मुख्य सामग्रीवर वगळा

पालखेडची लढाई

पालखेडची लढाई

पालखेडची लढाई
दिनांकफेब्रुवारी २८, इ.स. १७२८
स्थानपालखेड, [औरंगाबाद जिल्हा], महाराष्ट्र, भारत
परिणतीमराठ्यांचा विजय
युद्धमान पक्ष
मराठा साम्राज्यहैदराबादचा निजाम
सेनापती
बाजीराव पहिलानिझाम-उल-मुल्क


पालखेडची लढाई फेब्रुवारी २८, इ.स. १७२८ रोजीमहाराष्ट्रातील औरंगाबाद शहराजवळ असलेल्या पालखेडयेथील लढाई होती.

पहिल्या बाजीरावाच्या नेतृत्त्वाखाली मराठा साम्राज्य हैदराबादचा निझाम यांच्यातील या लढाईत मराठ्यांचा जय झाला. या लढाईत दोन्ही सैन्यांची फारशी खराबी झाली नाही. बाजीरावाने निझामाला खेळवत स्वतःला अनुकूल अशा ठिकाणी खेचून आणले व तेथे कोंडीत पकडून हतबल केले. हे बाजीरावाच्या व्यूहरचनेचे व युद्धतंत्राचे उत्तम उदाहरण समजले जाते. पालखेडच्या लढाईला अनेक युद्धशास्त्र अभ्यासकांनी गनिमी काव्याचे अत्युत्तम उदाहरण मानलेले आहे.[१][२][३]

पार्श्वभूमी 

इ.स. १७१३मध्ये छत्रपती शाहूने बाळाजी विश्वनाथलापेशवाईची वस्त्रे दिल्यापासून दहा-बारा वर्षांत बाळाजीने मोडकळीस आलेल्या मोगल साम्राज्याचे लचके तोडून मराठा साम्राज्यास जोडण्याचा उद्योग लावलेला होता. याचे पारिपत्य करण्यासाठी मोगल सम्राट मुहम्मद शाह याने ऑक्टोबर इ.स. १७२४मध्ये निझाम-उल-मुल्क यासदख्खनचा वजीर नेमले व त्यास दख्खनेत पाठवले. तोपर्यंत बाळाजीचा मुलगा बाजीराव पहिला पेशवेपदी आला होता.

याच सुमारास मराठा साम्राज्यात दुफळी निर्माण होऊ घातली होती. साताऱ्यास छत्रपती शाहू तर कोल्हापूरासछत्रपती संभाजी यांनी स्वतःला शिवाजी महाराजांच्यासाम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे जाहीर केले होते. निझामाने याचा फायदा घेण्याचे ठरवले व कोल्हापूरच्या गादीस आपला पाठिंबा दिला. याउप्पर निझामाने दख्खनातील देशमुखांकरवी सरदेशमुखी व चौथ (महसूली उत्पन्नाचा चौथा भाग) मराठ्यांच्या हवाली करणे बंद करवले. या कारणांस्तव छत्रपती शाहू व बाजीराव पेशव्यांनी निझामास धडा शिकवण्याचे ठरविले.

लढाई 

१७२७च्या शेवटी बाजीराव आपल्या सैन्यासह कर्नाटकातीलमोहीमेवर होता. निझामाने महसूल देणे बंद करविल्यावर छत्रपती शाहूस निझामाला धडा शिकवण्याचा व त्यानिमित्ताने मराठा साम्राज्याचा पूर्वेस विस्तार करण्याचा सल्ला बाजीरावाने दिला. छत्रपतींनी बाजीरावास सैन्यासह आपल्याकडे बोलावून घेतले. इकडे कोल्हापूरातीलश्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी छत्रपती संभाजीला निझामाशी वाटाघाटी करण्याचे सुचवले. पावसाळा संपतासंपता बाजीरावाने सैन्यास कुमक लावून घेतली व औरंगाबादकडेकूच केले. जालन्याजवळ त्याने निझामाच्या सैन्यावर छापा घातला आणि शत्रू सावध होउन लढायला तयार होईपर्यंत मराठा सैन्याने उत्तरेस बुऱ्हाणपुराकडे वाट काढली.

निझामाचा सरदार इवाझ खान याने बाजीरावाचा पाठलाग सुरू केला. बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाला. बाजीराव आपल्याला पतंगाप्रमाणे ओढीत नेत असल्याचे लक्षात येउन निझामाच्या सैन्याने त्याचा नाद सोडला व बाजीरावास शह देण्यासाठी त्याने पुण्यावरच चाल केली. आपल्या राजधानीकडे शत्रू जात असल्याचे पाहून बाजीराव आपसूकच आपल्या जाळ्यात येईल असा निझामाचा डाव होता. निझामाने दक्षिणेकडे सरकत उदापूर, अवसरी, पाबळ,खेड, नारायणगाव जिंकले. त्यानंतर खुद्द पुण्यात घुसून तेथे तळ ठोकला आणि तेथून साताऱ्यावर चाल केली. आतातर त्याने सुपे, पाटस आणि बारामती पर्यंत धडक मारली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला.

असा शह बसल्यावर छत्रपती, बाजीराव किंवा दोघेही नाक मुठीत धरून आपल्यास शरण येतील असा निझामाचा हा डाव पूर्ण होत आला होता. बाजीरावाने त्यास भीक न घालता निझामासच काटशह देण्याचे ठरवले व खुद्द निझामाची राजधानी असलेल्या औरंगाबादवर चाल केली. निझामास ही खेळी अनपेक्षित होती. त्याला औरंगाबादचा बचाव करणे भाग होते पण हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडणेही त्याच्या जीवावर आले होते. त्याने आता कोल्हापूरच्या छत्रपतींना साताऱ्यावर चाल करण्यास सुचवले. काट्याने काटा काढण्याची ही निझामाची हिकमत नामी होती. छत्रपती संभाजीला आपली सत्ता प्रबळ करणे ही लालूच दाखवून कोल्हापूरला आपले धार्जिणे राज्य करून घेणे निझामाला अपेक्षित होत. परंतु येथेही त्याचा अंदाज चुकला. संभाजी व पंतप्रतिनिधी यांनी छत्रपती शाहूवर हल्ला करण्यास नकार दिला. आता बाजीरावाच्या कचाट्यातून औरंगाबाद तरी वाचवावे यासाठी निझाम पुणे-सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला. बाजीरावाने औरंगाबादचा रस्ता सोडून निझामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला. औरंगाबादकडे निघालेल्या निझामाच्या सैन्यावर विद्युतवेगी हल्ले चढवत बाजीरावाने त्यास सळो कि पळो करुन सोडले. छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसान होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत बाजीरावाने निझामास नाशिककडे ओढत नेले. असे करता फेब्रुवारी २५,इ.स. १७२८ रोजी पालखेड जवळील निपाणी प्रदेशात निझामाचे सैन्य आणि गोदावरी नदी यांच्यामध्ये ठाण मांडून बाजीरावाने निझामाला कोंडीत धरले. शेवटी फेब्रुवारी २८रोजी निझामाने मराठ्यांची फळी फोडत गोदावरीपर्यंत पोचण्याचा आपल्या सैन्यास हुकुम दिला. जेरीस आलेल्या निझामी सैन्याने लढण्यास साफ नकार दिला. निझामाने इवाझ खानामार्फत बाजीरावास शरणागतीचा संदेश पाठवला व फारशी खानाखराबी न होता मराठ्यांनी निझामाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला.

पर्यवसान 

सपशेल पराभव झालेल्या निझामाने मुंगी-पैठण या गावातमार्च ६, १७२८ रोजी तह स्वीकारला. त्यानुसार --

१. छत्रपती शाहू हे मराठा साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे निझामाने व पर्यायाने मोगल सम्राटाने मान्य केले.

२. मराठ्यांना दख्खनमधील चौथ व सरदेशमुखीच हक्क परत केला गेला.

३. मराठ्यांच्या देशमुखांना परत आपापल्या जहागिरी इनाम झाल्या.

४. महसूलाची थकलेली रक्कम निझामाने मराठ्यांस नजर करण्याचे कबूल केले.

निझाम व मोगल सैन्याशी झगडा करुन त्यांना आपल्या अटी मान्य करायला लावल्याने बाजीरावाची कीर्ती भारतभर पसरली व येथून दख्खन/माळव्यात मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली. बाजीरावाने निझामाविरुद्ध वापरलेली रणनीती पुढे मराठ्यांनी अनेक लढायांत वापरली व भारतभर साम्राज्य पसरविण्यास सुरुवात केली.

संदर्भ आणि नोंदी 

  1. ^ अ कन्साइज हिस्टरी ऑफ वॉरफेर -- फील्ड मार्शल बर्नार्ड लॉ मॉंटगोमरी, विल्यम कॉलिन्स सन्स, १९६८, आय.एस.बी.एन. 1-84022-223-9, पृ. १३२
  2. ^ द लाइफ ऑफ ॲन आउटस्टॅंडिंग इंडियन कॅव्हेलरी कमांडर - १७२०-१७४० द पेशवा, कर्नल आर.डी. पालसोलकर, रिलायन्स प्रकाशन, १९९५, आय.एस.बी.एन.ISBN 81-85972-93-1, पृ. २४८
  3. ^ बाजीराव - द वॉरियर पेशवा, जयवंत ई. पॉल, रोली बूक्स प्रा. लि., आय.एस.बी.एन.81-7436-129-4, पृ. १८४

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...