मुख्य सामग्रीवर वगळा

नाणेघाट

नाणेघाट

महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग,सातवाहनकालीन लेणी

नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पुर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहनकालीन आहे. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला, तर दुसरे खाली कोकणात मुरबाडतालुक्यात आहे.

नाणेघाट
Naneghat07.JPG
नाणेघाट
नावनाणेघाट
उंची२७२४ फूट
प्रकारगिरीदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणठाणे जिल्हामहाराष्ट्र
जवळचे गाववैशाखरे
डोंगररांगहरिश्चंद्राची रांग
सध्याची अवस्थाव्यवस्थित
स्थापना{{{स्थापना}}}


इतिहाससंपादन करा

मौर्य राजा नंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला. या घाटात सातवाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही कोरून ठेवलेली आढळते. येथे असलेल्या लेखात सातवाहन सम्राज्ञी नागणिके विषयी माहिती मिळते. या लेखांमध्ये महाराष्ट्राच्या आद्य राज्यकुल, त्यांचा पराक्रम, दानधर्माबद्दल माहिती आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठया भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हे पहिले राजे. हा राजवंश सुमारेचार शतके सलगतेने राज्य करत होता. या काळात त्यांचे तीस पराक्रमी राजे होऊन गेले. या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासेनाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली. अशा या सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘नाणेघाट’ हा प्रमुख मार्ग होता.

येथील एका लेखात सातवाहनांच्या पराक्रमाशिवाय त्यांनी इथे केलेले यज्ञ, दानधर्माचे उल्लेख आहेत. सातवाहन राजांनी दोनदा अश्वमेध यज्ञ केला असे दिसून येते. याशिवाय वाजपेय यज्ञराजसूय यज्ञ असे तब्बल २२ यज्ञ इथे पार पडल्याची माहिती हे लेख देतात. हजारो गाई, शेकडो हत्ती, घोडे, खेडी, धान्य, वस्त्र-अलंकार आणि तत्कालीन सातवाहनांची कार्षांपण या नाण्यांचा मोठा दानधर्म केल्याचाही यात उल्लेख येतो.

  • येथील गुहांमध्ये ब्राम्ही भाषेतील लेख आढळतात. गुहांमध्ये सातवाहनांचे वंशजांचे पुतळे आहेत. त्यांचे सध्या पायांचे भाग आहेत.
  • घाटाच्या तळाशी वैशाखखेडे गाव आहे. असे मानले जाते की ते "वैश्यखेडे"चा अपभ्रंश आहे. हे गाव व्यापारी व त्यांचे नोकरांच्या सुविधांसाठी इमारती होत्या.
  • घाटात जकातीसाठी रांजण आहेत. हा टोल संस्कृती सर्वांत जुना पुरावा आढळतो.
  • सुपारक अर्थात सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी पश्चिम किनाऱ्यावरची दोन अत्यंत महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशातील व्यापाराला सुद्धा येथून मोठी चालना मिळत असे. विशेषत: रोमहूनआयात होणारा माल सोपाऱ्याला उतरवला जाऊन तेथून कल्याण, नाणेघाट, जुन्नरनेवासा मार्गे पैठणकडे नेला जात असे. तसेच निर्यातीच्या वस्तूंची वाहतूक देखील याच मार्गावरून उलट दिशेने होत असे.

चित्रदालनसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...