मुख्य सामग्रीवर वगळा

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला नक्कीच माहित नसणार


मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला नक्कीच माहित नसणार...

Feb 23, 2020
By
राजेश दारव्हेकर
पेठवडगाव (ता. कळमनुरी) येथील शिवकालीन ऐतिहासिक वारसा जपणारा किल्‍ला शालेय विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरत आहे. नवसाजी नाईक यांना इंग्रज सरकारने नाव्हा (ता. हदगाव) गावात घेरले असता ते घरातून भुयारी मार्गाने या किल्‍ल्‍यात आल्याचे येथील गावकरी सांगतात.
हिंगोली : पेठवडगाव (ता. कळमनुरी) येथील शिवकालीन ऐतिहासिक वारसा जपणारा किल्‍ला शालेय विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरत आहे. निजाम व इंग्रजांना जेरीला आणणारे नवसाजी नाईकदेखील काही दिवस किल्‍ल्‍यावर वास्‍तव्याला होते. मात्र, ऐतिहासिक किल्‍ल्‍याकडे पुरातत्‍व विभागाचे दुर्लक्ष होत असून विकास करणे गरजेचे झाले आहे.

पूर्वी किल्‍ले वडगाव व पेठवडगाव ही दोन्ही गावे किल्‍लेवडगाव अंतर्गत होती. त्‍यानंतर गावाचे विभाजन झाले. आता हा किल्‍ला पेठवडगाव गावच्या शिवारात आहे. मात्र, पूर्वी किल्‍ल्‍याच्या नावाने या गावाला किल्‍ले वडगाव असे नाव पडले आहे. या किल्‍ल्‍याला चारही बाजूंनी बुरूज आहेत. शिवाय किल्‍ल्‍यात अनेक भुयारी मार्ग सापडतात. किल्‍ल्यावरील एका दगडावर शिवराज मुद्रा असलेली लिपी पाहावयास मिळते.हेही वाचा - Video : टाळ मृंदगाच्या गजरात शिवरायांना अभिवादन
नवसाजी नाईक यांचे वास्‍तव्य माहूरचे संस्‍थानिक राजे उदाराम देशमुख यांच्या अधिपत्‍याखाली हा किल्‍ला असल्याचे ग्रामस्‍थ सांगतात. या शिवाय अनेक ऐतिहासिक घटनांशी नाते किल्‍ल्‍याचे जुळलेले आहे. किल्‍ल्‍याचा कारभार रायबागन नावाची महिला पूर्वी पाहत असे. तसेच एकाच वेळी निजाम व इंग्रजांना जेरीला आणणारे नवसाजी नाईक हेदेखील काही दिवस या किल्‍ल्‍यावर वास्‍तव्य करून होते.
संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

१८५७ च्या काळात तब्‍बल वीस वर्षे उठाव चालला होता. या उठावाचे सरदार नवसाजी नाईक हे होते. 

नवसाजी नाईक यांना इंग्रज सरकारने नाव्हा (ता. हदगाव) गावात घेरले असता ते घरातून भुयारी मार्गाने या किल्‍ल्‍यात आल्याचे येथील गावकरी सांगतात.नवरात्रात विविध धार्मिक कार्यक्रमअनेक भुयारी मार्ग अजूनही किल्‍ल्‍यात आहेत. या किल्‍ल्‍यावर देवीचे मंदिर आहे. दरवर्षी नवरात्रात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. किल्‍ल्‍याचे प्रवेशद्वार दगडी बांधणीचे आहे. मात्र, दिवसेंदिवस किल्‍ल्‍याची पडझड होत आहे. 

गुप्त धनाच्या आशेने अनेकांनी ठिकठिकाण खड्डे खोदल्याचे दिसून येते. किल्‍ल्‍यातील ऐतिहासिक बारव गाळाने भरलेली आहे. येथे किल्‍ल्‍यावर जाण्यासाठी पायऱ्या व पथदिवे तेवढे बसविण्यात आले आहेत.येथे क्लिक करा - शिवरायांना अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर .. सुविधा उपलब्ध करण्याची गरजआता राज्य शासनाने पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासकामांच्या माध्यमातून येथे विकासकामे करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, हा किल्‍ला शाळेतील विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरत असून अनेक शाळेतील सहली येथे किल्‍ला पाहण्यासाठी येत आहेत. असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना किल्‍ल्‍याचा इतिहास सांगून महत्त्व सांगतात. मंदिराच्या परिसरात व किल्‍ल्‍यावर असलेल्या लिंबाच्या झाडाच्या सावलीत विसाव्यासाठी पर्यटक थांबतात. मात्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्‍था नाही. त्‍यामुळे याकडे लक्ष देऊन येथे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून किल्‍ल्‍याचे जतन करणे गरजेचे झाले आहे. किल्ल्याचे जतन करण्याची गरज पूर्वी किल्‍ले वडगावच्या नावाने ओळखला जाणारा किल्‍ला सध्या पेठवडगावच्या शिवारात आहे. मात्र, दुर्लक्षित झालेल्या किल्‍ल्‍याचे जतन करणे गरजेचे झाले आहे. सोयीसुविधादेखील उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

 - सोमनाथ रणखांब, ग्रामस्‍थ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...