मुख्य सामग्रीवर वगळा

धाराशिव लेणी : उस्मानाबाद जिल्ह्याला लाभलेला अनोखा ऐतिहासिक ठेवा

धाराशिव लेणी : उस्मानाबाद जिल्ह्याला लाभलेला अनोखा ऐतिहासिक ठेवा

    

उस्मानाबाद जिल्ह्याला एक अनोखा आणि सुंदर ऐतिहासिक ठेवा लाभलेला आहे. हा ठेवा म्हणजे धाराशिव लेणी. अजिंठा आणि वेरुळ लेणीप्रमाणे या लेणीला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळालेली नसली तरी अजिंठा इछल्या महायान लेण्यांच्या समकालीन या लेण्या असल्याचं सांगितलं जातं.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Publish Date - 7:00 am, Thu, 4 November 21
 

उस्मानाबाद : तुळजापूरची तुळजाभवानी, नळदूर्गचा किल्ला, उस्मानाबादी शेळी आणि दुष्काळी जिल्हा अशीच काहीशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला एक अनोखा आणि सुंदर ऐतिहासिक ठेवा लाभलेला आहे. हा ठेवा म्हणजे धाराशिव लेणी. अजिंठा आणि वेरुळ लेणीप्रमाणे या लेणीला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळालेली नसली तरी अजिंठा इछल्या महायान लेण्यांच्या समकालीन या लेण्या असल्याचं सांगितलं जातं. (Dharashiv Caves, a unique historical place in Osmanabad district)

उस्मानाबाद शहराच्या ईशान्येला सहा किलोमीटर अंतरावरील एका टेकडीवर सात लेण्यांचा एक समुह आहे. त्यालाच धाराशिव लेणी म्हणून ओळखलं जातं. यातील सहा लेणी जैन लेणी मानली जातात. धाराशिव लेणी समूग टेकडीच्या दोन बाजूंवर आहेत. चार लेणी दरीच्या उत्तरेला असणाऱ्या टेकडीवर, तर उरलेली तीन लेणी त्या लगतच्या बाजूवर ईश्यानेला आहेत. धाराशिव लेण्याचा अभ्यास सर्वात आधी जेम्स बर्जेस याने 1875-76 मध्ये केला होता. प्राचिन लेण्यांच्या वास्तुशिल्पाच्या इतिहासात या लेण्यांचे मोठे महत्व आहे.

Dharashiv Leni

धाराशिव लेणी

धाराशिव लेण्यांचा इतिहास

या लेण्यांचा उल्लेख प्राचीन जैन साहित्यात येतो. इसवी सन 11 व्या शतकातील जैन मुनी कनकामर यांच्या करकण्डचरयु या प्राकृत ग्रंथाच्या चौथ्या आणि पाचव्या भागात तगर या गावाजवळ असलेल्या लेण्यांबद्दलचा उल्लेख आहे. या ग्रंथानुसार करकंड नावाच्या राजाचा मुक्काम तेरापुरच्या दक्षिणेस असलेल्या अरण्यात पडला होता. तेव्हा तेरापुरच्या शिव नावाच्या राजाने त्याची भेट घेऊन जवळच असलेल्या लेण्यांसंबंधी माहिती सांगितली. या लेण्यांमध्ये अनेक स्तंभ आहेत. त्यात पार्श्वनाथाच्या मूर्तीची करंडक राजाने पूजा केली. त्याचबरोबर या लेण्यांचा त्याने जीर्णोद्धार केला. तेथिल डोंगर माथ्यावर त्याला वारुळात असलेली एक पार्श्वनाथाची मूर्ती सापडली. ती आणून त्याने त्या मूर्तीची लेण्यात प्रतिष्ठापना केली. इतकंच नाही तर राजाने तेथे या लेण्याच्या वरील बाजूला अजून दोन लेणी खोदली.

Dharashiv Leni

धाराशिव लेणी

लेण्यांसंबंधीचे उल्लेख ‘करकण्डचरयु’ ग्रंथात

तरगपुराजवळच्या या लेण्यांची मुनी कनकामराने दिलेली माहिती महत्वपूर्ण आहे. ज्या लेण्यांसंबंधीचे उल्लेख करकण्डचरयु ग्रंथात आलेले आहेत. ती लेणी तेर (प्राचीन तरगपूर) जवळ असलेल्या धाराशिव येथील लेणी असून पावसाळ्याच्या काळात हा परिसर अत्यंत रमणीय असा दिसतो. राज्य पुरातत्व विभागाने धाराशिव लेण्यांमध्ये केलेल्या साफसफाईच्या कामावेळी त्याच्या खालच्या बाजूला पायऱ्या असल्याचं दिसून आलं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...