मुख्य सामग्रीवर वगळा

धन्यवाद ताई आपण हे विचारण्याचे धाडस करत आहात. याचे आणि तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे मी कौतुक आणि स्वागत करतो आहे. निश्चित रुपाने भारतीय राज्यघटना सार्थकी ठरते असल्याचे हे शुभ संकेत आहे.

थोतांडांवर आधारीत महाकाव्य .लिहीण्याचा एक काळ होऊन गेला. हे महाकाव्य पाच दहा हजार वर्षांपुर्वीचे नाहीचय कुणी कितीही ऊर आणि टीर बदडून सांगितलं तरीही सत्य झाकतच नाही. या निसर्गात त्याचे दाखले मिळतंच नाही. आणि मिळणारही नाही.

हिंदू यांला फारसी भाषेत गुलाम म्हणतात. आपण सिंधू संस्कृतीतील आहोत. सिंधूचा अपभ्रंश जास्तीत शिंदू, शिंडू, इंदू, इंडू असे होऊ शकेल हिंदू नाही.

इतिहासाचे मोठया प्रमाणावर अजूनही विकृतीकरण केले जाते आहे.

रामायण, महाभारतातील, राम आणि कृष्ण काढून टाकल्यास अर्थहीन काव्यच शिल्लक राहते.

मुळात हे दोघेही बहुजनांचे आहेत. इथले मुळ पुरुष . यांचे संस्कृती करणे केले आणि यांना श्री चिटकले की झाले संस्कृती करण.

मुळात हे दोघे विष्णूचे अवतार म्हणून सांगितले जाते. हे साफ चुकीचे आहे.

मानसांच्या अंगी मोठेपणा, माणूसकी उदारता असल्यास कांही वेळा आपण देव माणूस, राजा माणूस आपण म्हणतोच की. परंतू कांही खोडसाळ लोकांनी आम्हीच ब्रम्ह आणि देव म्हणत भ्रम पसरविन्याचे पुण्याचे काम केले.

कल्पनेतला हरी, बहुजनांच्या शिरी थोपण्याचे कार्य हा श्री साधत आहे.

वैदिक व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या एकमेव विद्रोही शक्ती म्हणजेच बौद्धिक शक्ती होय.

अज्ञानात भक्ती जन्मते... तर विज्ञानात शक्ती जन्मते...

ज्ञानांपासून वंचित ठेवल्यांने बहुजनांची शक्ती नष्ट होईल. ते भक्ती मार्गात जाण्याशिवाय पर्यायहीन असतील. ते संपूर्णतः गुलाम होतील. आणि हेच गुलाम हिंदू असतील.

भक्तीचे प्रचार प्रसारणाचे ठेके पुर्वीच्याच ठेकेदारांच्या मुलांकडे असतील. तमाम बहुजनांना पायरी पायरीवर भिखारी केले जातील. मग देवाच्या नावावर जगण्याशिवाय पर्यायच उपलब्ध नसणारेय.

पुर्वी ज्ञानाची भाषा संस्कृत केल्याने.. बहुजनांना संस्कृतपासून दूर ठेवले... आता ज्ञानाची भाषा इंग्रजी झालीय तर कांही लोक संस्कृत बलपुर्वक आपल्यावर थोपवित आहेत. जगणेच अर्थहीन करत आहेत.

आज बौद्धिक चळवळ पेटून उठली नाही तर धर्माच्या नावाखाली अधर्मी कृत आपल्या भविष्याचा घात केल्याशिवाय राहणारच नाही.

ज्यांना इतिहास माहित नाही... त्यांना विकृत इतिहासाव्दारे दिशाहीन केले जाते आहे. इतिहासाचे मुळ स्रोत जाणिवपुर्वक नष्ट केली जाताहेत.

इथली मुळ संस्कृती जपणाऱ्या बौद्ध, जैन, शीख, महानुभाव पंथांचे संस्कृती करण केलेय, विकृतीकरण केलेय. हे धर्म भारतीय मातीतले आहे. मुळात हे एकच विचारांचे आहेत. कदाचित हे इथल्या मुळ संस्कृतीचेच अंग आहेत. परंतू मातीआड गाडण्याचे काम कiही विकृत परकीय शक्तींने केले.

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल, बंग, विंध्य, हिमाचल चा मिळून अखंड भारत होता.

उत्तरपथ दक्षिणपथ असे प्रत्येक देशांना पाहायला मिळेल. दोन विभिन्न गोष्टी एकत्रित राहूच शकत नसाव्यात म्हणून कदाचित निसर्गानेही सोय केली असावी.

उत्तर भारतामध्ये जे जे आहे ते ते किंवा त्यापेक्षा जास्त दक्षिण भारतामध्ये जास्त मिळेल.

उत्तर भारतात राजा होता परंतू दक्षिण भारतात धर्म, न्याय बंधुत्व प्रिय राजे होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...