मुख्य सामग्रीवर वगळा

खडर्याच्या लढाईविषयी माहिती आहे का?

मराठ्यांच्या इतिहासात ज्या प्रसिद्ध लढाया झाल्या, त्यात खर्ड्याची लढाई ही प्रसिद्ध आहे .

हि लढाई मार्च १७९५ मध्ये खर्डा ता . जामखेड जि . अहमदनगर येथे मराठे व निजाम यांच्यामध्ये झाली.

खर्ड्याच्या लढाईची थोडक्यात पार्श्वभूमी अशी , मराठेशाहीतील मातब्बर सरदार महादजी शिंदे ,हरीपंत फडके इ सरदार हे कालवश झालेले होते . त्यातच माधवराव नारायण पेशवे हे अल्पवयीन असून , नाना फडणवीस हे कारभार पाहत होते. हैदराबादचा निजामाचा दिवाण मुशृलमूलुख ऊर्फ मैनातदौला याने निजामास पेशवा लहान असुन स्वारी केली तर पेशव्याचे राज्य हाती येइल किंवा मोठी खंडणी वसुल करता येइल असा सल्ला दिला , त्यावरून निजाम तयार होवून लाखभर फौज जमा करून तो निघाला.

पेशव्यांचा वकील गोविंदराव काळे यांच्यामार्फत पुण्यास आम्हांस खंडणी द्यावी अन्यथा लढाईस तयार राहावे, असा निरोप दिला . त्यानुसार पेशव्यांनी देखील समरांगणी दोन हात होतील मगच खंडणी द्यावयाची असल्यास देवु , असा जवाब पाठवून शिंदे , होळकर, भोसले ,परशुरामभाऊ यांची फौज व पानसे यांचा तोफखाना घेऊन पेशवे पुण्यावरुन कोरेगाव , काष्टी तांदळी , भिलवडी येथे मुक्काम करून सिनानदी वरुन विंचरणा नदीजवळ मुक्काम केला .

इकडे निजाम बालेघाट उतरून खर्ड्याच्या अलिकडे घोडेगाव होता त्यामार्गे परांडा किल्ल्याकडे जात असताना तिथेच मराठे व निजाम यांच्या सैन्यात तुंबळ लढाई झाली . त्यात निजामाचा पराभव झाल्याने , निजामाने खर्ड्याच्या किल्ल्याचा आश्रय घेउन तहाचे बोलणे लावले , त्यानुसार तह होवून स्वारी खर्च पाच कोटी रुपये , पासष्ट लाखाची जहागीर व दौलताबादचा किल्ला या तहाने मराठ्यांना मिळाला. या लढाईत निजामाचे दोन सरदार तर मराठयांकडून एक सरदार ठार झाले .

या लढाईने मराठयांची पुन्हा एकदा उत्तरेबरोबरच दक्षिणेसही चांगलाही जरब बसली. व कालांतराने निजामाच्या दरबारात इंग्रजांचा शिरकाव झाला .

संदर्भ- खर्ड्याच्या स्वारीची बखर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...