मुख्य सामग्रीवर वगळा

खर्ड्याची लढाई

खर्ड्याची लढाई

खर्ड्याची लढाई

मराठे आणि निजामुल्मुल्क यांच्यात ११ मार्च १७९५ रोजी झालेली महत्त्वपूर्ण लढाई. मराठ्यांच्या इतिहासात नाना फडणीसाच्या कर्तृत्वाचा परमोच्च बिंदू म्हणजे खर्ड्याची लढाई होय. १७२४ मध्ये निजामुल्मुल्काने स्थापलेली हैदराबादची आसफशाही व मराठेशाही ह्या दोन्हीही स‌त्ता दक्षिणेत आपले आसन स्थिर करीत होत्या. निजाम केवळ दक्षिणेत आणि मराठे उत्तरेत व दक्षिणेत आपले राज्य वाढवू पाहत होते. त्यामुळे स‌मान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन स‌त्तांमधील अनिवार्य संघर्षाचा खर्ड्याची लढाई हा शेवटचा टप्पा होय.

राठ्यांना दक्षिणेतील स‌हा सुभ्यांचे चौथाई व स‌रदेशमुखी वसुलीचे अधिकार १७१८ मध्ये मिळाले. निजाम आपल्या ताब्यातील प्रदेशाची चौथाई आणि स‌रदेशमुखी मराठ्यांना सुखासुखी देत नव्हता. मराठ्यांनी वेळोवेळी युद्धांत निजामाचा पराभव करून हे देणे त्याच्यावर बसविले होते आणि संधी मिळताच प्रत्येक वेळी निजाम ते देण्याची टाळाटाळ करत होता. ही चौथाईची बाकी जवळजवळ तीन कोट रुपये झाल्याने मराठ्यांना युद्धाव्यतिरिक्त दुसरा मार्ग नव्हता.

नाना फडणीस निजामशाही आपल्या ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न करत होता. त्याच वेळी हैदराबादचा दिवाण मुशीरुल्मुल्क ऊर्फ अजीमुल्उमरा हा निजामशाहीचा प्रखर अभिमानी होता. तो मराठी साम्राज्याच्या नाशाची स्वप्ने रंगवीत होता. साहजिकच हे स्वराज्यहितैषी स‌मकालीन पुरुष एकमेकांचे पक्के हाडवैरी बनले होते.

हादजी शिंद्यांचे बस्तान बादशाहीत बसून, त्यांस व पेशव्यांना वकील-इ-मुल्मक व मालिकी हा स‌न्मान मिळाल्यापासून हैदराबादच्या निजाम अलीस अत्यंत वैषम्य वाटू लागले होते. महादजी १७९४ मध्ये व त्यानंतर चार महिन्यांनी हरिपंत मृत्यू पावल्याने मराठ्यांवर चालून जाण्यास हीच संधी आहे, असे निजामाने ठरविले. शिवाय निजामास इंग्रज आपणास मदत करतील अथवा मध्यस्थी करुन दोघांमधील तंटा मिटवतील, अशी आशा होती.

या वेळी निजामी दरबारातील मराठ्यांचे वकील गोविंद कृष्ण काळे व हरिपंत यांच्यातर्फे दोघांमधील मतभेद मिटविण्याचे प्रयत्न झाले; पण ते स‌र्वस्वी फोल ठरले. मध्यस्थीने काम होत नाही हे दिसताच निजामाने ४ जानेवारी १७९५ मध्ये आपले ठाणे सोडले व बीदरच्या पश्चिमेस १०८ किमी.वर बोलीगाव येथे तो येऊन पोहोचला. निजामाचे धोरण ओळखून नानाने १७९४ च्या सुरुवातीपासूनच उत्तरेकडील स‌र्व स‌रदारांना पुण्यास बोलाविण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यासह १७९५ च्या जानेवारीत पुण्याहून कूच केले. इतर काही स‌रदार त्याला रस्त्यात येऊन मिळाले. पेशव्यांनी खडकी, थेऊर, आडळगाव, मिरजगाव या मार्गे येऊन सीना नदीच्या काठी तळ दिला. पेशव्यांच्या हालचालींची बातमी लागताच निजाम मोहरी घाट उतरून खर नदीच्या काठाने लोणी ते वाकी ह्या दोन गावांच्या दरम्यान तळ देऊन राहिला. ११ मार्च १७९५ मध्ये खर्ड्याजवळील रणटेकडीवर दोन्ही सैन्यात झालेल्या झटपटीत प्रथम मराठ्यांचे विठ्ठलराव पटवर्धन, चिंतामणराव खाडिलकर हे ठार झाले, पण ही बातमी पसरताच शिंद्याकडील जिवबादादा, बक्षी, गारदी, नागपूरकर भोसले इ. ताबडतोब मदतीस आल्याने निजामाच्या फौजेचा धुव्वा उडाला. थोड्याशा चकमकीनेच हार खाऊन निजामाच्या फौजेने खर्ड्याच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. मराठ्यांनी किल्ल्यास वेढा देऊन निजामाची रसद तोडली.

दुस‌ऱ्या दिवशी युद्ध थांबवावे व तह करावा, अशी गोविंदराव काळ्यांतर्फे निजामाने मराठ्यांना विनंती केली. १२ मार्चपासून २७ मार्चपर्यंत तहाच्या वाटाघाटी चालल्या होत्या. त्या अवधीत निजामाची हलाखी वाढत होती. शेवटी अन्न आणि पाणी यांवाचून सैन्याचे भयंकर हाल होत आहेत, हे पाहून २७ मार्चला मुशीरुल्मुल्क आपण होऊन पेशव्यांचे स्वाधीन झाला. पुढे निजाम-मराठ्यांत तह होऊन त्यान्वये साडेचौतीस लक्षांचा मुलूख आणि तीन कोटी दहा लक्ष रुपये पेशव्यांना देण्याचा निजामाने करार लिहून दिला. याशिवाय दरबार खर्च व स‌रदारांना वैयक्तिक बक्षिसे मिळाली. मराठ्यांनी आपल्या मर्जीनुसार त्याचे दरबारी दिवाण नेमून निजामशाहीत वर्चस्व निर्माण केले. खर्ड्याच्या तहातील एकही कलम नाना फडणीसांच्या मृत्यूनंतर आचरणात आले नाही. निजामाने इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारुन स्वत:चे अस्तित्व बरीच वर्षे पुढे कायम ठेवले.

 

भिडे, ग. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...