मुख्य सामग्रीवर वगळा

अकलूज किल्ला आणि शिवसृष्टी, टेंभूर्णी ची गढी, माढा किल्ला, परंडा किल्ला

अकलूज किल्ला - अकलूज किल्ल्यावरील शिवसृष्टी हे इथले प्रमुख आकर्षणतटबंदी बांधताना वापरलेल्या विशाल विरगळ,किल्ल्याला वळसा देत जाणारी निरा नदी आणि किल्ल्याच्या मधोमध असलेल्या टेहळणी बुरुजावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहताना मन भूतकाळात जाऊन पोहचतंनदीकाठची तटबंदीघाट,किल्ल्याचे उत्तुंग बुरुजघाटावरील पिळदार मिशीवाल्या मारुतीरायाचे मंदिर आणि किल्ल्याच्या मधोमध उभा ठाकलेला टेहळणी बुरुज हि अकलूज किल्ल्याची काही वैशिष्ट्ये.

अक्लाई देवी हे अकलूज चे ग्रामदैवत या देवीच्या नावावरून या शहराला अकलूज नाव पडले.. हा किल्ला यादवकालीन आहे असे इतिहासकार सांगतात.. १३ व्या शतकात यादवकालीन राजा सिंघन याने याची निर्मिती केली.. पुढे मुघल आणि मग इंग्रज यांनी या किल्ल्यावर राज्य केले.. औरंगजेबाचा दख्खनचा सुभेदार बहाद्दूरखान याच्या कडे हा किल्ला होता.. दौंड जवळील बहाद्दूरगड देखील त्याच्या अखत्यारीत होता.. पुढे रणमस्तखान इथला किल्लेदार झाला.. इथे दस्तूरखुद्द संभाजी महाराज ४ महिने राहिल्याचे काही इतिहास कार सांगतात.. तसेच इंग्रजांनी पेशवाई बुडविल्यानंतर दुसरा माधवराव पेशवा याने इथे आश्रय घेतल्याचेहि सांगतात.. अकलूजच्या परिसरात औरंगजेबाने डेरा टाकला होता आणि मुकर्रबखानाने संभाजी महाराजांना जेंव्हा संगमेश्वर येथे विश्वासघाताने पकडले.. तेंव्हा याच परिसरात डेरा टाकून बसलेल्या कपटी औरंग्याच्या सेनेने जल्लोष केला होता याबद्दल महाराष्ट्र ग्याझेटीअर मध्ये नोंद आहे..
सध्या इथे एक भव्य शिवसृष्टी चितारली आहे.. इथली शिवरायांच्या जीवनकाळातील काही महत्वाच्या घटना शिल्पबद्ध केल्या आहेत.. आणि ती पाहताना मन आपोआप शिवकाळात जावून पोचते आणि आपण देखील या नकळत शिवमय होवून जातो.. याशिवाय टेहळणी बुरुजावर असलेला महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा विलक्षण आहे.. इथे उजवीकडे एक किल्ले प्रदर्शन आहे.. इथे बऱ्याच मुख्य किल्ल्यांच्या प्रतीकृती आपल्याला हिंदवी स्वराज्यातील महत्वाच्या किल्ल्यांची एक सफर घडवून आणतात.. सहकुटुंब पाहावे असे हे शिवशिल्पालय आहे..  
  
टेंभुर्णीची गढी - टेंभूर्णीची गढीच्याअस्तित्वाची लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहेऐतिहासिक अवशेषांबद्दलची अनास्थाया गढीच्या मुळावर उठल्याचे दिसून आले.सदाशिव माणकेश्वर नावाचा कुणी सरदार होता त्याने हि गढी बांधल्याचे सांगतातगढी मध्ये माणकेश्वरांचा लाकडाचे कोरीव नक्षीकाम असणारा सातमजली वाडा होता आणि तो मालमत्ता वादातून जाळून टाकल्याचे इतिहासकार सांगतातकिल्ल्यात राम आणि विठ्ठलाचे मंदिर असून सध्या ते मोडकळीस आले आहेरामभक्त हनुमान मंदिर मात्र तंदुरुस्त असल्याचे जाणवते..किल्ल्यावर बामनतळे आणि मांगतळे..गतकाळच्या दुर्दैवी जातीयतेची मूर्त उदाहरणे आहेत. अकलूज-टेंभूर्णी रस्त्यावर उजवीकडे गढीचा मुख्य दरवाजा आणि आत डोकावल्यास डावीकडे बामनतळे नजरेस पडतेतसेच पुणे-सोलापूर महामार्गाकडे जाताना उजवीकडे काही बुरुज आणि तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात.


माढा किल्ला हा १७०७ साली रंभाजी निंबाळकर या सरदाराने बांधला असे इतिहासकार सांगतातछत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर रंभाजी निंबाळकर आणि चंद्रसेन जाधव (मोघलांना सालो कि पळो करून सोडणारे संताजी जाधव यांचा पुत्रयांनी मुघलांची चाकरी पत्करली१७०७ साली झालेल्या पुरंदरच्या लढाईत रंभाजी ने  मुघलांकडून लढताना बाळाजी विश्वनाथ आणि हैबतराव निंबाळकर याचा पराभव केला आणि निजाम-उल-मुल्कने त्याला रावअशी पदवी दिलीपुढे करमाळा इथे रावरंभा निंबाळकर यांनी आपला तळ हलवला आणि त्यांच्या कुलदेवतेचे म्हणजे श्री कमला-भवानी मातेचे भव्य मंदिर बांधलेसतराव्या शतकात याच राव रंभा निंबाळकरांकडे पुणे सुभ्याची जहागिरी होती असं म्हणतातबीड जिल्ह्यातील खर्डा येथील १७९५ च्या मराठे आणि निजाम यांच्यातील महासंग्रामात या रावरंभा निंबाळकर यांनी छातीचा कोट करून निजामाला वाचवले असे इतिहासकार सांगतातचार बुरुजांचा भुईकोट म्हणजेच चौबुर्जीराजे राव-रंभा निंबाळकर यांची राजगादी इथे होती असे गावकरी सांगतात.याशिवाय शे-सव्वाशे फुट खोल ५-६ फुट रुंद अशी एक दगडी बांधीव विहीर आहे इथे पाच फण्यांचा नाग मुक्कामास असतो अशी एक आख्यायिका प्रचलित आहेतटबंदी च्या आतील देवड्या वाड्यांचे चौथरे आणि मुख्य द्वाराच्या आतून शेजारी उजवीकडे एक भुयार.. डावीकडच्या तटावर एक महादेवाचे मंदिर आहेकिल्ला पाहून बाहेर आलो आणि गावकऱ्यांनी इथले विठ्ठल मंदिरमल्लिकार्जुन मंदिर आणि खंडोबाचे देऊळ पाहून जा असे सांगितलेअफजलखानाने जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याची मोहीम चालू केली तेंव्हा तो इकडे आला ते देवळांची आणि गावांची नासधूस करीतयातून पंढरपूरचा विठोबा देखिल सुटला नाहीत्यावेळी विठ्ठलाची मूर्ती इकडे आणल्याचे आणि नंतर ती इथेच राहिली त्यामुळे खरा विठ्ठल इकडचाच असा दावाही काही लोक करतात.या माढ्याच्या विठ्ठल मंदिरासमोर एक समाधी आहे यातून एक भुयारी दरवाजा माढ्याच्या किल्ल्यावरील भूयाराला जोडला गेला आहे असाही समज आहेप्राचीन मल्लिकार्जुन मंदिर आणि त्याशेजारची जुनाट विहीर पाहून इथल्या खंडोबाच्या मंदिराकडे निघालोइथे एक खंडोबाचे देऊळ आहेमल्हारी-मार्तंडाची दोन मुखवटे असलेली पिंड असून शेजारी आणखी एक अशीच एक सुंदर पिंड आहे.त्याशेजारी उजवीकडे जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे.



परांडा किल्ला – अकलूजटेंभूर्णी आणि माढा किल्ल्यांना धावती भेट देवून मराठवाडा भटकंतीतील पहिला किल्ला परांडा इथे पोहोचलोयष्टी स्थानकापासून गल्ली बोळातून वाट काढीत किल्ल्यासमोरील खंदकाजवळ येवून पोहोचलोइथून गडाचा मुख्य दरवाजा दिसतोएका दांडग्या बुरुजाच्या मधोमध कोरलेला हा दरवाजा आणि तितक्याच दांडग्या बुरुजाच्या पाकळ्या असा हा अभिनव दरवाजा आहेखंदकाच्या अल्याड दोन लहानगे बुरुज एखाद्या भालदार-चोपदारासारखे आपले अगत्यशील स्वागत करतातपूर्वी खंदकातून आत येण्यास लाकडी काढता-घालता पूल होतापण नंतर जनताजनार्द्नाच्या सोयीसाठी राजरोस एक नवा पूल बांधला आहेसध्या हा किल्ला पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असूनतिकीट फाडण्याखेरीज मिपुरातत्त्व महाराज काहीच करीत नसल्याचे दिसून येतेमोडकळीस आलेल्या लाकडी चौकटीतून आत प्रवेश केलातर काही वटवाघळांनी इथे वटवाघळे कि दुनिया वसविल्याचे दिसलेएका अर्धगोलाकार बुरुजामध्ये मध्यभागी गडाचा दरवाजा आहेआत आलं कि लगेच समोर एक रांगत जाता येण्याइतुका चोर दरवाजा आहे आणि उजवीकडे काही देवड्या आणि इथे काटकोनात डावीकडे वळताच आतील कमान नजरेस पडतेआत शिरताच पुन्हा समोर धिप्पाड पाकळी बुरुजदुबाजूस दणकट तट आणि उजवीकडे एक सज्जाधारी बुरुज नजरेस पडतोसज्जाच्या दिमतीला दोन्ही बाजूस व्याघ्रशिल्प आणि वर आकर्षक गजशिल्पपट्टिका कोरल्याचे दिसून येते. या बुरुजाला खेटून पुढे उजवीकडे थोडा आत दडवलेला असा किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहेसमोरील बुरुजांच्या कोनाड्यातून काही लहानग्या तोफा बाहेर डोकावताना दिसले आणि मराठवाड्यातील किल्ल्यात काय पाहणार ! या खोचक प्रश्नाचे पहिले उत्तर मिळाले.. तोफा पाहणार !



गडभ्रमंतीच्या दहाव्या मिनिटाला इतक्या तोफांच्या दर्शनाने अगदी भारावून न जाता..आत आणखी काय दडलेलं आहे हे पाहण्यास निघालोदुसऱ्या दरवाजातून आत प्रवेश केला आणि समोर पाहिलं तर आणखी पुन्हा दोन सज्जाधारी बुरुजपण इथल्या बुरुजांची उंची हि बाहेरील बुरुजांपेक्षा पेक्षा काकणभर सरस आहेतभुईकोटाची हि अभेद्य रचना खरोखर थक्क करणारी आहेसमोरच्या उंचपुऱ्या बुरुजाच्या अलीकडे डावीकडे सहा-सात कमानी असलेली एक इमारत लक्ष वेधून घेते..हि घोडेपागा असावीसमोर दिसणाऱ्या दोन उंचपुऱ्या बुरुजांच्या मधून काटकोनात उजवीकडे जाताच गडाचा तिसरा दरवाजा नजरेस पडतोया दरवाजा समोर एक पाण्याची आयताकृती विहीर आहेया दरवाजातून आत प्रवेश करताच आपण किल्ल्याच्या मध्यवर्ती भागातील जो कोट आहे(ज्याला आपण बालेकिल्ला म्हणून हवं तर)त्यावर प्रवेश करतोइथे पुन्हा उजवीकडे जाताच समोर दारुकोठार आहे आणि डावीकडे मशिदमशिदीकडे पाठ करून पाहताच मुख्य दरवाजाला आतून खेटून असलेल्या लगतच्या उंचपुऱ्या बुरुजावर जाण्यासाठी चक्क शे-दीडशे पायऱ्यांचा जिना तयार करण्यात आल्याचे दिसतेयेताना इकडे जावे असे म्हणून अंधार पडण्याआधी उजवीकडे फेरफटका मारण्यासाठी निघालो.परांडा किल्ल्यावर पुष्कळ तोफा आहेत असे कुणाकडून तरी ऐकले होतेत्याची झलक दुसऱ्या दरवाजात पाहायला मिळाली होती,पण इथे काही अजस्त्र तोफा देखिल आहेत असे कळले
परांडा किल्ला हा सुमारे इ.स. १००० च्या दरम्यान बहामनी शिलेदारांनी बांधल्याचे इतिहास कार सांगतात. सध्या विजापूरच्या किल्ल्यावर असणारी प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ हि आधी याच किल्ल्यावर होती आणि पुढे आदिलशाहच्या काळात ती विजापूर येथे स्थलांतरित करण्यात आल्याचे सांगितले जाते.. तर तब्बल २६ बलाढ्य बुरुज असणारा हा किल्ला आवर्जून पाहण्यासारखा आहे.. महाकाळ बुरुज, बुलंद बुरुज, चंचल बुरुज शाह महाकाळ बुरुज आणि नासा ईद बुरुज अशी काही बुरुजांची नावे.. याशिवाय किल्ल्यात एक मशीद असून, तळघर असलेली विहीर, तोफखाना, नरसिंह मंदिर आणि रामतीर्थ अशी काही आणखी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.. हजार वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर मिरवणारा हा एक बलाढ्य भूदुर्ग आहे..  
 
असो गडावर अजस्त्र तोफांची भाऊगर्दी आहे हि बातमी कळताच अन्ना माशाळकर यांच्या मेंदूत तोफ हा शब्द फिट्ट बसला आणि अन्ना तोफा शोधू लागलामशिदीच्या समोर डावीकडे दारुकोठार आहेतिथे अन्नाला एक तोफ दिसलीयावर दुबाजूस पकडण्यास कड्या म्हणून बेडकाच्या प्रतिमांचा वापर करण्यात आला आहेया तोफेच्या मागे कोनाड्यातून डोकावल्यास शेकडो तोफगोळ्यांची रास पाहायला मिळतेया वरून गडावर किती तोफा असतील याची कल्पना येतेदारूकोठाराची झाडाझडती घेवून पुढे निघालो तर डावीकडे एक अष्टकोनी बांधीव विहीर दिसू लागलीविहिरीचा घेर तसा बराच मोठा असून समोरून विहिरीच्या परिघात चक्क काही तळमजले बांधून काढल्याचे दिसलेइथे उतरण्यास डावीकडून पायऱ्या आहेतमावळतीचा  रागरंग पाहून उजवीकडच्या एका कमानीकडे मोर्चा वळविला इथे पांढऱ्या रंगात रंगविलेले एक लहानगे कळस नसलेले मंदिर आहेआत मात्र काहीच नाही त्यामुळे याला मंदीर का म्हणावे की आणखी काही असा प्रश्न पडतोपण मंदिरावरील कळसाचा मनोरा त्यावरील फुलांची नक्षी पाहता इथे पूर्वाश्रमीचे मंदीर असावे असे वाटतेअसो अष्टकोनी विहीरदर्शन उरकून पुन्हा मशिदीजवळ येवून पोहोचलोआता निशान बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या चढू लागलो,दारूकोठारातील तांब्याची तोफ पाहून तरतरीत झालेला अन्ना तरातरा पायऱ्या चढून गेला आणि वर पोहोचताच ओरडला अरे खाली पाहिलेल्या तोफेपेक्षा पाच पट तोफ इकडे आहेतसं तोफेच्या दिशेने सगळे धावू लागलेपायऱ्या संपताच थोडं उजवीकडे जात पुन्हा डावीकडे तिरपा जिना दिसतो हा आपल्याला निशान बुरुजावर घेवून जातोइथे या किल्ल्यावरची सगळ्यात मोठी तोफ आहे.वर पोहोचलो आणि तोफेकडे पाहून आश्चर्यचा धक्का बसला या तोफेसमोर खाली दारुकोठारासमोर पाहिलेली तोफ म्हणजे अगदीच लहान वाटू लागलीतोफेच्या मुखाशी फारसी भाषेत काही मजकूर कोरला आहे.याशिवाय तोफेच्या मध्यावर दोन सिंह बसविले आहेतोफेच्या मागच्या भाग हा एखाद्या गदेसारखा भासतो.. तोफेवर मागील बाजूस फुलाफुलांची नक्षी इथे आहेसदर तोफ हि पंचधातूची असून चार मोठ्या बांगड्या जोडून तयार केल्याचे दिसतेप्रत्येक जोडणीच्या ठिकाणी नक्षीदार रिंग कोरल्याचे आढळते..पण तोफेला एके ठिकाणी खड्डा पडल्याचे दिसून आले.. छत्रपती शिवाजी महाराजांचा गुडघा लागून हा खड्डा पडल्याची एक आख्यायिका आहे.. तसेच इथे गुडघा दुखावल्याने महाराजांना गुडघा रोग झाला असेही काही महाभाग सांगतात.. तर अशा महाकाय तोफेला शिरावर घेवून उभा असलेला बुरुज हा तितकाच भक्कम असावागडाच्या इतर बुरुजांवर देखिल अशाच पण थोड्या लहान तोफा आहेत यातील एक मगर तोफ आहे.. तोफेचा दर्शन सोहळा डोळे विस्फारून पाहता पाहता सूर्यास्ताची चाहूल लागली आणि मावळतीचे रंग आसमंत व्यापू लागले..तिकडे अन्ना शेजारील सज्जामध्ये डोकावून आणखी काय दिसते ते पाहून लागलात्याला समोरील काही बुरुजांवर अशाच मोठ्या तोफा असल्याचे दिसलेअन्नाने ‘आधी पहिले मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्याने इतरांना त्या दाखवल्याइतक्यात अन्नाची आणि तटबंदीतून बाहेर डोकावणाऱ्या एका पिंपळाच्या झाडावर बसलेल्या घुबडाची नजरानजर झालीतशी घुबड पाहण्यास झुंबड उडालीपुन्हा पायऱ्या उतरून आतल्या तिसऱ्या द्वाराशी येवून पोहोचलो अन्नाला वाकुल्या दाखवणारे घुबड अजून तिथे टकामका पहात होते. मग अंधारल्या वातवरणात घुबडाची काही छायाचित्रे घेण्याचा केविलवाणा कार्यक्रम उरकून पुन्हा मुख्य दरवाजाच्या बाहेर आलोएव्हाना अंधारलं होतं त्यामुळे पोटपूजा करण्यास निघालोइथे जवळच सोनारी येथे कालभैरवनाथाचे जागृत देवस्थान मग तिथे निघालो.


दिवसाचा शेवट गोड झाला होता.. सोनारी गावच्या हॉटेल मध्ये असले अस्सल गावरान जेवण मिळाले कि काय सांगू.. मटकी भाजी,शेव भाजी आणि चपात्या.. पार बेंबीला तडस लागेपर्यंत जेवलोसकाळपासून अकलूज रस्त्यावरच्या वडापुरी गावच्या शिळ्या पाक्या पुऱ्या आणि मिसळवर भटकंती मित्र मंडळाला फिर-फिर फिरावे लागले.. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच खवळले होतेरात्र गडद झाल्याचे पाहून मुक्कामाच्या सोयीसाठी निघालोसोनारी गावात पाव्हण्यांकडे सोय लावलीइथे बेलसरे आणि बेलसरे सन्स यांच्या लायब्ररी मध्ये मुक्कामाची सोय करण्याचे फायनल झालेझोपण्याआधी उद्या पहायचे किल्ले’ या चर्चासत्रात.. बीड जिल्ह्यातील किल्ले पाहण्याचे आणि सोबत कपिलधारा तीर्थक्षेत्र पाहण्याचे नक्की झाले.नळदुर्गची सफर तिसऱ्या दिवशी करण्याचे नक्की केले.

क्रमशः

2 

टिप्पण्या पहा

  1. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्या
  2. Rao Rambha Nimbalkarache Mul Nav Rambaji Baji hote Not a Haibatrao,,,,

    उत्तर द्या
 

गडकोटांवरची शक्तिपीठे

अश्विन शुक्ल पक्षात सुरु होणाऱ्या नवरात्र उत्सवाचा जल्लोष हा भक्तांनी देवीच्या शक्तिला दिलेली एक मानवंदना आहे. नऊ दिवस देवीच्या विविध शक्तिरुपाची पूजा करून देवीला साकडं घातलं जातं आणि देवीची यथासांग पूजा केली जाते. दैत्य निर्मूलनाचा देवीचा महिमा मार्कण्डेय पुराणात यथासांग वर्णन केला आहे. महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत कोल्हासुराचा वध करणारी कोल्हापूर ची अंबाबाई, तुळजापूरची भवानीआई, परशुरामाची आई म्हणजेच माहुरची रेणुकामाता आणि सप्तश्रुंगगडावरची सप्तशृंगीमाता हे अर्धे शक्तिपीठ. या साडेतीन शक्तिपिठाचे वर्णन देवी भागवत पुराणात केले आहे ते असे; “कोलापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता । मातुःपुरं (माहूर) द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम् । तुलजापुरं तृतीयं स्यात् सप्तशृंगं तथैवच ।।“..

“ढाक ते भिवगड” – एक वाट अनगड

वाटाड्या मार्ग: कामशेत - जांभवली – कोंडेश्वर – ढाक पायथा - उजवीकडे - ढाक च्या डोंगराला उलटी प्रदक्षिणा – ढाक गाव – गारुबाई/खेतोबा मंदिर – गाळदेवी घाट – खिंड -  भिवगड – वदप (कर्जत) .. एकदिवसीय भटकंती

शहरी मरगळ काखोटीला मारून रोज मर्रा कि जिंदगी जगताना.. शहरी सुखाला चटावलेल्या या मनाला सतत वाटत होतं.. एक ब्रेक पाहिजे यार.. ऑफ-बीट ट्रेक किंवा एखादा किल्ला.. उप्या कोल्हापूरात बिझी.. तर चंद्रकांत अन्ना तिकडे हैद्राबादला लुंगी डान्स करायला गेलेला.. एक महिना नो ट्रेक..

बामणोली ते रसाळगड - १९९६

टीप: या ट्रेक मधील काही फोटो हे इन्टरनेट वरून डाउनलोड करून वापरले आहेत..यामागील हेतू फक्त आणि फक्त लेखनातील संदर्भ  अधोरेखित करण्याचा आहे.. कुणाचा आक्षेप असल्यास.. ते वगळण्यात येतील.. त्यासाठी.. वाटाड्या ब्लॉग वर निरोप धाडावा.. धन्यवाद..

||..इश्क-ए-दिल्ली..||

दिल्ली.. शहरांचे शहर.. एक महानगर.. या दिल्लीला महानगर म्हणायचं कारण इथे अनेक छोट्या नगरांची मिळून हि महानगरी तयार झाली आहे.. ख्रिस्तपूर्व काळात सुमारे ५००० वर्षांपूर्वी पांडवानी वसवलेले इंद्रप्रस्थ नगर, जहापनाह प्राचीर, सिरी, तुघलकाबाद, आदिलाबाद, फिरोजाबाद, दिनापनाह, शहाजनाबाद आणि इंग्रजांनी वसवलेले नवी दिल्ली.. इथल्या या उपनगरांना मात्र एक राजेशाही इतिहास आहे.. दिल्लीत किल्ले किती आहेत असे विचारलं तर लाल किल्ला नजरेसमोर येतो..

भटकंती २०१६: अजस्त्र सुधागड – आणि नितांतसुंदर ठाणाळे लेणी

वाटाड्या मार्ग: पुणे ते खोपोली.. पाली.. गणपती मंदिर – पाली ते भिरा रस्ता – पाच्छापूर – उजवीकडे – ठाकूरवाडी – सुधागड किल्ला – डोंगरवाडी – पाली – ठाणाळे गाव – ठाणाळे लेणी – ठाणाळे गाव - ----- - खोपोली – मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग - पुणे..

चिंब भिजलेले.. थेट दरीत झेपावणारे एक झाड.. पळसाच्या पानावरून ठिबकणारे पावसाचे थेंब.. डोंगर चढून जाताच एका दरी-खोऱ्याचा पाहिलेला विराट नजारा.. दरीत डोकावणाऱ्या साल नसलेल्या झाडाच्या उनाड फांद्या..
 

बाळूबाई-कोंबड किल्ला - भैरवगड-घनचक्कर-गवळदेव-मुडा - महाकाळ-बितंगा किल्ला - कळसुबाई -साकुरी-किर्डा/किरवा - पंधारा/पांढरा

Balubai - Kunjargad/Kombada Fort, Bhairavgad-Ghanchakkar-Gawaldev-Muda, Mahakaal/Mahankaal-Bitangad, Kalsubai-Sakuri-Kirdi/Kirda/Kirva - Pandhara/Pandhaara

सह्याद्री सेव्हन वंडर्स :-

पुणे - राजगुरूनगर - आळेफाटा - ओतूर - उदापूर-मुठाळणे घाटरस्ता - मुठाळणे -  कोपरे - फोफसंडी - दर्याबाई मंदिर - मांडवी नदीचा उगम - बाळूबाई घाट रस्ता - बाळूबाई-xxxx खिंड - सरळ २०० मि पुढे वर जाण्याच
 

अंबोली परिसरातील किल्ले भ्रमंती

Rangana, Bhudargad, Vallabhgad/Hargapurgad, Narayangad, Mahadevgad, Manohar-Mansantoshgad

वाटाड्या मार्ग:- पुणे - कोल्हापूर - कागल - गारगोटी - भुदरगड - आजरा - गेळे गाव (अंबोली) - नारायणगड - गेळे गाव - कावळेसाद - अंबोली ग्रामपंचायत - महादेवगड - अंबोली घाट - माणगाव  (सिंधुदुर्ग)- शिवापूर - मनोहर-मनसंतोषगड - गोठवे - शिरशिंगे - अंबोली - निपाणी - NH-४ - कागल - कोल्हापूर - पुणे

किल्ले भ्रमंती.. हा कधीही न संपणारा विषय.. सतत ठरणारे प्लान्स..
 

सुमार-महीपत-रसाळगड: एक भन्नाट भटकंती

रसाळगड, सुमारगड, महीपतगड, पालगड, मंडणगड Rasalgad, Sumargad, Mahipatgad, Paalgad, Mandangad

सह्याद्रीच्या डोंगरवाटा.. इथल्या दऱ्याखोऱ्यातून..पानापांतून..रानोवानातून यत्र-तत्र-सर्वत्र वाहणारा.. खट्याळ मस्तवाल वारा.. अंगावर येणारे कातळकडे.. भटक्या मंडळींचं पार घामटं काढणारी चढण.. अंगाचं सालटं सोलवटणारी एखादी काटेरी झुडूपातील चाल.. मनात धडकी भरवणाऱ्या दऱ्या खोऱ्यांचा एक भव्य नजारा.. कुठे डोंगर माथ्यावर बांधलेलं एक छानसं दगडी राउळ..
 

भांगशीमाता गड, खुल्ताबाद किल्ला, वेरूळ-घृष्णेश्वर मंदीर, भोसले गढी, लहुगड किल्ला’

भांगशीमातागड – मोहिमेचा शेवटचा दिवस आज निश्चित करण्यात आला.. भांगशीमातागडपाहून पुढे जाण्याचे ठरले.. भांगसाई गड असे हि या गडाचे नाव.. गडाची उंची हि समुद्रसपाटीपासून साधारण २७०० फुट आहे.. गडनिवासिनी भांगसाई देवीच्या अधिष्ठानाने या गडास भांगसाई गड असे म्हणतात.. औरंगाबादपासून १४ मि.मी. अंतरावर.. देवगिरी रस्त्याने जाताच घाटाच्या अलीकडे उजवीकडे एक फाटा आहे.. तिथून भांगशीमातागडाकडे जातं येते..
 

rest day.. किल्ले देवगिरी, पाणचक्की

मराठवाडा भटकंती मधील आजचा दहावा दिवस.. आज रेस्ट डे घोषित करण्या आला होता.. त्यामुळे थेट दुपारी उठलो आणि जेवणास निघालो. एस. टी. स्थानकाजवळ साई लॉज वर यंदाचा मुक्काम पडला होता.. दुपारी ३ च्या दरम्यान देवगिरी किल्ला पाहण्यास निघालो.. औरंगाबाद-वेरूळ रस्त्यावर देवगिरी/ दौलताबाद किल्ला आहे.. हिंदवी स्वराज्यावर जुलमी यवन राज्यकर्त्यांची वक्रदृष्टी पडण्यापूर्वी वैभवसंपन्न असा देवगिरी किल्ला..
लोड करत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...