ. पशु-पक्षी आणि यक्षगण, सुरसुंदरी इत्यादींच्या मुर्ती खोदल्या आहेत. एका ठिकाणी गोवर्धन पर्वत-उद्धाराचा शिल्पपट्ट दिसतो. मागील भिंतींवर नाग-नागी आणि  नाग बालक यांच्या मूर्ती आहेत.तिगवा व नाचना कुठारा येथील मंदिरे ही प्रामुख्याने उत्तरेकडील वाकाटक-गुप्तकालीन वास्तुशैलीतील वाकाटक साम्राज्याबाहेरील मंदिरे आहेत मात्र बाकाटकांच्या कलेचे वस्तुनिष्ठ दर्शन अजिंठ्याच्या गुहा क्र. सोळा, सतरा व एकोणीस तसेच विदर्भातील अवशिष्ट भग्न अवशेषांतुन घडते.

संस्कृत व प्राकृत वाङ्‍मयाला वाकाटकांच्या काळी अतिशय बहर आला होता. तत्कालीन संस्कृत काव्यांवरून वैदर्भीनामक विशिष्ट रीती किंवा शैली प्रसिद्धीस आली. दंडी, वामन वगैरे आलंकारिकांनी तिची सर्वगुणयुक्त अशी प्रशंसा केली आहे. तिच्या गुणांमुळे कालिदासादी अन्य देशीय कवींनीही त्याच शैलीत आपली काव्ये रचली. कालिदासाचे मेदूत हे सुधामधुर काव्य या काळात विदर्भात रचले गेले. स्वतः वाकाटक नृपतींनी प्राकृतात उत्कृष्ट काव्यरचना  केली. दुसऱ्या प्रवरसेनाचे सेतुबंध हे काव्य माहाराष्ट्री प्राकृतात रचलेले अद्यापी उपलब्ध आहे. त्यात सेतुबंधापासून रावणवधापर्यंतचे रामचरित पंधरा  आश्वासांत (सर्गांत) वर्णिले आहे. या काव्याची बाणभट्ट, दंडी, आनंदवर्धन इत्यादिकांनी अत्यंत स्तुती केली आहे. या काव्याच्या रचनेत महाराजाधिराज विक्रमादित्याच्या आज्ञेने कालिदासाने प्रवरसेनास मदत केली, अशी आख्यायिका एका प्राचीन टीकाकाराने उल्लेखिली आहे. ती अंतस्थ पुराव्यावरून खरी वाटते. वत्सगुल्म शाखेचा संस्थापक सर्वसेन याने हरिविजय नामक उत्कृष्ट काव्य माहाराष्ट्री  प्राकृतात रचले होते, असे संस्कृत काव्यालंकार  ग्रंथातील अनेक उल्लेखांवरून आता ज्ञात झाले आहे. त्यामध्ये कृष्णाच्या  पारिजातहरणाचे कथानक घेतले होते. याचीही अनेक आलंकारिकांनी स्तुती केली आहे. याशिवाय प्रवरसेन, सर्वसेन इ. वाकाटक नृपतींनी कित्येक सुंदर प्राकृत सुभाषिते रचली होती. त्यांपैकी काही नंतर गाथासप्तशतीत घालण्यात आली.

पहा : अजिंठा गुप्तकाल प्रभावती-गुप्ता.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Classical Age, Bombay, 1970.

           2. Yazdani, Gulam, Ed, TheEarly History of the Deccan, London, 1960.  

           ३. मिराशी, वा. वि. वाकाटक नृपति आणि त्यांचा काल, नागपूर, १९५७.

           ४. सांकलिया, ह. धी. माटे, म. श्री. महाराष्ट्रातील पुरातत्त्व, मुंबई, १९७६. 

मिराशी, वा. वि. देशपांडे, सु. र.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

छत्तीसगढ़ पीसीएस प्रश्नपत्र 2019

डेली अपडेट्स

 
भारतीय इतिहास

वाकाटक वंश

  • 27 Jan 2020
  •  
  • 11 min read

प्रीलिम्स के लिये:

वाकाटक वंश के बारे में

मेन्स के लिये:

वाकाटक वंश समकालीन शासन व्यवस्था, शासन में महिलाओं की भूमिका

चर्चा में क्यों?

नागपुर के समीप रामटेक तालुका के नागार्धन में हुई हालिया पुरातात्विक खुदाई में, तीसरी और पाँचवीं शताब्दी के बीच मध्य एवं दक्षिण भारत के कुछ हिस्सों पर शासन करने वाले वाकाटक वंश (Vakataka Dynasty) के जीवन, धार्मिक संबद्धता और व्यापार प्रथाओं के विषय में कुछ ठोस साक्ष्य प्राप्त हुए हैं।

खुदाई स्थल के विषय में

  • नागार्धन/नागवर्धन नागपुर ज़िले का एक बहुत बड़ा गाँव है, जो रामटेक तालुका से लगभग 6 किमी. दक्षिण में अवस्थित है। इस स्थान पर 1 कि.मी. से 1.5 कि.मी. क्षेत्र में पुरातात्विक अवशेष पाए गए।
  • शोधकर्त्ताओं ने वर्ष 2015-2018 के दौरान इस स्थल पर खुदाई की थी।
  • इस क्षेत्र में नदी के किनारे स्थित कोटेश्वर मंदिर 15वीं-16वीं शताब्दी का है। मौजूदा गाँव प्राचीन बस्ती के ऊपर स्थित है।
  • नागार्धन किला वर्तमान के नागार्धन गाँव के दक्षिण में स्थित है। इस किले का निर्माण गोंड राजा के काल में हुआ था और बाद में 18वीं एवं 19वीं शताब्दी के दौरान नागपुर के भोसलों द्वारा इसका नवीनीकरण और पुनः उपयोग किया गया। किले के आसपास के क्षेत्र में खेती कार्य किया जाता है और यही पर पुरातात्विक अवशेष पाए गए हैं।

यह खुदाई महत्त्वपूर्ण क्यों है?

  • तीसरी और पाँचवीं शताब्दी के मध्य के शैव शासकों ‘वाकाटकों’ के बारे में बहुत कम जानकारी प्राप्त थी। इस राजवंश के बारे में अभी तक जो भी जानकारी प्राप्त थी वह यह कि ये महाराष्ट्र के विदर्भ क्षेत्र से संबंधित थे, यह जानकारी कुछ साहित्यिक रचनाओं और ताम्रपत्रों के माध्यम से मिली थी।
  • इनके विषय में ऐसी धारणाएँ थीं कि उत्खनित स्थल नागार्धन वाकाटक की पूर्वी शाखा की राजधानी नंदीवर्धन के समान ही है। इस पुरातात्विक साक्ष्य के बाद नागार्धन को वाकाटक साम्राज्य की राजधानी माने जाने की धारणा को बल मिला है।
  • विद्वानों का मत है कि इस स्थल की खुदाई करने वाले पुरातत्त्वविदों ने इस स्थल का  विस्तृत प्रलेखन नहीं किया था इसलिये इसका एक पुरातात्विक अन्वेषण आवश्यक था।
  • पुरातत्वविदों द्वारा की गई खुदाई के दौरान, कुछ नए पहलू सामने आए जिन्होंने वाकाटक वंश के जीवन के विषय में और अधिक जानकारी प्रदान की। इसके अलावा विद्वानों ने इस राजवंश के धार्मिक जुड़ावों, शासकों के निवास स्थलों, महलों के प्रकार, उनके शासनकाल के दौरान प्रसारित हुए सिक्कों और मुहरें, और उनके व्यापारिक व्यवहार के बारे में भी खुलासा किया।

वाकाटक वंश

  • इस वंश की स्थापना 255 ई. में विन्ध्य शक्ति ने की थी।
  • इस वंश का सबसे प्रसिद्ध शासक राजा प्रवरसेन प्रथम था। अपने शासनकाल में उसने सम्राट की उपाधि की तथा चार अश्वमेघ यज्ञों का आयोजन किया।
  • वाकाटक ब्राह्मण धर्म के पक्षधर थे। ये स्वयं भी ब्राह्मण थे और इन्होंने ब्राह्मणों को खूब भूमि-अनुदान दिये।
  • सांस्कृतिक दृष्टि से वाकाटक राज्य ने ब्राह्मण घर्म के आदर्शों और सामाजिक संस्थाओं को दक्षिण की ओर बढ़ाने में एक महत्त्वपूर्ण सेतु के रूप में कार्य किया।

इस प्रकार की पुरातात्विक खोजों का क्या महत्त्व है?

  • यह पहली बार है कि जब नागार्धन से हुई खुदाई में मिट्टी से निर्मित मुहरे प्राप्त हुई है। ये अंडाकार मुहरें प्रभातगुप्त, वाकाटक वंश की रानी के समय की है। इन मुहरों पर शंख के चित्रण के साथ ब्राह्मी लिपि में रानी का नाम मुद्रित है।
  • मुहर का वज़न 6.40-ग्राम है, ये मुहरें 1,500 वर्ष पुरानी है, इनकी माप (प्रति मुहर) 35.71 मिमी- 24.20 मिमी, मोटाई 9.50 मिमी है। मुहरों पर मुद्रित शंख के विषय में विद्वानों का तर्क है कि यह वैष्णव संबद्धता का एक संकेत है।
  • इस मुहर को एक विशाल दीवार के ऊपर सजाया गया था, शोधकर्त्ताओं के अनुसार, यह राज्य की राजधानी में अवस्थित एक शाही ढाँचे का हिस्सा हो सकता है। अभी तक वाकाटक लोगों या शासकों के घरों या महलनुमा संरचनाओं के प्रकार के बारे में कोई पुरातात्विक साक्ष्य प्राप्त नहीं हुआ है।
  • रानी प्रभाववती गुप्त द्वारा जारी ताम्रपत्र गुप्तों की एक वंशावली से शुरू होता है, जिसमें रानी के दादा समुद्रगुप्त और उनके पिता चंद्रगुप्त द्वितीय का उल्लेख है। वाकाटक की शाही मुहरों पर मुद्रित वैष्णव उपस्थिति इसके दृढ़ संकेतक हैं, जो इस बात को पुन: स्थापित करते हैं कि रानी प्रभाववती गुप्त वास्तव में एक शक्तिशाली महिला शासक थीं।
  • चूँकि वाकाटक लोग भूमध्य सागर के माध्यम से ईरान तथा अन्य देशों के साथ व्यापार करते थे, इसलिये विद्वानों का मत है कि इन मुहरों का इस्तेमाल राजधानी से जारी एक आधिकारिक शाही अनुमति के रूप में किया जाता होगा। इसके अलावा इनका उपयोग उन दस्तावेज़ों पर किया गया होगा जिनके लिये शाही अनुमति अनिवार्य  होती होगी।

रानी प्रभाववती गुप्त के विषय में प्राप्त जानकारी इतनी महत्त्वपूर्ण क्यों हैं?

  • वाकाटक शासकों को उनके समय के अन्य राजवंशों के साथ कई वैवाहिक गठबंधन स्थापित करने के लिये जाना जाता था। ऐसे ही प्रमुख वैवाहिक गठबंधनों में से एक है शक्तिशाली गुप्त वंश की राजकुमारी प्रभावती गुप्त क्योंकि गुप्त वंश उस समय उत्तर भारत पर शासन कर रहा था।
  • शोधकर्त्ताओं के अनुसार, गुप्त शासक वाकाटकों की तुलना में अधिक शक्तिशाली थे। वाकाटक राजा रुद्रसेना द्वितीय से विवाह करने के बाद, प्रभाववती गुप्त ने मुख्य रानी का पद धारण किया। रुद्रसेना द्वितीय के आकस्मिक निधन के बाद जब उसने वाकाटक राज्य की कमान संभाली, तो महिला वाकाटक शासक के रूप में उसका महत्त्व और अधिक बढ़ गया। यह इस तथ्य से स्पष्ट है कि एक शासिका के रूप में उसके शासन कल में मुहरें जारी की गई, वह भी राजधानी नागार्धन से।
  • विद्वानों के अनुसार, रानी प्रभाववती गुप्त देश की उन चुनिंदा महिला शासकों में से एक थीं, जिन्होंने प्राचीन काल में किसी राज्य पर शासन किया था। वाकाटक वंश में इसके इतर किसी अन्य महिला उत्तराधिकारी के विषय में कोई साक्ष्य प्राप्त नहीं हुआ है।

वैष्णव संबद्धता के संकेत क्या महत्त्व है?

  • वाकाटक शासकों ने हिंदू धर्म के शैव संप्रदाय का अनुपालन किया, जबकि गुप्त वंश वैष्णव धर्म का अनुयायी था। उत्खननकर्त्ताओं के अनुसार, रामटेक में पाए गए वैष्णव संप्रदाय से जुड़े कई धार्मिक ढाँचे रानी प्रभाववती गुप्त के शासनकाल के दौरान बनाए गए थे। जबकि उसका विवाह एक ऐसे परिवार में हुई था जो शैव संप्रदाय से संबंधित था, रानी को शासिका के रूप में प्राप्त शक्तियों ने उसे अपने आराधक अर्थात् भगवान विष्णु को चुनने का अधिकार प्रदान किया।
  • शोधकर्त्ताओं का मानना ​​है कि महाराष्ट्र में नरसिंह की पूजा करने की प्रथा रामटेक से ही निकली थी, साथ ही महाराष्ट्र के विदर्भ क्षेत्र में वैष्णव प्रथाओं के प्रचार में रानी प्रभाववती गुप्त की एक महत्त्वपूर्ण भूमिका थी। रानी प्रभाववती गुप्त ने लगभग 10 वर्षों तक शासन किया जब तक कि उसके पुत्र प्रवरसेन द्वितीय ने सत्ता नहीं संभाल ली।

नागार्धन से अभी तक कौन-से अवशेष प्राप्त हुए हैं?

  • इस क्षेत्र में पूर्व में हुई खुदाई में मृद्भांड, एक पूजा का स्थल, एक लोहे की छेनी, हिरण के चित्रण वाला एक पत्थर और टेराकोटा की चूड़ियों के रूप में प्रमाण मिले हैं।
  • टेराकोटा से बनी कुछ वस्तुओं में देवताओं, पशुओं और मनुष्यों की छवियों को भी चित्रित किया गया साथ ही ताबीज एवं पहिये आदि भी प्राप्त हुए हैं।
  • भगवान गणेश की एक अखंड मूर्ति, जिसमें कोई अलंकरण नहीं था, वह भी प्राप्त हुई जो इस बात की पुष्टि करती है कि उस काल के दौरान भगवान गणेश की आराधना सामान्य थी।
  • वाकाटक लोगों की आजीविका के साधनों में पशु पालन की महत्त्वपूर्ण भूमिका थी। घरेलू जानवरों की सात प्रजातियों- मवेशी, बकरी, भेड़, सुअर, बिल्ली, घोड़ा और मुर्गे के अवशेष भी प्राप्त हुए हैं।

स्रोत: इंडियन एसप्रेस

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वाकाटकांचा महत्त्वपूर्ण इतिहास

 | Updated: 28 Oct 2018, 04:00:00 AM

मोहन शिरसाटस्लग - दुर्मीळवाकाटक घराण्यातील लेखांचे संपादन व संशोधन वा वि...

    

मोहन शिरसाट

...

स्लग - दुर्मीळ

...

वाकाटक घराण्यातील लेखांचे संपादन व संशोधन वा. वि. मिराशी यांनी ते 'वाकाटक नृपति आणि त्यांचा काल' या ग्रंथात मांडले. वाकाटक घराण्याचा हा विश्लेषणयुक्त इतिहास अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा आहे.

...

'वाशीम जिल्ह्याचा इतिहास' या ग्रंथाचे लेखन करण्यासाठी स्थानिक इतिहासाचा धांडोळा घेताना एक अत्यंत दुर्मीळ व उपयुक्त ग्रंथ हाताशी लागला. महामहोपाध्याय वासुदेव विष्णू मिराशी (वा. वि. मिराशी) यांचे 'वाकाटक नृपति आणि त्यांचा काल'. १९५७ मध्ये नागपूर विश्वविद्यालयाने हा ग्रंथ प्रकाशित केला. विश्वविद्यालयाच्या महादेव हरि वाठोडकर व्याख्यानमालेत श्री. मिराशी यांनी मराठीतून वाकाटक नृपतिंचा इतिहास मांडला. वाकाटक नृपतिंच्या शिलालेख व ताम्रपट स्वरुपातील २६ लेखांपैकी निम्म्यापेक्षा जास्त लेखांचे वाचन, संपादन आणि विश्लेषण खुद्द मिराशींनी केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या संशोधनाला इतिहासअभ्यासात अनन्यसाधारण महत्त्व आजही आहे. विशेष म्हणजे १९१४ मध्ये डॉ. व्हिसेंट स्मितने प्रकाशित केलेल्या 'प्राचीन भारतीय इतिहास' या ग्रंथात वाकाटकांचा उल्लेखही नव्हता. त्यानंतरच्या ४० वर्षांत झालेल्या संशोधनाचे श्रेय श्री. वा. वि. मिराशींना आहे, पर्यायाने या ग्रंथाला आहे, असे 'पुरस्कार' या शीर्षकात पाठराखणमध्ये कुलगुरू के. तु. मंगलमूर्ती यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे वाकाटकांचे साम्राज्य नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत, तर इकडे अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत होते. या ग्रंथाने वाकाटक घराण्याचा इतिहास उजेडात आला. सातवाहनानंतर साधारणतः इ. स. २५० मध्ये वाकाटकांचा उदय झाला. इ. स. ५५० पर्यंत त्यांनी या प्रदेशावर अंमल केला. प्राचीन काळातील गुप्त घराणे आणि वाकाटक घराणे यांचे 'सुवर्णयुग' म्हणून ख्याती आहे. कारण याच काळात धर्म, संस्कृती, प्राकृत वाङ्मय, स्थापत्य, शिल्प आणि चित्रकला इत्यादींचा मोठा उत्कर्ष झाला आहे. पण डॉ. स्पिंकच्या मते खरा सुवर्णकाळ म्हणजे वाकाटक काळच होय. कारण वाकाटकांच्या काळात विशाल साम्राज्य उत्पन्न होऊन शांतता प्रस्थापित झाली होती. परदेशांशी व्यापार वाढला होता. भारतीय संस्कृतीचा प्रसार इतर देशात झाला. कीर्ती दिगंतात गेली. याचा आधार म्हणजे वाकाटकांनी कोरलेले अजिंठा लेणे. लेण्यांतील स्थापत्य, शिल्प, चित्र एकूणच वैभव होते या काळात. अशा वाकाटक घराण्यातील लेखांचे संपादन व संशोधन श्री. मिराशी यांनी या ग्रंथात मांडले आहे. वाकाटक नृपतिंचे १७, मांडलिकांचे ३, वत्सगुल्म शाखेचे २ आणि अमात्यांचे ३ लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्या सर्व लेखांचे वाचनासह विश्लेषण मांडल्याने अभ्यासकांसाठी ते अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे आताच्या इतिहास अभ्यासकांना या ग्रंथाचा संदर्भ घेतल्याशिवाय पुढे जाता येत येणार नाही. मी माझ्या इतिहासाच्या ग्रंथासाठी अनेक ग्रंथांचे संदर्भ घेतलेले आहे. त्या प्रत्येक ग्रंथकर्त्याने वाकाटकांचा इतिहास देताना 'वाकाटक नृपति आणि त्यांचा काल' या ग्रंथाचा संदर्भ घेतलेला आढळला.

शासनानेही महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांचे लेखन 'ऑर्कीऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया' अंतर्गत अनेक खंडात प्रकाशित केले आहे. ते सर्व इंग्रजीतून उपलब्ध आहे. वाकाटक नृपतिंचा सचिव वराहदेव याने अजिंठ्याचं १६ क्रमांकाचं लेणं कोरवली. याच लेणीतील शिल्प-चित्रांनी उच्चांक गाठला आहे. जगप्रसिद्ध सर्वोत्कृष्ट लेण्यांपैकी हे एक लेणं आहे. त्यालाच लागून १७ आणि १९ क्रमांकांच्या लेण्या वाकाटकांचे मांडलिक ऋषिक (खानदेश) देशाच्या अधिपतीने कोरवून बौद्ध संघास दान केल्यात. त्याचबरोबर अजिंठ्याच्या पश्चिमेला घटोत्कच लेणी वाकाटक नृपति हरिषेण याचा मंत्री वराहदेव याने कोरविली. येथे वाकाटकांची वंशावळ शिलालेखावर कोरलेली आहे. त्यावरूनच वाकाटक घराण्याची वंशावळ जगाला माहीत झाली. हे उपयुक्त संशोधन या ग्रंथात पहिल्यांदा मांडलंय. त्यामुळेच वाकाटकांच्या संपन्न साम्राज्याला इतिहासात स्थान मिळाले आहे. वाकाटक नृपतिंच्या दोन शाखा स्थापन झाल्या. रूद्रसेनाने रामटेकजवळ नन्दिवर्धन (ज्येष्ठ शाखा), तर सध्याचे वाशीम व प्राचीन वत्सगुल्मला सर्वसेनाने राज्य स्थापन केले.

वाकाटक घराणे बौद्धउपासक, शिवोपासक आणि विष्णुउपासक अशा तिन्ही परंपरेशी तीन शतकांत संक्रमित होताना दिसते. मूळ पुरुष वाकाटक गृहपती यांनी आंध्र प्रदेशातील अमरावती गावात बौद्धांना पुण्यक्षेत्री दानकृत्य केल्याचा शिलालेख आहे. तर नंतरच्या प्रवरसेनाने वैदिक धर्माप्रमाणे ४ अश्वमेध केले. वाकाटक घराण्याचे सचिव वराहदेव यांचे घराणेसुद्धा वाकाटकांशी पिढी दर पिढी संलग्न होते. हे निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे.

वाकाटक घराणे व त्यांचा इतिहास किती वैभवशाली होता, याचे अनेक दाखले पुराव्यानिशी या ग्रंथात दिलेले आहेत. १९१२ मध्ये पुण्यात एका तांबटाच्या घरी प्रभावती गुप्तचा ताम्रपट सापडला. वाकाटक नृपति रूद्रसेन यांची ती पट्टराणी आणि उत्तरेकडील गुप्त घराण्याचे द्वितीय चंद्रगुप्त यांची ती कन्या होती. याचे संदर्भ या ग्रंथात असल्याने गुप्त आणि वाकाटक घराण्यांच्या संबंधांवर प्रकाश टाकला आहे. वाकाटकांच्या साम्राज्यात महाकवी कालिदास यांना आपली काव्य रचण्याची स्फूर्ती झाली. वाकाटक राजानेसुद्धा 'हरिविजय' व 'गाथासप्तशती'सारखे प्राकृत ग्रंथ लिहिलेत. त्यामुळेच वत्सगुल्ममधील या प्राकृत काव्याची 'वच्छोमी रीती' सर्वत्र मान्यता पावली. 'वात्सायनाचे कामसूत्र' या ग्रंथातही वत्सगुल्मचा उल्लेख आहे. मुळात संस्कृत, प्राकृत आणि पाली भाषेत पारंगत असलेले श्री. मिराशी यांनी या ग्रंथामुळे ज्ञानाचे दालनच यानंतरच्या पिढीला खुले करून दिले आहे. अजिंठ्याचे गेल्या ६० वर्षांपासूनचे अभ्यासक डॉ. वाल्टर स्पिंक यांनीसुद्धा अलीकडेच एका मुलाखतीत श्री. मिराशींच्या या संशोधन कार्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. या ग्रंथाच्या शेवटी वाकाटककालीन कलाकृतींचे छायाचित्र, ताम्रपटाची फोटोकॉपी आणि वाकाटक साम्राज्याचा नकाशा आहे, जी इतिहास अभ्यासकांसाठी मोलाची आहे.

...

Sumit Sarwade

🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...