मुख्य सामग्रीवर वगळा

मराठवाड्यातील सात किल्ल्यांचे लवकरच पालटणार रूप


मराठवाड्यातील सात किल्ल्यांचे लवकरच पालटणार रूप

5 वर्षांपूर्वी

मराठवाड्यातील सात किल्ल्यांचे लवकरच पालटणार रूप|औरंगाबाद,Aurangabad - Divya Marathi
औरंगाबाद - गडकिल्ल्यांच्या देशा, महाराष्ट्र देशा, असे म्हटले जात असले तरी मराठवाड्यातील किल्ल्यांच्या नशिबी कायमच सापत्न वागणूक आली आहे. मात्र, शासनाने स्थापन केलेल्या गड संवर्धन समितीच्या प्रयत्नांमुळे मराठवाड्यातील किल्ल्यांचे रूप पालटणार असून सहा किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. यावर्षी यात आणखी एका किल्ल्याची भर पडली आहे. गेल्या दोन वर्षांत संवर्धनाच्या कार्यक्रमात समाविष्ट केलेल्या राज्यातील ३० किल्ल्यांपैकी मराठवाड्यातील आहेत, हे विशेष.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गडकिल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली. तावडे समितीचे अध्यक्ष असून ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे प्रमुख मार्गदर्शक आहेत. महिन्यातून एकदा सर्व सदस्यांची बैठक होते. बैठकीतील निर्णयांवर तीन महिन्यांनी शिक्कामोर्तब केले जाते. दोन वर्षांत समितीने राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याची योजना आखली आहे. यात मराठवाड्याला झुकते माप मिळाले आहे.

३०पैकी किल्ले मराठवाड्यातील : दुर्गसंवर्धन समितीने गेल्या दोन वर्षांत ३० किल्ल्यांच्या संवर्धनाचा कार्यक्रम आखला आहे. गेल्या वर्षी १३ सप्टेंबर २०१५ रोजी तावडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकूण १६ किल्ल्यांचे संवर्धन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले . या बैठकीत संकेत कुलकर्णी यांनी मराठवाड्यातील किल्ल्यांची दुर्दशा मांडली. तावडे यांनी त्याची दखल घेऊन कंधार, माहूर, धारूर, अंतुर, परांडा आणि औसा किल्ल्यांच्या संवर्धनाला मंजुरी दिली. याचे अंदाजपत्रक पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक किल्ल्याला सुमारे ते साडेचार कोटी रुपये असे एकूण २२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 
रायगडाला जागतिक वारसा करणार : रायगडालाजागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यासाठीही सरकारचे प्रयत्न आहेत. पन्हाळगड-राजगड-रायगड या तीन गडांना एकत्रितपणे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी सरकारने चाचपणी सुरू केली आहे.

मराठवाड्यात १५ किल्ले 
राज्यात ५५० गड किल्ले आहेत. पैकी ३६० किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहेत. मराठवाड्यात १५ किल्ले आहेत. यात दौलताबादचा देवगिरी, भांगसीमाता गड, अंतुर, कंधार, नळदुर्ग, परांडा, धारूर, औसा, वेताळवाडी, जंजाळा, सुतांेडा, उदगीर, पाथ्री (परभणी), परळी आणि माहूरच्या किल्ल्यांचा समावेश आहे. दुर्ग संवर्धन समितीत १५ जणांमध्ये तरूण अभ्यासक संकेत कुलकर्णी यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश आले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...