मुख्य सामग्रीवर वगळा

खर्ड्याची लढाई

खर्ड्याची लढाई
दिनांकफेब्रुवारी-मार्च इ.स. १७९५
स्थानखर्डा ता. जामखेड जि. अहमदनगर
परिणतीमराठ्यांचा विजय[१]
खर्ड्याचा तह
युद्धमान पक्ष
मराठा साम्राज्य हैदराबादचा निजाम
सेनापती
 सवाई माधवराव पेशवे
 दौलतराव शिंदे
 तुकोजी होळकर
 दुसरा रघुजी भोसले
 निजाम उल मुल्क


खर्ड्याची लढाई ही मराठे व हैदराबादचा निजाम यांच्यात फेब्रुवारी-मार्चइ.स. १७९५ साली भारतातील महाराष्ट्रराज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे झालेली एक लढाई होती. या लढाईत मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला.

पार्श्वभूमीसंपादन करा

महादजी शिंदेचा वारस दौलतराव शिंदे याच्याशी नाना फडणवीसाचे संबंध सुधारलेले होते आणि शिंद्याची विशाल सेना पुणे येथे असल्याने त्याचा फायदा घेऊन मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढविण्याचे नानाने ठरविले आणि हैदराबादच्या निजामावर लक्ष केंद्रीत करुन त्याच्याकडे थकलेल्या चौथाईची मागणी केली. निजामाचा मंत्री मुशीर मुल्कने ही चौथाईची मागणी फेटाळून लावतानाच भोसल्याचा वर्हाडातील महसुलावरील अधिकारही नाकारला. परिणामी पेशवा, दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी मार्च, इ.स. १७९५ मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले.

लढाईसंपादन करा

मराठ्यांनी निजामावर आक्रमण केल्यावर निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली परंतु ब्रिटिशांनी मदत नाकारली आणि खर्डा येथे ही निर्णायक लढाई झाली. मराठ्यांशी उघड्या मैदानावर तोंड देण्याचे सामर्थ्य निजामाकडे नसल्याने त्याने खर्डा येथील किल्ल्याचा आश्रय घेतला. मराठ्यांनी ताबडतोब खर्ड्याच्या किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ल्याला होणारा अन्नधान्य आणि पाण्याचा पुरवठा खंडित करुन तटबंदीभोवती भडीमारासाठी तोफा रचल्या. शेवटी भयग्रस्त निजामाने १३ मार्च, इ.स. १७९५ रोजी तहाची याचना करुन लढाईतून माघार घेतली.

शेवटसंपादन करा

खर्डा येथेच दिनांक १३ मार्चइ.स. १७९५ रोजी पेशवे आणि निजाम यांच्यात झालेल्या खर्ड्याच्या तहाने या लढाईची सांगता झाली.

तहातील अटीसंपादन करा

  • तहानुसार निजामाने मराठ्यांना पाच कोटी रूपये थकलेल्या चौथाई आणि युद्धखंडणीपोटी देण्याचे मान्य केले.
  • स्वतःच्या ताब्यातील एक तृतीयांश प्रदेश मराठ्यांच्या स्वाधीन केला.
  • दौलताबादचा किल्ला व त्याच्यासभोवतालचा प्रदेश पेशव्याला देण्यात आला.
  • वऱ्हाडचा प्रदेश महसूलासहित नागपूरच्या भोसल्याला देण्यात आला.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "खर्डा १७९५: ऑर्डर ऑफ बॅटल फॉर मराठा कॉन्फेडर्सी" (इंग्रजी भाषेत). ११ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
खर्डा (किल्ला)
इतर भाषांत वाचा
Download PDF
पहारा
संपादन करा
पुठ्ठा याच्याशी गल्लत करू नका.
खर्डा किल्ला हा बालाघाटच्या डोंगर रांगेत वसलेला आहे. खर्डा हे अहमदनगरच्या दक्षिणेला १०० किमी. वर जामखेड तालुक्यातील महत्त्वाचे शहर आणि व्यापारी ठाणे आहे.


खर्डा - अजून एक दृश्य
इतिहास संपादन करा
खर्डा शहराची उभारणी सुलतान राजे निंबाळकर यांनी १७ व्या शतकात केल्याचे पुरावे आपणास सापडतात. गावामध्ये पुरातन गढी(राजवाडा)आहे. देखरेखअभावी तिची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.गावाच्या बाहेर दक्षिणेला एक भुईकोट प्रकारच्या बांधणीचा किल्ला आहे. गावच्या २ ते ८ किमीच्या अंतरावर जागृत बारा जोतिर्लिंग आहेत.खर्डा शहर ही एक मोठी व्यापार पेठ असून येथील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. ११ मार्च १७९५ ला येथे मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी निजामाच्या बलाढ्य सैन्य शक्तीचा पराभव केला. सवाई माधवराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली झालेला ही लढाई झाली. येथील युद्धामध्ये मराठ्यांच्या बाजूने ८० हजार सैन्य होते तर निजामाचे १,३०,००० सैन्य रणभूमीमध्ये होते. या रणसंग्राममध्ये जवळपास ४००० सैनिक मारले गेले. गावच्या पंचक्रोशीमध्ये त्यांच्या समरणार्थ घडवलेल्या वीरगळ आपल्याला पाहायला मिळतात. एवढा मोठा विजय यानंतर झाला नाही म्हणूनच या युद्धाला मराठ्यांच्या संयुक्त फौजांचा शेवटचा विजय असे संबोधले गेले.[१] शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जामखेडच्या प्रयत्नाने येथील युद्ध भूमीवर तोफेची प्रतिकृती लोकवर्गणीतून बसवण्यात आली आहे.

संदर्भ संपादन करा
 "The Gazetteers Department - AHMADNAGAR". 164.100.185.107. 2020-08-31 रोजी पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...