मुख्य सामग्रीवर वगळा

मराठवाड्याचा वाङ्मयीन लेखाजेखा


​ मराठवाड्याचा वाङ्मयीन लेखाजेखा

 | Updated: 19 Nov 2017, 02:03:00 AM

मराठी भाषेच्या संदर्भात मराठवाड्यात एक स्वतंत्र चळवळ सातत्याने सुरू आहे. त्यात विविध संमेलने आहेत, चळवळी आहेत, चर्चासत्रे, परिसंवाद अशा सर्वंकष मंथनामधून मराठी वाङ्मयाची वाटचाल सुरू आहे. मराठवाड्याचा इतिहास समजून घेताना येथील मराठी वाङ्मय चळवळीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते, ते त्यामुळेच.

    
डॉ. ज्योती धर्माधिकारी 

मराठी भाषेच्या संदर्भात मराठवाड्यात एक स्वतंत्र चळवळ सातत्याने सुरू आहे. त्यात विविध संमेलने आहेत, चळवळी आहेत, चर्चासत्रे, परिसंवाद अशा सर्वंकष मंथनामधून मराठी वाङ्मयाची वाटचाल सुरू आहे. मराठवाड्याचा इतिहास समजून घेताना येथील मराठी वाङ्मय चळवळीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते, ते त्यामुळेच. डॉ. कैलास इंगळे लिखित ‘वाङ्मयीन मराठवाडा’ या पुस्तकात हेच करण्यात आले आहे. या भूभागातील मराठी भाषेच्या संदर्भात झालेल्या चळवळींचा आणि संमेलनांचा त्यामध्ये आढावा घेतलेला दिसतो. त्यातून व्यक्त झालेल्या विचारांचा परामर्श म्हणजे हे पुस्तक आहे. एखाद्या प्रदेश भाषेची प्रगती मापण्याचे अनेक साधने असू शकतात. नवीन लेखकांच्या नोंदी, भाषा समृद्धीच्या दिशेने वाटचाल, त्या भाषेतील वाङ्मयाला मिळालेली चालना आणि विस्तारलेली कार्यक्षेत्रे, भाषेची उपयोजितता आणि प्रभावी वाङ्मयीन वापर अशा विविध पद्धतीने हे संशोधन होऊ शकते. मराठवाड्यातील वाङ्मयीन वाटचाल अभ्यासताना लेखकाने स्वतःसाठी काही मर्यादा घालून दिल्या आहेत.

लेखक साहित्यिक मूल्य मांडताना मराठवाड्याच्या प्राचीन इतिहासात डोकावतो. पैठण आणि परिसरात जिवाश्म सापडल्याचा दाखला मराठवाड्याचा समृद्ध वारसा पहिल्या प्रकरणात येतो. रामायण-महाभारताचे सांस्कृतिक वारशाचे दाखले नमूद केले आहेत. रामायणात ज्याचे ‘दक्षिणापक्ष’ या नावाने वर्णन आहे तो मराठवाड्याचाच भाग. मराठवाड्याची संस्कृती मानववंशाच्या सुरुवातीपासूनच विकसित झाली असावी असा कयास यातून ध्वनित होतो. येथील भौगोलिकता, राजेशाहीची स्थित्यंतरे, मुस्लिम राजवट यांचा संदर्भ पहिल्या प्रकरणात येतो. विकासाची क्रमागत प्रक्रिया या भागात घडली असावी असे समजण्याला पुरेसा वाव आहे. तथापि, निजामाने मराठवाड्यावर सव्वादोनशे वर्षे राज्य केले. त्याच्या जुलमी राजवटीचे व्रण अजून पुसलेले नाहीत. आजही त्या राजवटीचे साक्षीदार शिल्लक आहेत. या राजवटीचे स्वाभाविकतः पडसाद वाङ्मयात पाहायला मिळते.

इ. स. पूर्व २३० ते गेल्या शतकापर्यंतचा धांडोळा लेखक आपल्या वाङ्मयीन इतिहासाची पाळेमुळे या प्रकरणात करतात. मराठवाड्याचा समग्र इतिहासाच्या दृष्टीने पहिले प्रकरण महत्त्वपूर्ण ठरते.

१८८२ मध्ये सुरू झालेले ‘औरंगाबाद समाचार’ नियतकालिक, १८८५ मध्ये सुरू झालेले ‘दक्षिण मित्र’ मासिक निजामाच्याच कालखंडात सुरू झाले होते. हे दोन्ही मराठी मासिके राजकीय घडामोडी सांगण्याचे माध्यम होते. या राजकीय पत्रांचे वाङ्मयीन मूल्यही महत्त्वाचे ठरते. त्यानंतर विविध नियतकालिके आली. भाषा बदलत जाते त्याचा वस्तुनिष्ठ पुरावा ही मासिके ठरावीत आणि ते संशोधनाचे नवे दालन ठरू शकते. थेट ‘प्रतिष्ठान’ या उल्लेखावर हा परिच्छेद संपतो. मराठवाडा साहित्य परिषदेची निर्मिती १९४३ मध्ये झाली तेव्हा संपूर्ण वाङ्मयीन घडामोडीला वाहून घेणारे एक साहित्य परिषदेच्या मालकीचे मासिक निघावे असे अनेकांना वाटत होते. प्रत्यक्षात मात्र ‘प्रतिष्ठान’ला दहा वर्षे वाट बघावी लागली. १९८३ मध्ये ‘प्रतिष्ठान’ मासिक आले आणि ते संपूर्णपणे ‘वाङ्मयीन’ होते.

वाङ्मयीन मराठवाडा विशद करताना साहित्य संमेलने वाङ्मयीन चळवळीचे मुख्य केंद्र मानले गेले. १९३७ ते २००५ या अडुसष्ठ वर्षांच्या काळात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणांमधून व्यक्त झालेल्या विचारांची मिमांसा गरजेची ठरली. ही संमेलने साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात.

मराठवाड्यातील वाङ्मयीन चळवळी, मराठी साहित्य, वाङ्मयीन फुलश्रुती या विभागांl ही मराठी भाषेच्या मराठवाड्यातील वाटचालीचा लेखाजोखा मांडला आहे. त्यामुळे एकंदर मराठवाड्याच्या वाङ्मयीन चळवळीच्या अभ्यासासाठी हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून अतिशय मोलाचे ठरू शकते.

वाङ्मयीन मराठवाडा
लेखक : डॉ. कैलास इंगळे
प्रकाशक : चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठं : ३८० किंमत : ३०० रु.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...